सुहास पाटील
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS) – ११ सहयोगी बँकांमधील ‘स्पेशालिस्ट ऑफिसर्स’ (स्केल-१) च्या २०२५-२६ मधील एकूण ८९६ रिक्त पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस ( CRP SPL- XIV) घेणार आहे. रिक्त पदांचा तपशील –
(१) आयटी ऑफिसर – एकूण १७ पदे.
(ए) इंडियन ओव्हरसिस बँक – एकूण २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OC साठी राखीव).
(बी) पंजाब नॅशनल बँक – एकूण १५० पदे (अजा – २२, अज – ११, इमाव – ४०, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ६२) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी HI – २, OC – १, VI – २, ID – १ साठी प्रत्येकी १ पद राखीव).
पात्रता : (दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी) बी.ई./ बी.टेक. किंवा एम.ई./ एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली. कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन) किंवा पदवी आणि DOEACC ‘B’ लेव्हल परीक्षा उत्तीर्ण.
(२) अॅग्रिकल्चरल फिल्ड ऑफिसर – एकूण ३४६ पदे.
(ए) पंजाब नॅशनल बँक – एकूण ३१० पदे (अजा – ४६, अज – २३, इमाव – ८३, ईडब्ल्यूएस – ३१, खुला – १२७) (१२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI, OC, VI, ID साठी प्रत्येकी ३ पदे राखीव).
(बी) युको बँक – एकूण ३६ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI, ID साठी प्रत्येकी १ पद राखीव).
पात्रता : अॅग्रिकल्चर/ हॉर्टिकल्चर/ अॅनिमल हजबंडरी/ वेटेनिअरी सायन्स/ डेअरी सायन्स/ फिशरी सायन्स/ फूड सायन्स इ. मधील ४ वर्षे कालावधीची पदवी.
हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : अभियांत्रिकीमधील संधी
(३) राजभाषा अधिकारी – एकूण २५ पदे.
(ए) पंजाब नॅशनल बँक – २५ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OC साठी राखीव).
पात्रता : एम.ए. (हिंदी) (पदवीला इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा.) किंवा एम.ए. (संस्कृत) (पदवीला हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत.)
(४) लॉ ऑफिसर – एकूण १२५ पदे.
(ए) बँक ऑफ इंडिया – ५ पदे (इमाव – १, खुला – ४).
(बी) कॅनरा बँक – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).
(सी) इंडियन ओव्हरसिस बँक – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).
(डी) पंजाब नॅशनल बँक – १०० पदे (अजा – १५, अज – ७, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४१) (४ पदे दिव्यांग प्रत्येक कॅटेगरीसाठी १ पद राखीव).
पात्रता : कायदा विषयातील पदवी (एलएल.बी.) आणि बार काऊन्सिलसोबत अॅडव्होकेट म्हणून नोंदणी.
(५) एचआर पर्सोनेल ऑफिसर – एकूण २५ पदे.
(ए) बँक ऑफ इंडिया – १ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
(बी) पंजाब नॅशनल बँक – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७).
पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि २ वर्षं कालावधीची पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी/ पदविका (पर्सोनेल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन्स/ एचआर/ एचआरडी/ सोशल वर्क/ लेबर लॉ).
(६) मार्केटिंग ऑफिसर – एकूण २५ पदे.
(ए) पंजाब नॅशनल बँक – २०० पदे (अजा – ३०, अज – १५, इमाव – ५४, ईडब्ल्यूएस – २०, खुला – ८१) (८ पदे दिव्यांग कॅटेगरी HI, OC, VI, ID साठी प्रत्येकी २ पदे राखीव)).
(बी) इंडियन ओव्हरसिज बँक – ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
पात्रता : पदवी आणि २ वर्षं कालावधीची पूर्ण वेळ MMS/ MBA (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग स्पेशलायझेशनसह PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM.
रिक्त पदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काही सहयोगी बँकांनी रिक्त पदे, आयबीपीएसला कळविली नाहीत.
सर्व पदांसाठी वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) २० ते ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, दिव्यांग – ४०/ ४३/ ४५ वर्षे)
निवड पद्धती : (ऑब्जेक्टिव्ह टाईप) ऑनलाईन लेखी परीक्षा – पूर्व परीक्षा (नोव्हेंबर २०२४).
मुख्य परीक्षा (डिसेंबर २०२४) आणि इंटरव्ह्यू १०० गुणांसाठी फेब्रुवारी/ मार्च, २०२५ मध्ये घेतले जातील.
चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
परीक्षा केंद्र : पूर्व परीक्षेसाठी – अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे.
मुख्य परीक्षेसाठी – औरंगाबाद, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई &/ MMR, नागपूर आणि पुणे.
अर्जाचे शुल्क : अजा/ अज/ दिव्यांग रु. १७५/-, इतरांसाठी रु. ८५०/-.
शंकासमाधानासाठी लॉगइन करा http://cgrs.ibps.in/
ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर दि. २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करावेत.
इस्रायलमधील संधी
इस्रायलमध्ये NSDC International मार्फत जगभरातील कुशल भारतीय पुरुष आणि महिला घरगुती काळजीवाहूंना (Home Based Caregiver) नोकरीची संधी.
पदाचे नाव – घरगुती काळजी व Home Based Caregiver
NSDC हे काळजीवाहू कर्मचाऱ्यांचे नियोक्ता नव्हेत, NSDC केवळ फॅसिलिटेटर आहे.
एकूण रिक्त पदे : ५,००० (९० टक्के जागा महिलांसाठी आणि १० टक्के जागा पुरुषांसाठी).
नोकरीचे ठिकाण : इस्रायल.
वेतन : दरमहा रु. १,३१,८३८/-.
कामाचे स्वरूप : दिव्यांग, वयस्कांची मेहनतीने आणि कुशल काळजी घेणे (diligent and skilled caregiving) त्यांना दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप (activities of daily living) करण्यास मदत करणे जसे की, ड्रेसिंग, अंघोळ आणि स्वच्छता, टॉयलेटिंग आणि/ किंवा डायपरिंग, फूड प्रिपरेशन, कुकिंग, खाणे, आहार आणि स्वच्छता, निर्धारित औषधं देणे, देखरेख, उचलणे, ट्रान्सफरींग, राहण्याची जागा स्वच्छ करणे, त्यांना घराबाहेर जाण्याचे मदत करणे इ.
पात्रता : ( i) किमान १० वी उत्तीर्ण, ( ii) काळजीवाहू सेवा देण्यासाठी अर्हताप्राप्त आणि किमान ९९० तासांचा (ऑन जॉब ट्रेनिंग धरून) काळजीवाहू सेवा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दर्शविणारे सक्षम नियामक प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र किंवा नर्सिंग, फिजिओथरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरीमधील मान्यताप्राप्त संस्थेकडील पदविका (जसे की, जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बी.एससी. नर्सिंग/ पोस्ट बी.एससी. नर्सिंग).
अनुभव : ० ते २ वर्षे.
वय : २५४५ वर्षे.
उंची/वजन : किमान ५ फूट/४५ कि.ग्रॅ.
पारपत्र (पासपोर्ट) वैधता : किमान ३ वर्षे वैधता.
कामाचे दिवस : दर आठवड्याला ६ दिवस.
इंग्लिश भाषेचे ज्ञान : चांगले किमान पायाभूत असावे.
कृपया नोंद घ्या : उमेदवाराने यापूर्वी कधीही इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. जीवनसाथी, पालक अथवा मुले सध्या इस्रायलमध्ये काम करीत नसावीत/राहत नसावीत.
http://www.nsdcjobx.com या संकेतस्थळावरील लिंकमधून ऑनलाइन अर्ज करावेत.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – contact@nsdcinternational. com
अर्ज करण्यासाठी लोकसत्ता मराठी दैनिकाच्या दि. १३ ऑगस्ट २०२४ च्या अंकातील जाहिरातीमध्ये दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा. मेडिकल इन्श्युरन्स, अकोमोडेशन, फूड नियोक्त्या (Employer) कडून दिले जाईल. त्यासाठीची रक्कम उमेदवाराच्या वेतनामधून कापून घेतली जाईल.