स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ‘स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स’च्या एकूण १,५११ पदांची नियमित स्वरूपात भरती. (Advt. No. CRPD/ SCO/२०२४-२५/१५) रिक्त पदांचा तपशील –

(१) असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) (JMGS- I) – ७९८ पदे (अजा – १२१, अज – ६७, इमाव – २१२, ईडब्ल्यूएस – ७८, खुला – ३२०) (३२ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI, HI, LD, D E साठी प्रत्येकी ८) साठी राखीव)

bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

पात्रता : (दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी) B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग)

उमेदवारांकडे पुढील विषयासंबंधित सर्टिफिकेशन्स असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. (१) Oracle/ Hadoop/ Java/ Dot Net, (२) इन्फ्रा सपोर्ट क्लाऊड ऑपरेशन Microsoft/Oracle/ Networking Infrastructure/ Visualization and Cloud इ.

अनुभव : आवश्यक नाही. स्पेसिफिक स्किल्स आवश्यक नाही.

हेही वाचा >>> ISRO ने १०० हून अधिक पदांसाठी होणार भरती, २ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार

वेतन श्रेणी : रु. ४८,४८० ८५,९२० (मूळ वेतन अधिक डी.ए., एचआरए, सीसीए, पीएफ, कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड इ.)

कामाचे ठिकाण : नवी मुंबई/ मुंबई.

वयोमर्यादा : (दि. ३० जून २०२४ रोजी) २१३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).

कामाचे स्वरूप : आवश्यकतेनुसार बँकेने नेमून दिलेले रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, अॅक्टिविटीज, की इंटरअॅक्शन्स.

निवड पद्धती : ऑनलाईन लेखी परीक्षा नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतली जाईल. कॉल लेटर बँकेच्या वेबसाईटवर अपलोड केले जातील व तसे उमेदवारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.

परीक्षा केंद्र : छत्रपती संभाजी नगर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ एमएमआर, नागपूर, पुणे, पणजी इ.

लेखी परीक्षेत (i) जनरल अॅप्टिट्यूड (फक्त पात्रता स्वरूपाची यातील गुण गुणवत्ता यादी बनविताना विचारात घेतले जात नाहीत.) (टेस्ट ऑफ रिझनिंग – १५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – १५ प्रश्न, इंग्लिश लँग्वेज – २० प्रश्न, प्रत्येकी १ गुणासाठी एकूण ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे)

(ii) प्रोफेशनल नॉलेज (जनरल आयटी नॉलेज) – ६० प्रश्न, १०० गुण, वेळ ७५ मिनिटे. (i) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट – २० प्रश्न, ३३ गुण, (ii) इन्फ्रा सपोर्ट – २० प्रश्न, ३३ गुण, (iii) नेटवर्कींग – १० प्रश्न, १७ गुण, (iv) क्लाऊड ऑपरेशन्स – १० प्रश्न, १७ गुण. एकूण ६० प्रश्न, १०० गुणांसाठी वेळ ७५ मिनिटे. प्रोफेशनल नॉलेज पेपरमधील गुणवत्तेनुसार उमेदवार २५ गुणांसाठीच्या इंटरह्यूकरिता निवडले जातील. अंतिम निवड करताना प्रोफेशनल नॉलेज पेपरमधील गुणांना ७० टक्के वेटेज व इंटरव्ह्यूमधील गुणांना ३० टक्के वेटेज दिले जाईल.

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी https://bank.sbi/web/careers/current-openings वेबसाईटवरील लिंकवर आपले नाव रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशननंतर उमेदवारांना सिस्टीम जनरेटेड ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट काढण्यासाठी सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क : खुला/ ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ७५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना अर्जाचे शुल्क (इंटिमेशन चार्जेससह) माफ आहे.) फी पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ई-रिसिप्ट आणि अॅप्लिकेशन फॉर्म (ज्यावर अर्ज दाखल केल्याचा दिनांक प्रिंट केलेला असेल.) जनरेट होईल, त्याची उमेदवारांनी प्रिंट काढून घ्यावी. ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे ४ ऑक्टोबर २०२४.

असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) पदांशिवाय डेप्युटी मॅनेजरची एकूण ७१३ पदे किमान ४ वर्षं अनुभव असलेल्या उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. याची विस्तृत माहिती SBI च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेमधील संधी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL), C. B. D. बेलापूर, नवी मुंबई (भारत सरकारचा उपक्रम) मध्ये (Employment Notification No. CO/ P- R/ C/२०२४ dt. २०.०९.२०२४) पुढील एकूण ३३ पदांची ठराविक मुदतीकरिता करार पद्धतीने वॉक-इन इंटरव्ह्यू घेऊन भरती. KRCL च्या मेकॅनिकल/ प्रोजेक्ट्स डिपार्टमेंट्समध्ये सुरुवातीला मडगाव/वेर्णा येथे एक वर्षासाठी नेमणूक दिली जाईल. कराराचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.

(१) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

वेतन श्रेणी – पे-मॅट्रिक्स लेव्हल – ६ मूळ वेतन रु. ३५,४००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-.

पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी/ पदविका.

इष्ट पात्रता : मॅन्युफॅक्चरिंग/ मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट्स/ प्रोजेक्ट प्लानिंग अँड एक्झिक्युशन कामाचा अनुभव. (पदवीधर उमेदवारांकडे किमान १ वर्षाचा आणि पदविकाधारक उमेदवारांकडे किमान ३ वर्षांचा, टेक्निकल क्षेत्राशी निगडीत अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)

कामाचे स्वरूप : रेल्वेच्या चालू असलेल्या गाड्यांची देखभाल कामाचे आणि KRCL च्या विविध प्रोजेक्ट्सचे पर्यवेक्षण (Supervision) करणे.

वॉक-इन-इंटरव्ह्यू : दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी.

(२) टेक्निशियन्स (मेकॅनिकल) २३ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११).

वेतन श्रेणी : पे-मॅट्रिक्स लेव्हल – ४ मूळ वेतन रु. २५,५/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-.

पात्रता : मेकॅनिकल ट्रेड, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्समधील कोणत्याही ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट. (संबंधित ट्रेडमधील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)

कामाचे स्वरूप : KRCL च्या चालू असलेल्या गाड्यांची आणि विविध प्रोजेक्ट्सची देखभाल (Maintenance) करणे.

वॉक-इन-इंटरव्ह्यू : दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी.

रजा : ६ महिन्यांची सेवा पूर्ण केल्यावर उमेदवार १५ दिवसांच्या भरपगारी रजेसाठी पात्र ठरतील. याशिवाय कंत्राटी कर्मचारी वर्षाकाठी ८ दिवसांची नैमित्तिक रजा (Casual Leave); Weekly Off आणि इतर सार्वजनिक सुट्यांसाठी पात्र असतील.

अपवादात्मक प्रकरणात कंत्राटी कर्मचारी पात्र असल्यास वरच्या पदासाठी निवडले जाऊ शकतात.

वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) ३५ वर्षे (इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).

निवड पद्धती : वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या दिवशी प्रत्यक्ष अर्ज सादर केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल.

वॉक-इन-इंटरव्ह्यूचे ठिकाण : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स स्टेशनजवळ, सेक्टर ४०, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई.

इंटरव्ह्यूच्या दिवशी रजिस्ट्रेशन सकाळी ९.०० ते १२.०० वाजे दरम्यान केले जाईल.

अर्जासोबत जोडावयाची स्वयंसाक्षांकित कागदपत्रे –

(१) शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे.

(२) जन्मतारखेचा पुरावा (१० वीचे प्रमाणपत्र/जन्माचा दाखला). (३) केंद्र सरकारी नोकरीकरिता दिलेल्या स्वरूपातील अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस दाखले.

(४) दोन पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ.

(५) अनुभवाचा दाखला.

(६) गॅझेटेड ऑफिसर/एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने दिलेला उमेदवाराच्या चारित्र्याचा दाखला. http://www.konkanrailway.com या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील (Annexure- A) अर्ज वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या दिवशी प्रत्यक्ष सादर करावेत.