पंजाब नॅशनल बँक, ह्युमन रिसोर्सेस डिव्हिजन, हेड ऑफिस, नवी दिल्ली अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत २,७०० अॅप्रेंटिसेस पदावर २०२४-२५ साठी पदवीधर उमेदवारांची भरती.

काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Mumbai Metro Jobs 2024: mmrcl job mumbai metro vacancy 2024 eligibility salary details
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

(१) महाराष्ट्र – एकूण १४५ .

(२) गुजरात – ११७ (स्थानिय भाषा – गुजराती).

(३) आंध्र प्रदेश – २७ (स्थानिय भाषा तेलुगू /उर्दू).

(४) कर्नाटक – ३२ (स्थानिय भाषा कन्नड).

(५) मध्य प्रदेश – १३३ (स्थानिय भाषा – हिंदी).

(६) छत्तीसगड – ५१ (स्थानिय भाषा हिंदी).

(७) तेलंगणा – ३४ (स्थानिय भाषा – तेलुगू/उर्दू).

(८) गोवा – ४ (खुला) (स्थानिय भाषा कोंकणी).

महाराष्ट्र राज्यातील सर्कलनिहाय रिक्त पदांचा तपशील कोल्हापूर ७, मुंबई शहर ४३, मुंबई पश्चिम ३४, नागपूर ८, नाशिक – १४, पुणे – १७, ठाणे – २२.

वयोमर्यादा : दि. ३० जून २०२४ रोजी २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. ३० जून १९९६ ते ३० जून २००४ दरम्यानचा असावा.)

पात्रता : दि. ३० जून २०२४ रोजी पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील निर्दिष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे. (उमेदवारांनी ८ वी /१० वी /१२ वी/पदवीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.) (३१ मार्च २०२० नंतर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : महिलांचे वर्तमानकालीन प्रश्न

ट्रेनिंगचा कालावधी : १ वर्षे. (२ आठवड्यांचे बेसिक ट्रेनिंग आणि ५० आठवड्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग)

स्टायपेंड : अॅप्रेंटिसेसना दरमहा ग्रामीण/सेमी अर्बन रु. १०,०००/- अर्बन रु. १२,०००/- आणि मेट्रो रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती : ( i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा दि. २८ जुलै २०२४ रोजी घेतली जाईल. ज्यात (१) जनरल / फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज या विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येकी २५ गुणांसाठी एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे. प्रत्येक विषयासाठी पात्रतेचे किमान गुण मिळविणे आवश्यक नाही. परीक्षेचे माध्यम हिंदी, इंग्रजी. (१० वी किंवा १२ वीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्यास (तसा पुरावा गुणपत्रक / प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.) त्यांना टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज द्यावी लागणार नाही. अंतिम निवड वैद्याकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल.

लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

प्रतिक्षा यादी : राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.

ऑनलाइन परीक्षा २८ जुलै, २०२४ रोजी आयोजित केली जाईल. (tentative); ही जाहिरात अॅप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क : दिव्यांग रु. ४००/- + जीएसटी १८ टक्के = रु. ४७२/- (अजा/ अज/ महिला रु. ६००/- + जीएसटी १८ टक्के = रु. ७०८/-; इतर उमेदवारांना रु ८००/- + जीएसटी १८ टक्के = रु. ९४४/-)

निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या www.pnbindia.co.in किंवा http://bfsissc.com या संकेतस्थळावर ‘Recruitment Section’ मध्ये प्रसिद्ध केली जाईल. अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांग चे आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकरिता नेमून दिलेल्या नमुन्यातील (सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले) Caste/ Category सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक.

परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI- SSC मार्फत परीक्षेची तारीख आणि वेळ याविषयी इंटिमेशन पाठविले जाईल.

उमेदवारांनी नेमून दिलेल्या तारखेला आणि वेळी स्वत:चा कॅमेरा, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर ऑनलाईन लेखी परीक्षा द्यावयाची आहे. उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेले आयडी प्रूफ परीक्षेच्या वेळी Display करावे लागेल. रजिस्ट्रेशन/अॅप्लिकेशन प्रोसेस समजून घेण्यासाठी उमेदवारांनी www.pnbindia.in या संकेतस्थळावरील ‘Recruitment’ वर क्लिक करून Online application for engagement of Apprentices 2024-25 लिंक ओपन होईल किंवा
https://www.pnbindia.in/Recruitments.aspx वर उपलब्ध आहे. अॅप्रेंटिसशिप एन्ट्रन्स एक्झामिनेशन/टेस्टकरिता उमेदवारांनी http://www.bfsissc.com वरील ‘Career Opportunities’ सेक्शनवर आपले नाव रजिस्टर करावे. लागू असलेले परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने आपले प्रोफाईल पूर्ण करावे. (जर त्यांनी पुढील दोन गव्हर्नमेंट अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर यापूर्वी केलेले नसेल.)

( i) NAPS अॅप्रेंटिसशिप पोर्टल www. apprenticeshipindia.gov.in ( Apprentices login/ Registration Section) ( ii) https://nats.education.gov.in या NATS अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर ( Student Register/ Login Section) आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. (ज्या उमेदवारांनी पदवी परीक्षा दि. १ एप्रिल २०२० किंवा त्यानंतर उत्तीर्ण केली असेल त्यांनी) त्यानंतर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज दि. १४ जुलै २०२४ पर्यंत करावा. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यावर उमेदवारांना BFSI SSC कडून ई-मेल पाठविला जाईल. ज्यात NAPS अॅप्रेंटिस कोड नंबर आणि/किंवा NATS enrollment number विचारला जाईल.

Story img Loader