कॅनरा बँक, हेड ऑफिस, बेंगलुरू (भारत सरकारचा उपक्रम) ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ३,००० ॲप्रेंटिसेस पदावर २०२४-२५ साठी पदवीधर उमेदवारांची भरती. काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील – यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

(१) महाराष्ट्र – एकूण २०० (अजा – २०, अज – १८, इमाव – ५४, ईडब्ल्यूएस – २०, खुला – ८८) (स्थानिय भाषा – मराठी).

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!

(२) गुजरात – ७ (अजा – ४, अज – १, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३१) (स्थानिय भाषा – गुजराती).

(३) आंध्र प्रदेश – २ (अजा – ३२, अज – १४, इमाव – ५४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८०) (स्थानीय भाषा – तेलुगू/ उर्दू).

(४) कर्नाटक – ६०० (अजा – ९६, अज – ४२, इमाव – १६२, ईडब्ल्यूएस – ६०, खुला – २४) (स्थानिय भाषा – कन्नड).

(५) मध्य प्रदेश – ८० (अजा – १२, अज – १६, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३२) (स्थानिय भाषा – हिंदी).

(६) छत्तीसगड – २५ (अजा – ३, अज – ८, इमाव – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) (स्थानिय भाषा – हिंदी).

(७) तेलंगणा – १२० (अजा – १९, अज – ८, इमाव – ३२, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ४९) (स्थानिय भाषा – तेलुगू/उर्दू).

(८) गोवा – २० (अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (स्थानिय भाषा – कोंकणी).

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मधील संधी

महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशिल – अहमदनगर – ६, अकोला – ३, अमरावती – २, भंडारा – ४, बीड – १, बुलढाणा – २, चंद्रपूर – १, छत्रपती संभाजी नगर – ३, धाराशिव – २, धुळे – २, गोंदिया – २, हिंगोली – १, जळगाव – २, जालना – ३, लातूर – १, नांदेड – १, नंदूरबार – १, पालघर – ७, परभणी – १, रायगड – ८, रत्नागिरी – ४, सांगली – २, सातारा – ५, सिंधुदुर्ग – ४, सोलापूर – ४, वर्धा – २, वाशिम – १, यवतमाळ – १, कोल्हापूर – ५, मुंबई – १६, मुंबई उपनगर – २३, नागपूर – १६, नाशिक – १, पुणे – ३१, ठाणे – २३़.

वयोमर्यादा : दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ सप्टेंबर १९९६ ते १ सप्टेंबर २००४ दरम्यानचा असावा.) (इमाव – ३१ वर्षे, अजा/ अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/ ४१/ ४३ वर्षे) (विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही – खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)

पात्रता : दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी पदवी उत्तीर्ण.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी – १ वर्ष.

स्टायपेंड : ॲप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

रजा : उमेदवारांनी १ महिन्याचा अॅप्रेंटिसशिप पूर्ण केल्यावर १ दिवसाची नैमित्तक रजा मिळू शकेल. वर्षाला एकूण १२ रजा. अॅप्रेंटिसना बँकेला असणाऱ्या सुट्या लागू असतील.

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची त्यांनी १२ वीला मिळविलेल्या गुणांनुसार राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. पात्रता तपासून, स्थानिय भाषा टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या आणि मेडिकली फिट ठरणाऱ्यांची अंतिम निवड उमेदवारांची केली जाईल.

(१० वी किंवा १२ वीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्यास (तसा पुरावा गुणपत्रक/प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.) त्यांना टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज द्यावी लागणार नाही.

प्रतीक्षा यादी : राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.

ही जाहिरात अॅप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क : रु. ५/-. (अजा/ अज/ दिव्यांग यांना फी माफ आहे.)

निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या www.canarabank.com या संकेतस्थळावर ‘ Career gt; Recruitment Section’ मध्ये प्रसिद्ध केली जाईल.

अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांग चे आरक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकरिता नेमून दिलेल्या नमुन्यातील (सक्षम अधिकाऱयाने जारी केलेले) Caste/ Category सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक.

रजिस्ट्रेशन/अॅप्लिकेशन प्रोसेस समजून घेण्यासाठी उमेदवारांनी www.canarabank.com या संकेतस्थळावरील ‘ Career gt; Recruitment’ वर क्लिक करून Engagement of Graduate Apprentice in Canara Bank under Apprenticeship Act, १९६१ for F. Y. २०२४-२५ लिंक ओपन होईल.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी www.nats.education.gov.in या NATS ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर (Student Register/ Login Section) आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर एनरोलमेंट नंबर जनरेट होईल, तो उमेदवारांनी पुढील भरती प्रक्रियेसाठी जपून ठेवावा. त्यानंतर उमेदवारांनी http://www.canarabank.com या संकेतस्थळावर NATS पोर्टलवरील एनरोलमेंट नंबर नमूद करून ऑनलाइन अर्ज दि. ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावा. उमेदवार एका राज्यातील सर्व जिह्यांतील रिक्त पदांसाठी आपला पसंतीक्रम नोंदवू शकतात.