जीएआयएल (इंडिया) लिमिटेड (GAIL (I) Ltd.), (एक महारत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग). पुढील E-१ व E-२ ग्रेडवरील २६१ पदांची भरती. पद क्र. १ ते १६ साठी संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(I) ग्रेड-ई-२, वेतन श्रेणी – रु. ६०,०००/- – १,८०,०००/-, वयोमर्यादा – २८ वर्षे.
(१) सिनियर इंजिनीअर (केमिकल) – ३६ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १५).
(२) सिनियर इंजिनीअर (मेकॅनिकल) – ३० पदे (अजा – ५, अज – ३, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).
(३) सिनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) – ६ पदे (अजा – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
(४) सिनियर इंजिनीअर (इन्स्ट्रूमेंटेशन) – १ पद (खुला).
(५) सिनियर इंजिनीअर (सिव्हील) – ११ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).
(६) सिनियर इंजिनीअर (GAILTEL TC/ TM) (इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन) – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).
(७) सिनियर इंजिनीअर (रिन्यूव्हेबल एनर्जी) (केमिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनीअरिंग) – ६ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).
(८) सिनियर ऑफिसर (सी अँड पी) – २२ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – २, खुला – १३).
पात्रता : पद क्र. १ ते ८ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(९) सिनियर इंजिनीअर (बॉयलर ऑपरेशन) (केमिकल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
पात्रता : केमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट.
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
(१०) सिनियर ऑफिसर मेडिकल सर्व्हिसेस – १ पद (अजा).
पात्रता : MBBS Degree.
(११) सिनियर ऑफिसर (फायर अँड सेफ्टी) – २० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७).
पात्रता : फायर/फायर अँड सेफ्टी इंजिनीअरिंग पदवी ६० गुणांसह उत्तीर्ण. (१ वर्षाचा इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमाधारकांना प्राधान्य दिले जाईल.)
(१२) सिनियर ऑफिसर (मार्केटिंग) – २२ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३).
पात्रता : इंजिनीअरिंग पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि एम्बीए (मार्केटिंग/ ऑईल अँड गॅस/ पेट्रोलियम अँड एनर्जी/ एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिझनेस) किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(१३) सिनियर ऑफिसर (एच्आर) – २३ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस् – २, खुला – १५).
पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि एम्बीए/ एम्एस्डब्ल्यू (पर्सोनेल मॅनेजमेंट/ आय्आर/एचआर स्पेशलायझेशनसह किमान ६५ टक्के गुण).
(१४) सिनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).
पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुणांसह आणि (कम्युनिकेशन/ अॅडव्हर्टाईजमेंट अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/ पब्लिक रिलेशन्स/ मास कम्युनिकेशन/ जर्नालिझममधील मास्टर्स डिग्री/ डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण)
(१५) सिनियर ऑफिसर (लॉ) – २ पदे (अजा – १, खुला – १).
पात्रता : पदवी किमान ६० टक्के विषयांसह आणि कायदा विषयांतील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा ५ वर्षांची कायदा विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (कायदा विषयातील मास्टर्स डिग्री असल्यास प्राधान्य)
(१६) सिनियर ऑफिसर (एफ अँड ए) – ३६ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १८).
पात्रता : बी.कॉम्. किंवा बी.ए. (हॉनर्स इन इकॉनॉमिक्स) किंवा बी.ए./ बी.एस्सी. (हॉनर्स इन स्टॅटिस्टिक्स)/ बी.ए./ बी.एस्सी. (हॉनर्स इन मॅथ्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा इंजिनीअरिंग पदवी ६० टक्के गुण आणि एमबीए (फिनान्स) किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(II) ग्रेड-ई-१, वेतन श्रेणी – रु. ५०,०००/- – १,६०,०००/.
(१७) ऑफिसर (लॅबोरेटरी) – १६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ७).
पात्रता : एम्.एस्सी. (केमिस्ट्री) किमान ६० गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : ३२ वर्षे.
(१८) ऑफिसर (सिक्युरिटी) – ४ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी C साठी राखीव).
पात्रता : पदवी किमान ६० गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव. (इंडस्ट्रियल सिक्युरिटी डिप्लोमा असल्यास प्राधान्य) वयोमर्यादा – ४५ वर्षे.
(१९) ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) – १३ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (१ पद दिव्यांग कॅटेगरी C साठी राखीव).
पात्रता : एम्.ए. (हिंदी) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (पदवीला एक विषय इंग्लिश अभ्यासलेला असावा.)
इष्ट पात्रता : हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा/डिग्री आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : ३५ वर्षे.
यातील काही पदे (एकूण – १८) दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहे.
गुणांच्या अटीमध्ये सूट – अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांत ५ ची सूट.
वयोमर्यादेत सूट (दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी) – अजा/अज – ५ वर्षे; इमाव – ३ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.
अर्जाचे शुल्क : रु. २००/-. (अजा/ अज/ दिव्यांग यांना फी माफ आहे.) (याविषयीची माहिती careers. gail. co. in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.)
निवड पद्धती : ग्रुप डिस्कशन आणि/ किंवा इंटरव्ह्यू (सिनियर ऑफिसर एफ् अँड एस् आणि ऑफिसर (सिक्युरिटी पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि इंटरव्ह्यू) (ऑफिसर (ऑफिशियल लँग्वेज) पदासाठी ट्रान्सलेशन टेस्ट आणि इंटरव्ह्यू).
ऑनलाइन अर्ज अर्जाचे शुल्क भरल्यास स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतरच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज http://www.gailonline.com या संकेतस्थळावर (Careers Section) दि. ११ डिसेंबर २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.