माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई – नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची कायम स्वरूपी भरती. एकूण रिक्त पदे – २३४. (Advt. No. TA- MP/ NE/ PER/९९/२०२४) (शिप बिल्डींग इंडस्ट्रीमधील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असलेल्या नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेटधारक उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य.)

(I) स्किल्ड- I (IDA- V) श्रेणीतील पदे – वेतन श्रेणी – रु. १७,००० – ६४,३६०.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”

(१) चिप्पर ग्राईंडर (कोणत्याही ट्रेडमधील NAC) – ६ पदे (इमाव – १, खुला – ५).

(२) काँपोझिट वेल्डर – २७ पदे (अजा – २, अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – २, खुला – १२).

(३) इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन) – ७ पदे

(४) इलेक्ट्रिशियन – २४ पदे

(५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १० पदे

(६) फिटर (फिटर/ मरिन इंजिनिअर फिटर/ शिप राईट (स्टील)) १४ पदे पात्रता : संबंधित ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा इतर कोणत्याही ट्रेडमधील शिपबिल्डींग इंडस्ट्रीमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि १ वर्षाचा अनुभव.

(७) गॅस कटर (स्ट्रक्चरल फिटर/ TIG/ MIG वेल्डर/गॅस कटर/स्ट्रक्चरल वेल्डर) – १० पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ७).

(८) ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर – १ पद (खुला).

पात्रता : M.A. (हिंदी किंवा इंग्रजी) पदवीला इंग्रजी/हिंदी विषय अभ्यासलेला असावा आणि ५ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य.

इष्ट पात्रता : हिंदीतून इंग्रजी व इंग्रजीतून हिंदी भाषांतराचा डिप्लोमा, कॉम्प्युटर नॉलेज हिंदी/इंग्लिश टायपिंगसह.

(९) ज्यु. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ५).

(१०) ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

पात्रता : इलेक्ट्रिकल/ पॉवर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ मरिन इंजिनीअरिंग विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका.

(११) ज्यु. क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर (मेकॅनिकल) – ७ पदे

पात्रता : मेकॅनिकल/ शिपबिल्डींग/ मरिन इंजिनीअरिंग इ. विषयांतील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण.

(१२) ज्यु. क्यु.सी. इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – ३ पदे

पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रूमेंटेशन/ पॉवर इंजिनीअरिंग/ मरिन इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाईड इंजिनीअरिंग पदवी/पदविका.

(१३) मिलराईट मेकॅनिक/ MMTM – ६ पदे (इमाव – २, खुला – ४).

(१४) मशिनिस्ट – ८ पदे (१५) ज्युनियर प्लानर इस्टिमेटर (मेकॅनिकल) – ५ पदे (इमाव – २, खुला – ३).

पात्रता : मेकॅनिकल/ शिप बिल्डींग/ मरिन इंजिनीअरिंग इ. विषयांतील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण.

(१६) ज्युनियर प्लानर इस्टिमेटर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद (खुला).

पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मरिन इंजिनीअरिंग इ. विषयांतील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण.

(१७) रिग्गर – १५ पदे (अजा – २,

पात्रता : संबंधित ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.

(१८) स्टोअर किपर/स्टोअर स्टाफ – ८ पदे (इमाव – २, खुला – ६).

पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग इ. विषयांतील डिप्लोमा किंवा डिग्री. मटेरिअल मॅनेजमेंट कोर्स आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यास प्राधान्य.

(१९) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/ स्ट्रक्चरल फिटर) – २५ पदे

पात्रता : संबंधित ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा कोणत्याही ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि MDL/ शिपबिल्डींग इंडस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरल फिटर कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

(२०) युटिलिटी हँड (स्किल्ड्) (फिटर ट्रेड/ इतर कोणताही ट्रेड आणि गॅस, वेल्डिंग प्लांटमधील १ वर्षाचा अनुभव) – ६ पदे (इमाव – १, खुला – ५).

पात्रता : फिटर/ मरिन इंजिनिअर फिटर/ शिपराईट (स्टील) ट्रेडमधील NAC किंवा कोणत्याही ट्रेडमधील NAC आणि शिपबिल्डींग इंडस्ट्रीमध्ये युटिलिटी हँड कामाचा १ वर्षाचा अनुभव किंवा गॅस/ वेल्डिंग प्लांट/ ऑक्सि अॅसिटीलीन इक्विपमेंट्समधील अनुभव.

(२१) वुडवर्क टेक्निशियन (कारपेंटर/ शिपराईट (वुड)) – ५ पदे

पात्रता : संबंधित ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा कोणत्याही ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि शिपबिल्डींग इंडस्ट्रिमधील संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

(II) सेमी स्किल्ड- I (IDA- II) श्रेणीतील पदे – वेतन श्रेणी – रु. १३,२०० – ४९,९१०

(२२) फायर फायटर्स – १२ पदे

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) फायर फायटिंगमधील किमान ६ महिने कालावधीचा डिप्लोमा/सर्टिफिकेट. उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असावा.

(२३) युटिलिटी हँड (सेमि स्किल्ड) – १८ पदे पात्रता : कोणत्याही ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि शिप बिल्डींग इंडस्ट्रीमधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

(२४) लायसन्स टू अॅक्ट इंजिनिअर – १ पद (खुला).

पात्रता : MMB/ MMD कडील सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी (Licence to Act Engineer) आणि २ वर्षांचा इंजिन ड्रायव्हर कामाचा अनुभव किंवा नौदलातील १५ वर्षांची सेवा आणि समतूल्य पात्रता. पोहता येणे अनिवार्य.

(२५) मास्टर फर्स्ट क्लास – २ पदे (खुला).

पात्रता : MMB/ MMD कडील सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी (फर्स्ट क्लास मास्टर) आणि ३ वर्षांचा ५६५ BHP आणि टग चालविण्याचा अनुभव किंवा नौदलातील १५ वर्षांची सेवा आणि समतूल्य पात्रता. पोहता येणे अनिवार्य.

ज्युनियर ट्रान्सलेटर पद वगळता इतर सर्व पदांसाठी गव्हर्नमेंट/ PSU शिप यार्डमधील शिपबिल्डींग/सेलिंग ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.

१० टक्के रिक्त पदे Ex- MDL अॅप्रेंटिससाठी राखीव.

वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी १८-३८ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) MDL चे माजी कर्मचारी ज्यांनी करार पद्धतीने केलेल्या कालावधी इतक्या वर्षांची वयाची सूट मिळेल.

अर्जाचे शुल्क : रु. ३५४/-. (अजा/ अज/ अपंग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

पात्र उमेदवारांची यादी MDL वेबसाईटवर दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल.

अपात्रतेवरील हरकती दि. ८ जानेवारी २०२५ पर्यंत घेता येतील.

ऑनलाइन परीक्षेचा दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी जाहीर केला जाईल.

परीक्षापूर्व प्रशिक्षण : अजा/ अज/ अपंग उमेदवारांना विनामूल्य ऑनलाइन परीक्षापूर्व ट्रेनिंग दिले जाईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तसे नमूद करावे.

ऑनलाइन अर्ज https:// mazagondock. in या संकेतस्थळावर १६ डिसेंबर २०२४ पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी ई-मेल mdlrecne@mazdock. com किंवा टेलीफोन नं. ०२२-२३७६४१४०/ ४१२३/ ४१७७ वर संपर्क साधा.

Story img Loader