भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE), भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) ट्रेनिंग स्कूल्स इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स यांना ‘सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप-ए)’ पदांच्या भरतीसाठी OCES-२०२५ आणि DGFS-२०२५ हे दोन शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
(I) OCES-२०२५ – ‘ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर’ (TSO) १ वर्षाचा ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अँड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्सना (OCES-२०२४) (सन २०२५) ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता पुढील BARC ट्रेनिंग स्कूल्समध्ये प्रवेश दिला जातो. BARC, मुंबई; अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्पलोरेशन अँड रिसर्च (AMD), हैद्राबाद.
पात्रता : (अ) इंजिनीअरिंग विद्याशाखा – पुढील ८ पैकी एका विद्याशाखेतून इंजिनीअरिंगमधील पदवी (B.E./ B.Tech.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (minimum ६.० CGPA on the scale of १०) (१) मेकॅनिकल (ME २१), (२) केमिकल (CH २२), (३) मेटॅलर्जीकल (MT २३), (४) इलेक्ट्रिकल (EE २४), (५) इलेक्ट्रॉनिक्स (EC २५), (६) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (CS २६), (७) इन्स्ट्रूमेंटेशन (IN २७), (८) सिव्हील (CE २८).
(ब) सायन्स विद्याशाखा – संबंधित विद्याशाखेतून (एम्.एस्सी.) पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. बी.एस्सी. लासुद्धा किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक. तसेच १२ वी मॅथेमॅटिक्स विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. (१) फिजिक्स (PH ४१), (२) केमिस्ट्री (CY ४२), (३) बायोसायन्सेस (BS ४३), (४) जीऑलॉजी/अॅप्लाईड जीऑलॉजी/जीओकेमिस्ट्री (GE ४५).
(II) २ वर्षं कालावधीची जुलै २०२५ पासून सुरू होणाऱ्या DAE ग्रॅज्युएट फेलोशिप स्कीम फॉर इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स फॉर दी इयर २०२५-२०२७ (DGFS २०२५)
पात्रता : इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (डिसिप्लिन्स २१ ते २८ आणि ४१) ज्यांनी BARC ट्रेनिंग स्कूल्स प्रोग्रामसाठीच्या सिलेक्शन इंटरह्यूमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ज्यांनी IIT Bombay किंवा IIT Madras या इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वत M. Tech./ M. Chem. Engg. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविलेला आहे. (ME/ CH/ MT/ CE/ EE/ EC/ IN/ CS GATE Subject Code)
OCES आणि DGFS साठी पात्रता परीक्षेच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिकणारे अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना अंतिम निकाल ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सादर करावा लागेल.
वयोमर्यादा छ दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी २६ वर्षे (खुलागट),
निवड पद्धती : सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी निवड दोन पद्धतीने केली जाते.
(१) ऑनलाईन सिलेक्शन टेस्ट (OCES) ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ १०० प्रश्न, वेळ १२० मिनिटे, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ३ गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. (८ इंजिनीअरिंगच्या शाखा (कोड क्र. २१ ते २८) आणि चार सायन्समधील शाखांमधील प्रवेशासाठी (कोड क्र. ४१ ते ४३ आणि ४५)). देशभरातील ५२ केंद्रांवर ८ व ९ मार्च, २०२५ मध्ये घेतली जाईल. (कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे इ.) उमेदवाराने किमान ३ परीक्षा केंद्र शहर पसंतीक्रम देणे आवश्यक.
(२) GATE स्कोअर – GATE-२०२३/ GATE-२०२४/ GATE-२०२५ स्कोअरवर आधारित उमेदवार इंटरव्ह्यूसाठी निवडले जातील. GATE-२०२५ चा स्कोअर २४ मार्च २०२५ पर्यंत http://www.barcocesexam. in या वेबसाईटवर अपलोड करावयाचा आहे.
ऑनलाइन अर्ज https://www.barcocesexam.in या संकेतस्थळावर २६ जानेवारी २०२५ पर्यंत सबमिट करता येतील. suhaspatil237@gmail. com