सुहास पाटील
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ( PCMC) (जाहिरात क्र. ६७०/२०२४) अग्निशमन विभागातील ‘अग्निशमन विमोचन/ फायरमन रेस्क्युअर’ या गट-ड संवर्गातील एकूण १५० रिक्त पदांची सरळसेवेने भरती. (अजा – २०, अज – १०, विजा-अ – ४, भज-ब – ४, भज-क – ४, भज-ड – ३, विमाप्र – ३, इमाव – २९, ईडब्ल्यूएस – १५, एसईबीसी – १५, खुला – ४३) (होमगार्डसाठी ८ पदे, अनाथांसाठी २ पदे, खेळाडू – ५ टक्के, भूकंपग्रस्त – २ टक्के, प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, माजी सैनिक – १५ टक्के, महिला – ३० टक्के पदे आरक्षित)
वेतन श्रेणी – एस-६ रु. १९,९०० – ६३,२००/-.
पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण. (२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण. (३) एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १७ मे २०२४ रोजी २८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय/ अनाथ – ३३ वर्षे, खेळाडू – ४३ वर्षे, माजी सैनिक व त्यांचे पाल्य – ४५ वर्षे).
शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १६२ सें.मी.; वजन – पुरुष/ महिला – ५० कि.ग्रॅ.; छाती – पुरुष – ८१-८६ सें.मी.; दृष्टी – सामान्य (वर्णांधता नसावी).
हेही वाचा >>> चौकट मोडताना : नुपूरचे नृत्य
शारीरिक क्षमता चाचणी – पुरुष – (अ) १,६०० मी. धावणे – ३० गुण, (ब) जमिनीपासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४ वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्स्टेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासून शिडी २० फूट अंतरावर असेल.) – २० गुण, (क) ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मी. अंतर धावणे – २० गुण, (ड) २० फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे – २० गुण, (इ) पुलअप्स २० – १० गुण; एकूण १०० गुण.
महिला – (अ) ८०० मी. धावणे – ३० गुण, (ब) पुरुषांप्रमाणेच शिडीवर चढणे व उतरणे – २० गुण, (क) ४० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मी. अंतर धावणे – २० गुण, (ड) गोळाफेक – १० गुण, (इ) लांब उडी – १० गुण, (फ) पुशअप्स १० – १० गुण; एकूण १०० गुण. नमूद केलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्यांपैकी कोणत्याही एका शारीरिक मोजमापामध्ये/ चाचणीमध्ये उमेदवार अपात्र ठरल्यास पुढील उर्वरित चाचण्या घेण्यात येणार नाहीत व त्याला निवड प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, मागासप्रवर्ग – रु. ९००/-. माजी सैनिकांना फी माफ राहील. शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाते.
निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ तसेच बैठक व्यवस्था याची माहिती तसेच ऑनलाइन परीक्षेनंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
परीक्षेचे स्वरूप – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रत्येक १५ प्रश्न आणि अग्निशमन संबंधित ४० प्रश्न वस्तुनिष्ठ असे १०० प्रश्न असतील (MCQ स्वरूपाचे). प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० गुण, वेळ १२० मिनिटे (परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी).
लेखी परीक्षा १०० गुण आणि शारीरिक चाचणी १०० गुण.
शंकासमाधानासाठी संपर्क साधा ९१७३५३९४४४३६; ई-मेल आयडी pcmchelpdesk२०२४@gmail.comऑनलाइन अर्ज www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर दि. १७ मे २०२४ पर्यंत करावेत. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.