सुहास पाटील
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) मार्फत पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत/ डिपार्टमेंट्स/ विविध संस्था/ कार्यालयामध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांवर निवड करण्याकरिता घेण्यात येणारी ‘ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा – २०२३’ दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर झाली आहे. या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – (कंसात केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयात/ खाते/ कार्यालयात पदे भरली जातात हे नमूद केले आहे.) (ए) ज्युनियर ट्रान्सलेटर (सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सव्र्हिस (CSOLS)), (बी) ज्युनियर ट्रान्सलेटर (रेल्वे बोर्ड), (सी) ज्युनियर ट्रान्सलेटर आम्र्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ), (डी) ज्युनियर ट्रान्सलेटर/ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (केंद्र सरकारची सबऑर्डिनेट ऑफिसेस), (इ) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/ कार्यालये).
रिक्त पदांचा तपशील – एकूण ३६० पदे (अजा – ३८, अज – १४, इमाव – ७२, ईडब्ल्यूएस – २६, खुला – १५७) (१५ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – ७, HH – २, VH – ४, Others – २ साठी राखीव).
हेही वाचा >>> नोकरीची संधी
वेतन – पद कोड क्र. (ए) ते (डी) ज्युनियर ट्रान्सलेटर/ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी – पे-लेव्हल – ६ अंदाजे वेतन दरमहा रु.६५,०००/-. पद कोड क्र. (इ) सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ८१,०००/-.
पात्रता – (सर्व पदांसाठी) (दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी) हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.)
किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी (पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा परीक्षेचे माध्यम हिंदी असावे.)
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील हिंदी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्रजी असावे.
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील इंग्रजी माध्यमातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम हिंदी असावे.
किंवा हिंदी किंवा इंग्रजी वगळता कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदी/ इंग्रजीपैकी एक पदवीचे माध्यम असावे आणि त्यापैकी दुसरा विषय पदवीला अभ्यासलेला असावा.
आणि हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी ट्रान्सलेशनचा केंद्र/राज्य सरकारचे ऑफिस/पब्लिक सेक्टर अंडरटेकींगमधील २ वर्षांचा अनुभव. (सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.)
वयोमर्यादा – (१ ऑगस्ट २०२३ रोजी) ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत).
निवड पद्धती – पेपर-१ – (CBT ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतली जाईल.) (संगणक आधारित, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न) (i) जनरल हिंदी – १०० प्रश्न, १०० गुण. (ii) जनरल इंग्लिश – १०० प्रश्न, १०० गुण. एकूण २०० गुण, वेळ २ तास. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.) पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार पेपर-२ साठी निवडले जातात.
पेपर-२ – (वर्णनात्मक स्वरूपाचा) यात ट्रान्सलेशन आणि निबंध लेखन यांचा समावेश असेल. २०० गुण, वेळ २ तास. दोन उतारे भाषांतरासाठी दिलेले असतील. एक उतारा हिंदीतून इंग्लिश व दुसरा इंग्लिशमधून हिंदी आणि दोन निबंध एक हिंदीमध्ये व दुसरा इंग्लिशमध्ये. (पेपर-१ व पेपर-२ मधील कामगिरीवर आधारित उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना विविध पदांसाठी ऑनलाइन ऑप्शन – पदनिहाय पसंतीक्रम भरून द्यावा लागेल.) अंतिम निवड आणि मिनिस्ट्रीज/ डिपार्टमेंट्सचे वाटप पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेवर आधारित आणि उमेदवारांनी पदांसाठी/ खात्यांसाठी दिलेल्या पसंतीक्रमानुसार केली जाते. सर्व स्तरावरील परीक्षांचे अॅडमिशन सर्टिफिकेट्स स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागाचा (वेस्टर्न रिजन) संकेतस्थळा http://www.sscwr.net वरून अॅडमिशन सर्टिफिकेट डाऊनलोड करून प्रिंट्रआऊट काढता येतील.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
परीक्षा शुल्क – रु. ७०/- ऑनलाइन मोडने दि. १२ सप्टेंबर २०२३ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल.
सूचना – उमेदवारांनी पेपर-२ च्या उत्तरपत्रिकेत स्वतची ओळख देणारे आपले नाव, रोल नंबर, मोबाइल नंबर, पत्ता इत्यादी लिहू नये. या सूचनेचे पालन न केल्यास उमेदवारांना पेपर-२ मध्ये ० गुण दिले जातील.
परीक्षा केंद्र – अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ. ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यपद्धती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III/ Annexure- IV मध्ये दिलेली आहे. ऑनलाइन अर्जासोबत २३ मे २०२३ नंतर चष्म्याशिवाय काढलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ (३.५ बाय ४.५ JPEG/JPG २०- ५० KB) स्कॅन करून अपलोड करावा. स्कॅण्ड सिग्नेचर १०-२० KB (४ बाय २ cm.) अपलोड करणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज https:// http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर दि. १२ सप्टेंबर २०२३ (२३.०० वाजे)पर्यंत करता येतील. उमेदवारांना अर्जामध्ये काही बदल/सुधारणा करावयाची असल्यास Window for Application Correction दि. १३ व १४ सप्टेंबर २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत https://www.ssc.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध असेल.
१) वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (WCL), (कोल इंडिया लिमिटेडची सबसिडिअरी कंपनी) (Advt. No. WCL/ HRD/ Noti/ Trade Appr /२०२३-२४/४९ dtd. ०७.०८.२०२३) अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांची WCL च्या विविध इस्टॅब्लिशमेंटमध्ये १ वर्षांच्या अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता भरती. एकूण रिक्त पदे – ८७५. (I) फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिसेस – सिक्युरिटी गार्ड – एकूण – ६० पदे (बल्लारपूर – ७, चंद्रपूर – ७, वणी नॉर्थ – ५, वणी – ९, माजरी – ५, उमरेर – ५, नागपूर – ८, पेंच – ५, कान्हा – ४,
हेही वाचा >>> खुशखबर! एमपीएससीतर्फे जम्बो भरती; ‘या’ पदांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या..
पथखेरा – ५).
पात्रता – १० वी उत्तीर्ण. उमेदवार WCL च्या कोणत्याही एका युनिटसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
(II) आयटीआय उत्तीर्ण ट्रेड अॅप्रेंटिसेस –
१) COPA – एकूण २२४ पदे (बल्लारपूर – ३०, चंद्रपूर – २६, वणी नॉर्थ – ३२, वणी – ३५, माजरी – १२, उमरेर – ३, नागपूर – ३४, स्किल डेव्हलपमेंट सेंटर ( SDC) नागपूर – ७, पेंच – २६, कान्हा – ९, पथखेरा – १०).
२) फिटर – २२२ पदे (बल्लारपूर – ३४, चंद्रपूर – ४०, वणी नॉर्थ – ८, वणी – ३०, माजरी – १३, उमरेर – २०, नागपूर – ३०, पेंच – १०, कान्हा – १५, पथखेरा – २२).
३) इलेक्ट्रिशियन – एकूण २२५ पदे (बल्लारपूर – ३०, चंद्रपूर – ४०, वणी नॉर्थ – १६, वणी – २५, माजरी – १३, उमरेर – २०, नागपूर – ३०, पेंच – १४, कान्हा – १५, पथखेरा – २२).
४) वेल्डर (गॅस अॅण्ड इलेक्ट्रिक) – ५२ पदे (वणी नॉर्थ – ६, वणी – १०, माजरी – ३, उमरेर – ३, नागपूर – १७, पेंच – ८, पथखेरा – ५).
५) सव्र्हेअर – ९ पदे (वणी – ५, माजरी – ३, उमरेर – १). ६) मेकॅनिक डिझेल – ४२ पदे (वणी नॉर्थ – ६, वणी – ३०, माजरी – ६).
७) वायरमन – १९ पदे (उमरेर – २, नागपूर – १७).
८) ड्राफ्ट्समन (सिव्हील) – ८ पदे (माजरी – १, उमरेर – १, पथखेरा – ६).
९) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक –
६ पदे (माजरी). १०) टर्नर – ३ पदे (उमरेर – ३). ११) मशिनिस्ट – ५ पदे (पथखेरा – ५).
पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय (NCVT किंवा SCVT).
वयोमर्यादा – दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे)
स्टायपेंड – (i) फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिसेस (सिक्युरिटी गार्ड) साठी रु. ६,०००/- दरमहा. (ii) १ वर्ष कालावधीचा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ७,७००/-. (iii) २ वर्ष कालावधीचा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ८,०५०/- दरमहा.
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी – ITI ट्रेड अॅप्रेंटिसेससाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी १२ महिन्यांचा असेल.
फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिसेससाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी – अॅप्रेंटिसशिप नियमांनुसार.
निवड पद्धती – उमेदवारांना WCL च्या फक्त एका इस्टॅब्लिशमेंटमधील एका ट्रेडसाठी अर्ज करता येईल. उमेदवारांची निवड संबंधित इस्टॅब्लिशमेंट करेल. ज्या जिह्यात संबंधित इस्टॅब्लिशमेंट आहे त्या जिह्याचे डोमिसाईल उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. WCL च्या पेंच, कान्हा, पथखेरा इस्टॅब्लिशमेंट्स मध्य प्रदेश राज्यात येतात. इतर इस्टॅब्लिशमेंट महाराष्ट्र राज्यात येतात. संबंधित पात्रता परीक्षा (आयटीआय) मधील गुणवत्तेनुसार प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित इस्टॅब्लिशमेंट येथे बोलाविले जाईल. उमेदवारांना त्यांच्या ई-मेल मार्फत तसे कळविण्यात येईल. कागदपत्र पडताळणीनंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळवावे लागेल. त्यानंतर अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी उमेदवार निवडले जातील. उमेदवारांनी ट्रेड अॅप्रेंटिसशिप पोर्टल http://www.apprenticeshipindia.org वर रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाईन अर्ज www. westerncoal.in या संकेतस्थळावर दि. १६ सप्टेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.