Mahatransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) येथे ‘विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २’ या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण २५४१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २
एकूण पदसंख्या – २,५४१
शैक्षणिक पात्रता –
विद्युत सहाय्यक (पारेषण) – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
वरिष्ठ तंत्रज्ञ/तंत्रज्ञ १/ तंत्रज्ञ २ – शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
असा करा अर्ज –
- उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/131xCxvAy1fAbFsAscldLbzVQY5SZ_EzX/view
https://drive.google.com/file/d/1tib-lNGRRgMmc9GHGqCHv3rmoJ0nUGV7/view