कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना (पुरुष/ महिला) AFCAT Entry/ एनसीसी स्पेशल एन्ट्रीमधून भारतीय वायूसेनेत कमिशण्ड ऑफिसर म्हणून सामील होण्याची सुवर्णसंधी. भारतीय वायु सेना – जुलै, २०२५ पासून सुरू होणाऱ्या कोर्सेसमधील प्रवेशाकरिता एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT- ०२/२०२४/ NCC Special Entry) परीक्षा घेणार आहे.

(ए) AFCAT एन्ट्री – (१) फ्लाईंग ब्रँच – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) – २९ पदे (पुरुष – १८ व महिला – ११).

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
urged to Mumbaikars to join BEST Kamgar Sena-led protest against municipalitys stance
महापालिकेच्या भूमिकेचा निषेध! १६ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी ५० टक्के गुण आवश्यक) आणि (i) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (कोणतीही शाखा) किंवा (ii) B.E./ B.Tech. ६० टक्के गुण किंवा (iii) a.m.i.e. ६० टक्के गुण.

(२) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल ब्रँच) – (i) एअरोनॉटिकल इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स), AE(L), SSC – १११ पदे (पुरुष – ८८ व महिला – २३).

पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इ. मधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि (i) किंवा (ii) A.M.I.E. किंवा I.E.T.E. कडील G.M.E. ६० टक्के गुण.

(ii) एअरोनॉटिकल इंजिनिअर (मेकॅनिकल) AE (M), SSC – ४५ पदे (पुरुष – ३६ व महिलांसाठी – ९).

पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि मेकॅनिकल/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/ एअरोस्पेस/ एअरोनॉटिकल/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल इ. विषयांतील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि/ किंवा A.M.I.E. ६० टक्के गुण.

हेही वाचा >>> कर्मचारी निवड आयोगाद्वारे १७,७२७ रिक्त जागांसाठी होणार भरती! अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता निकष अन् महत्त्वाच्या तारखा

(३) ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल ब्रँच) –

(i) अॅडमिन – SSC – ५४ पदे (पुरुष – ४३ व महिला – ११).

(ii) लॉजिस्टिक्स – SSC – १७ पदे (पुरुष – १३ व महिला – ४).

पात्रता : अॅडमिन व लॉजिस्टिक्स ब्रँचसाठी १२ वी आणि पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (iii) अकाऊंट्स – SSC – १२ पदे (पुरुष – १२ व महिला – २).

पात्रता : १२ वी आणि खालीलपैकी एक पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.कॉम./ बी.बी.ए./ बी.एम.एस./ बी.बी.एस./ बी.एस्सी.) (फिनान्स स्पेशलायझेशनसह) (iv) एज्युकेशन – SSC – ९ पदे (पुरुष – ७ व महिला – २).

पात्रता : १२ वी आणि कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि पदवीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.

(५) मेटीओरॉलॉजी एन्ट्री – SSC – १० पदे (पुरुष – ८, महिला – २).

पात्रता : १२ वी आणि B. Sc. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा B.E./ B.Tech. (कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी/ मेकॅनिकल इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(vi) व्हेपन सिस्टीम (WS) – SSC – १७ पदे (पुरुष – १४, महिला – ३).

पात्रता : १२ वी (फिजिक्स, मॅथ्स विषयात) किमान ५० टक्के गुण आणि पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

ज्या उमेदवारांनी १०+२ पॅटर्नमधील १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) ब्रँचसाठीची १ जागा कायदा पदवीधरांसाठी राखीव आहे. (सी) NCC स्पेशल एन्ट्री – फ्लाईंग ब्रँच – PC – (फक्त पुरुष) आणि SSC – (पुरुष/ महिलांसाठी). CDSE मधील १० टक्के जागा PC साठी आणि AFCAT ब्रॅंचसाठीच्या जागांच्या १० टक्के जागा SSC साठी.

पात्रता : (अ) NCC एअर विंग सिनियर डिव्हीजन ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. (ब) पदवीला (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुण आवश्यक. (क) १२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक. पदवी परीक्षेतील CGPA ग्रेड टक्केवारीमध्ये रूपांतर (conversion) करण्याचा पुरावा सादर करणे आवश्यक. (पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावा. त्यांना पदवी/ पदव्युत्तर पदवीच्या अगोदरच्या सर्व सेमिस्टर्सना किमान सरासरी आवश्यक ६० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.

SSC ऑफिसर्सना पेन्शन लागू नसेल.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन : SSC (महिला व पुरुष) – फ्लाईंग ब्रँचमध्ये ऑफिसर्सना १४ वर्षेपर्यंत सेवा करता येईल.

ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) SSC ऑफिसर्सना १० वर्षांचा सेवाकाल असेल, जो आणखी ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. पर्मनंट कमिशन ग्रांट करण्याचे शॉर्ट सर्व्हिसच्या शेवटच्या वर्षी ठरविले जाऊ शकते.)

मॅरिटल स्टेटस : कोर्स सुरू होण्यापूर्वी उमेदवार अविवाहीत असणे आवश्यक आहे. ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये विवाह करण्यास परवानगी नाही.

वयोमर्यादा : (अ) फ्लाईंग ब्रँच AFCAT आणि NCC स्पेशल एन्ट्रीसाठी – (१ जुलै २०२५ रोजी) २० ते २४ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै २००१ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.) DGCA कडील कमर्शियल पायलट लायसन्सधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – २६ वर्षे. (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रातील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)

(ब) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) ब्रँचेस – (दि. १ जुलै २०२५ रोजी) २० ते २६ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती : (१) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची AFCAT परीक्षा दि. ९, १०, ११ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. AFCAT परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न फक्त इंग्रजी भाषेत असतील. फर्स्ट शिफ्टकरिता उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता व दुसऱ्या शिफ्टसाठी उमेदवारांनी दुपारी १३.०० वाजता हजर राहणे आवश्यक.

AFCAT परीक्षा – (ए) जनरल अवेअरनेस, (बी) व्हर्बल अॅबिलिटी इन इंग्लिश, (सी) न्यूमरिकल अॅबिलिटी, (डी) रिझनिंग आणि मिलिटरी अॅप्टिट्यूड टेस्ट एकूण प्रश्न संख्या १००, एकूण गुण ३००, वेळ २ तास. (सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत) (पहिली शिफ्ट (रिपोर्टींग टाईम सकाळी ८.०० वा.), दुसरी शिफ्ट (रिपोर्टींग टाईम दु. १३.०० वा.) दु. १५.०० – १७.०० वाजेपर्यंत)

प्रॅक्टिस टेस्ट : AFCAT साठी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

AFCAT परीक्षा केंद्र : कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, सोलापूर, पणजी, इंदौर, जबलपूर, वडोदरा, भोपाळ, हैद्राबाद, बेंगलुरू इ.

(२) एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड (AFSB) – NCC स्पेशल एन्ट्री फ्लाईंग ब्रँच ऑप्ट केलेल्या उमेदवारांना सरळ आरइ टेस्ट डेहरादून, म्हैसूर, गांधीनगर, वाराणसी आणि गुवाहाटी यापैकी एका आरइ सेंटरवर द्यावी लागेल. AFCAT मधील पात्र उमेदवारांना आरइ इंटरव्ह्यूची तारीख आणि केंद्र ऑनलाइन https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळावर निवडावे लागेल.

अंतिम निवड लेखी परीक्षा आणि AFSB टेस्टमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. आरइ इंटरव्ह्यूनंतर निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल. AFCAT साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले अॅडमिट कार्ड https://afcat.cdac.in या संकेतस्थळावरून (Download Admit Card) लिंकवरून २७ जुलै २०२४ पासून डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड उमेदवारांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरसुद्धा पाठवले जातील.

ट्रेनिंग : ट्रेनिंग जुलै, २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून एअरफोर्स अॅकॅडमी, दुंदिगल, हैदराबाद येथे सुरू होईल. ट्रेनिंग दरम्यान फ्लाईट कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल.

शंका समाधानासाठी संपर्क : ऑनलाइन परीक्षा, रजिस्ट्रेशन, अॅडमिट कार्ड संबंधी ०२०-२५५०३१०५/६. ई-मेल आयडी – afcatcell@cdac.in. इतर चौकशीसाठी ०११-२३०१०२३१, विस्तार क्र. ७६१०, टोल फ्री नंबर १८००-११-२४४८.AFCAT एन्ट्री परीक्षा शुल्क : रु. ५५०/- + जीएस्टी. (NCC स्पेशल एन्ट्रीसाठी परीक्षा शुल्क लागू नाही.) ऑनलाइन अर्ज https://careerindianairforce.cdac. in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळावर २८ जून २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader