इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS), रिजनल रूरल बँकेत (RRBs) ‘ऑफिसर्स (स्केल- I, II आणि III)’ व ‘ऑफिस असिस्टंट (मल्टि पर्पज)’च्या देशभरातील २८ राज्यांमधील एकूण ४३ RRBs, मधील एकूण ९,९९५ पदे (Office Assistant Multipurpose ५,५८५ पदे; Officer Scale- I3,४९९; Officer Scale- II ७८२; Officer Scale- III १२९) रिक्त पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस ( CRP for RRBs- XIII), अंतर्गत ऑनलाइन परीक्षा घेणार आहे.

महाराष्ट्र राज्यात दोन ग्रामीण बँका (RRB) आहेत. (१) महाराष्ट्र ग्रामीण बँक (मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.) (२) विदर्भ कोकण ग्रामीण बँक (मुख्यालय नागपूर येथे आहे.)

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
barti Free coaching for UPSC MPSC
यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण, १३ हजार रुपये मासिक विद्यावेतनही मिळणार, फक्त येथे अर्ज करा
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Bank of Maharashtra recruitment 2024
Job News : व्हॉलीबॉल खेळता येते? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; मिळेल चांगला पगार, आजच अर्ज करा
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Careers And Jobs After Liberal Arts Degree
चौकट मोडताना : परदेशी जाण्याचा खर्चिक मार्ग
COEP Pune recruitment 2024
COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

महाराष्ट्रातील रिक्त पदांचा तपशील :

(I) ऑफिस असिस्टंट (मल्टि पर्पज) – १७२ पदे.

१) महाराष्ट्र ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे ९९ .

२) विदर्भ कोकण ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे ७३ .

पात्रता : (दि. २७ जून २०२४ रोजी) (i) पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा). (ii) स्थानीय भाषा अवगत असणे आवश्यक (iii) कॉम्प्युटर नॉलेज. (II) ऑफिसर स्केल- I (असिस्टंट मॅनेजर) – १२४ पदे. १) महाराष्ट्र ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे ४९

२) विदर्भ कोकण ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे ७५

हेही वाचा >>> MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- पर्यावरण

पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) (अॅग्रिकल्चर/ हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री/ अॅनिमल हजबंडरी/ वेटेरिनरी सायन्स/ अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग/ पिस्किकल्चर/ अॅग्रिकल्चर मार्केटिंग आणि को-ऑपरेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ मॅनेजमेंट/ लॉ/ इकॉनॉमिक्स/ अकाऊंटन्सी पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.) (ii) स्थानिय भाषा अवगत असणे आवश्यक. (iii) कॉम्प्युटर नॉलेज.

(III) ऑफिसर स्केल- II (मॅनेजर) – (१) (iii) ट्रेझरी मॅनेजर – ० पदे (iv) चार्टर्ड अकाऊंट – ६ पदे.

पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडील सर्टिफाईड असोसिएट (CA).

(v) लॉ ऑफिसर – १ पद (खुला) (विदर्भ कोकण ग्रामीण बँक).

पात्रता : कायदा विषयातील पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(vi) आयटी – १ पद (खुला) (विदर्भ कोकण ग्रामीण बँक).

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी विषयातील किंवा समतूल्य पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव.

(IV) ऑफिसर स्केल- III (सिनियर मॅनेजर) – ० पदे.

वयोमर्यादा : (दि. १ जून २०२४ रोजी) ऑफिस असिस्टंट – १८ ते २८ वर्षे, असिस्टंट मॅनेजर – १८ ते ३० वर्षे, मॅनेजर – २१ ते ३२ वर्षे, सिनियर मॅनेजर – २१ ते ४० वर्षे. (फक्त ऑफिस असिस्टंट (Multi Purpose) पदांसाठी विधवा/ परित्यक्ता महिला – ३५ वर्षे (खुला/ ईडब्ल्यूएस्), ३८ वर्षे – (इमाव), ४० वर्षे – (अजा/ अज)), Ex- Servicemen – ESM; Dependents of Servicemen killed in action or severly disabled – DESM

अर्जाचे शुल्क : रु. ८५०/- (अजा/ अज/ दिव्यांग/ ESM/ DESM यांना रु. १७५/-). उमेदवार ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात आणि अर्जाचे शुल्क वेगवेगळे भरावे लागेल. ऑफिसर स्केल- I, स्केल- II, स्केल- III मधील फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.

परीक्षा पद्धती : ऑब्जेक्टिव्ह टाईप पूर्व व मुख्य परीक्षा. ऑफिस असिस्टंट पदासाठी पूर्व परीक्षा – ८० प्रश्न, ८० गुण, वेळ ४५ मिनिटे.

ऑफिसर स्केल- I पदांसाठी पूर्व परीक्षा – ८० प्रश्न, ८० गुण, वेळ ४५ मिनिटे. चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील.

मुख्य परीक्षा : ऑफिस असिस्टंट (मल्टि पर्पज) आणि ऑफिसर स्केल-१ पदांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप – २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास. (१) रिझनिंग – ४० प्रश्न, ५० गुण; (२) कॉम्प्युटर नॉलेज – ४० प्रश्न, २० गुण; (३) जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण; (४) इंग्लिश किंवा हिंदी भाषा – ४० प्रश्न, ४० गुण; (५) न्यूमरिकल अॅबिलिटी (ऑफिस असिस्टंट पदासाठी) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (ऑफिसर स्केल- I पदासाठी) – ४० प्रश्न, ५० गुण.

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षेचे माध्यम इंग्लिश/ हिंदी/ मराठी/ कोंकणी असेल. ऑफिस असिस्टंट पदासाठी अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. ऑफिसर स्केल- I पदासाठी अंतिम निवड मुख्य परीक्षा (२०० गुण) आणि इंटरह्यू (१०० गुण) मधील एकत्रित गुणवत्तेवर आधारित केली जाईल.

परीक्षापूर्व प्रशिक्षण : ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल- क पदासाठी अर्ज करणाऱ्या काही अजा/ अज/ इमाव/अल्पसंख्यांक/ माजी सैनिक/ दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण नागपूर, गांधीनगर, इंदोर, रायपूर इ. केंद्रांवर आरआरबीच्या वतीने विनामूल्य देण्यात येईल. (उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तसे नमूद करावे.) परीक्षापूर्व प्रशिक्षण दि. २२ जुलै २०२४ ते २७ जुलै २०२४ दरम्यान घेतले जाईल

ऑनलाइन परीक्षा : ऑफिस असिस्टंट/ ऑफिसर स्केल- I पदासाठी ऑगस्ट, २०२४ मध्ये घेतली जाईल. तर ऑनलाइन मुख्य परीक्षा : सप्टेंबर/ ऑक्टोबर, २०२४ मध्ये घेतली जाईल.

इंटरव्ह्यू : ऑफिसर्स (स्केल- I, II, III) साठी नोव्हेंबर, २०२४ मध्ये इंटरव्ह्यू घेतले जातील. ऑनलाइन अर्ज https://www.ibps.in या संकेतस्थळावर दि. २७ जून, २०२४ (२३.३० वाजे) पर्यंत करता येतील.