● महाराष्ट्र शासनाच्या वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील गट-बपदांची भरती.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ( टढरउ) मार्फत होणार आहे. विविध विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब – एकूण ३१ पदे (वेतन श्रेणी रु. ५७,७०० १,११,५०० अधिक नियमानुसार भत्ते)

( I) (जाहिरात क्र. १६/२०२५)

(१) प्रोस्थोटोन्टिक्स अँड क्राऊन अँड ब्रिज (कृत्रिम दंतशास्त्र) ११ (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, साशैमाव – १, आदुघ – १, इमाव – १, खुला – ३).

( II) (जाहिरात क्र. १७/२०२५)

(२) मुखरोगनिदान व किरणशास्त्र (ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी) २ (अजा – १, अज – १).

( III) (जाहिरात क्र. १८/२०२५)

(३) दंतव्यंगोपचारशास्त्र (ऑर्थोडोंटिक्स अँड टेन्टोफेशियल ऑर्थोपेडिक्स) ५ (विजा-अ – १, साशैमाव – १, इमाव – १, खुला – २).

( IV) (जाहिरात क्र. १९/२०२५)

(४) बालदंतरोगशास्त्र (पेडिअॅट्रिक अँड प्रीव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री) ३ (अजा – १, अज – १, साशैमाव – १).

( V) (जाहिरात क्र. २०/२०२५)

(५) दंतशल्यशास्त्र (कॉन्झरव्हेटिव्ह डेंटिस्ट्री अँड एन्डोडोंटिक्स) १ (अज – १, भज-क – १, साशैमाव – १, आदुघ – १, इमाव – ३, खुला – ३).

पकूण रिक्त पदांपैकी महिलांसाठी ३० टक्के पदे व दिव्यांगांसाठी ४ टक्के पदे राखीव आहेत.

वयोमर्यादा – (दि. १० एप्रिल २०२५ रोजी) १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय)

पात्रता – (दि. १० एप्रिल २०२५ रोजी) बी.डी.एस. आणि डेंटल सर्जरीमधील मास्टर्स डिग्री.

अनुभव – क्लिनिकल असिस्टंट किंवा डेंटल सर्जन किंवा सिनियर रेसिडंट किंवा ट्युटर कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवटी जोडलेल्या विवरणपत्रामध्ये Schedule- II मधील तरतूदीनुसार प्रकाशनाची ( Journals Published) वर्गवारी ( Category I, II ÎIYUF III) लेखक ( Principal Author or Co- Authros व प्रकाशना संदर्भातील माहिती भरून स्वस्वाक्षरीत जोडपत्र सादर करणे आवश्यक आहे.) प्रस्तुत पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱया याबाबतचा तपशिल आयोगाच्या https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड पद्धती – प्राप्त अर्जांची संख्या जास्त असेल व त्यांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास अर्जांची छाननी करून उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेवून तसेच चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा शुल्क – खुला – ७१९ रुपये.

ऑनलाइन अर्ज https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल २०२५ करावेत.

‘सीएसआयआर’मध्ये २०९ रिक्त पदे

● काऊन्सिल ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च ( CSIR) – सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली ( CSIR- CRRI), CSIR – इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी ( CSIR- IGIB), CSIR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च ( CSIR- NIScPR), CSIR – नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ( CSIR- NPL) आणि CSIR – मुख्यालय या सर्व नवी दिल्ली स्थित लॅबोरेटरीज/संस्थांमध्ये पुढील एकूण २०९ पदांची भरती.

संस्थांनुसार रिक्त पदे – CSIR- CRRI – १५, CSIR- H०१२. – १२३, CSIR- IGIB – २३, CSIR- NIScPR – २६, CSIR- NPL – २२. एकूण २०९.

(१) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ( JSA) (जनरल/फिनान्स अँड अकाऊंट्स/स्टोअर्स अँड पर्चेस) ( Vacancy Code JSA २०२५०१) – एकूण १७७ पदे (अजा – १९, अज – ११, ईडब्ल्यूएस – ११, इमाव – ४४, खुला – ९२).

पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर टायपिंग स्पीड इंग्लिश – ३५ श.प्र.मि. (१०,५०० KDPH), हिंदी – ३० श.प्र.मि. (९,००० KDPH).

(२) ज्युनियर स्टेनोग्राफर ( JST( Vacancy Code JST २०२५०२) – एकूण ३२ पदे (अजा – ३, अज – १, ईडब्ल्यूएस – २, इमाव – ८, खुला – १८).

पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि DOPT च्या निकषांप्रमाणे स्टेनोग्राफी डिक्टेशन १० मिनिटांचे ८० श.प्र.मि. आणि ट्रान्सक्रिप्शनसाठी इंग्रजी ५० मिनिटे व हिंदी ६५ मिनिटे.

वयोमर्यादा – (दि. २१ एप्रिल २०२५ रोजी) खरअ – २८ वर्षे, खरळ – २७ वर्षे. (विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – ३५ वर्षे अशा अजा/अज महिला – ४० वर्षे)

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.

वेतन श्रेणी – JSA – पे-लेव्हल – २ (रु. १९,९०० – ६३,२००) अंदाजे दरमहा वेतन रु. ३८,३१०/-. JST – पे-लेव्हल – ४ (रु. २५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५१,९९०/-. दोन्ही पदांसाठी New Pension System लागू आहे.

निवड पद्धती –

(१) JSA पदांसाठी – लेखी परीक्षा – OMR बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट २०० प्रश्नांसाठी वेळ २ तास ३० मिनिटे. प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत विचारले जातील.

पेपर-१ मेंटल अॅबिलिटी टेस्ट १०० प्रश्न. प्रत्येकी २ गुण. एकूण २०० गुण, वेळ ९० मिनिटे.

(जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सिच्युएशनल जजमेंट इ.) चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जात नाहीत. पेपर-१ फक्त पात्रता स्वरूपाचा असेल.

पेपर-२ – ( i) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न आणि ( ii) जनरल इंग्लिश – ५० प्रश्न. प्रत्येकी ३ गुण. एकूण ३०० गुण, वेळ १ तास. चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट – फक्त पात्रता स्वरूपाची.

अंतिम गुणवत्ता यादी पेपर-२ मधील गुणांनुसार बनविली जाईल.

(२) ज्यु. स्टेनोग्राफर पदांसाठी ( JST) – ( i) लेखी परीक्षा – OMR बेस्ड किंवा कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट – २०० प्रश्न, वेळ २ तास. (जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ५० प्रश्न, ५० गुण; जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण; इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – १०० प्रश्न, १०० गुण, एकूण २०० गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.)

( ii) स्टेनोग्राफी प्रोफिशियन्सी टेस्ट – फक्त पात्रता स्वरूपाची. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे बनविली जाईल.

परीक्षा केंद्र – दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) मधील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.) ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती www. crridom. gov. in या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा १३ मधे दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज www. crridom. gov. in या संकेतस्थळावर दि. २१ एप्रिल २०२५ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com