● न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL) ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदांची GATE २०२३/२०२४/२०२५ स्कोअरवर आधरित भरती.

डिसिप्लिननुसार एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या रिक्त पदांचा तपशिल –

एकूण रिक्त पदे – ४०० (अजा – ६१, अज – ३२, इमाव – १११, ईडब्ल्यूएस् – ३९, खुला – १५७). यात बॅकलॉगच्या पदांचा समावेश आहे. (अजा – २, अज – २, इमाव – ४)

(१) मेकॅनिकल – १५० पदे (अजा – २३, अज – १२, इमाव – ४२, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ५८).

(२) केमिकल – ६० (अजा – ९, अज – ५, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला -२३)

(३) इलेक्ट्रिकल – ८० (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३२).

(४) इलेक्ट्रॉनिक्स – ४५ (अजा – ७, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८).

(५) इन्स्ट्रूमेंटेशन – २० (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).

(६) सिव्हील – ४५ (अजा – ७, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८).

एकूण २८ पदे दिव्यांग कॅटेगरी इ/ LV – w, D/ HH – w, OA/ OL etc. – ६, एएसडी/आयडी/एमआय – १० साठी राखीव.

पात्रता – संबंधित विषयातील आणि अलाईड विषयातील बी.ई./बी.टेक्. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित सब्जेक्ट कोडमधील GATE २०२३, २०२४ किंवा २०२५ चा स्कोअर.

कमाल वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०२५ रोजी २६ वर्षे. (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षे), (दिव्यांग – ६/३९/४१ वर्षे)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना १ वर्ष कालावधीच्या पुढील स्ट्रीमप्रमाणे Induction Course साठी पाठविले जाईल.

(१) प्रेशराईज्ड् हेवी वॉटर रिअॅक्टर ( PHWR) स्ट्रीम

(२) लाईट वॉटर रिअॅक्टर ( LWR) स्ट्रीम सिव्हील विद्याशाखा वगळता इतर विद्याशाखांतील पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्जामध्ये रिअॅक्टर स्ट्रीमसाठी पसंती द्यावी लागेल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजना ( ETs) DAE च्या इस्टॅब्लिशमेंटवरील भारतभरातील लोकेशन्स किंवा परदेशात नेमणूक दिली जाईल. काही ETs ना TAPS १ & २ ऑपरेटींग स्टेशन तारापूर येथे नेमले जाईल.

स्टायपेंड – ETs ना दरमहा रु. ७४,०००/- स्टायपेंड दिले जाईल. पुस्तकांसाठी अलाऊन्स रु. ३०,०००/- एकदाच दिले जातील. ETs ना NPCIL चे लॉजिंग व बोर्डींग अनिवार्य आहे.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ETs ना ‘सायंटिफिक ऑफिसर-सी’ (ग्रुप-ए) वर कायम केले जाईल. त्यांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वेतन – पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००) अंदाजे वेतन रु. १.१३ लाख प्रतिमाह.

याशिवाय परफॉर्मर्स, लिंक्ड् इन्सेंटिव्ह दिले जाईल.

निवड पद्धती – GATE २०२३/२०२४/२०२५ च्या स्कोअरनुसार १:१२ प्रमाणात शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा इंटरव्ह्यू९ ते २१ जून २०२५ दरम्यान घेतले जातील. उमेदवारांना इंटरव्ह्यूहिंदी किंवा इंग्रजी भाषेत देता येईल.

अंतिम निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल. (प्रतिक्षा यादी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत ग्राह्य असेल.)

मेडिकल फिटनेस पाहून अंतिम निवड करताना GATE स्कोअर विचारात घेतला जाणार नाही. निकाल www. npcilcareers. co. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. इंटरव्ह्यू पुढील सेंटर्सवर घेतले जातील – अणुशक्ती नगर, मुंबई; नरोरा अॅटॉमिक पॉवर स्टेशन NAPS, उत्तर प्रदेश; मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन ( MAPS) तामिळनाडू आणि कैगा जनरेटिंग स्टेशन ( KGS), कर्नाटक. इंटरह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रं तपासली जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-.

ऑनलाईन अर्जात GATE २०२३, २०२४, २०२५ च्या अॅडमिट कार्डवर GATE अथॉरिटीजने दिलेला रजिस्ट्रेशन नंबर नोंद करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. npcilcareers. co. in या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ (१६.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑफिसर आणि मॅनेजर पदे

● सेन्ट बँक होम फिनान्स लिमिटेड ( CBHFL), मुंबई – ऑफिसर आणि मॅनेजर पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – २१२. ( I) ऑफिसर – एकूण १११ पदे (अजा – १६, अज – १२, इमाव – २८, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४५).

(१) सेल्स मॅनेजर/ऑफिसर – ९४ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, आकुर्डी, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, वसई, वापी, अहमदाबाद, सुरत इ.

(२) कलेक्शन एक्झिक्युटिव्ह/ ऑफिसर – १७ पदे.

कामाचे ठिकाण – आकुर्डी, नागपूर, सुरत, वडोदरा इ.

पद क्र. १ व २ साठी पात्रता – (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) १२ वी उत्तीर्ण आणि होम लोन/मॉर्टगेज संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) १८ ते ३० वर्षे.

( II) ज्यु. मॅनेजर – एकूण ३४ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १४).

(३) क्रेडिट प्रोसेसिंग असिस्टंट/ज्यु. मॅनेजर – १८ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, आकुर्डी, कल्याण, वापी, अहमदाबाद इ.

(४) ब्रँच ऑपरेशन मॅनेजर – १६ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, कल्याण, पुणे, वापी इ. पद क्र. ३ व ४ साठी पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण आणि होम लोन/मॉर्टगेज संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – २१-२८ वर्षे. याशिवाय किमान ४/५/६/७ /८/१० वर्षांचा अनुभव आवश्यक असलेली इतर एकूण ६७ पदे.

सर्व पदांसाठी Annexure- II मधील विहीत नमुन्यातील अनुभवाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे.

निवड पद्धती – प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांचा इंटरह्यू घेतला जाईल. इंटरह्यूच्या वेळी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी जाहिरातीमधील पॅरा ११ मध्ये उपलब्ध आहे.

प्रोबेशन कालावधी – निवडलेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. अजा-अज ( Annexure- III)/ इमाव ( Annexure- IV) उमेदवारांनी केंद्र सरकारी नोकरीकरिता विहीत केलेल्या नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक. इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर उमेदवारांना www. cbhfl. com या वेबसाईटवरून Careers link/ admit card लिंकमधून डाऊनलोड करता येतील.

अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. १,५००/-; अजा/अज – रु. १,०००/-.ऑनलाइन अर्ज www. cbhfl. com या संकेतस्थळावर दि. २५ एप्रिल २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com