सुहास पाटील

केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन – ‘मल्टि टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ ( MTS) आणि हवालदार ( CBIC & CBN) परीक्षा २०२४’ जाहीर. वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल-१ अंदाजे दरमहा रु. ३३,८००/-.

Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
rbi junior engineer recruitment loksatta news
नोकरीची संधी : आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती
CBSE Recruitment 2025: Registration for 212 Superintendent & Junior Assistant posts
१२ वी पास तरुणांसाठी नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी; CBSE मध्ये २१२ रिक्त जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा कराल?

केंद्र सरकारच्या देशभरातील विविध खात्यांमध्ये/कार्यालयांमध्ये ‘मल्टि टास्किंग स्टाफ’ (mts) च्या एकूण ४,८८७ आणि CBIC व CBN मधील ‘हवालदार’च्या एकूण – ३,४३९ अशी एकूण ८,३२६ ग्रुप ‘सी’ पदांची भरती. रिक्त पदांचा नेमका तपशिल https://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (Candidates corner ; Tentative vacancy). काही पदे अपंगांसाठी राखीव आहेत. रिक्त पदांच्या १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. (एकूण २८७)

पात्रता : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १० वी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी – MTS पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९९ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.)

CBIC/ CBN मधील हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी १८ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९७ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.)

(उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा/ अज – ५ वर्षे; अपंग – खुला – १० वर्षे/ इमाव – १३ वर्षे/ अजा/ अज – १५ वर्षे) (घटस्फोटीत/ परित्यक्ता/ विधवा/ पुनर्विवाह न केलेल्या महिला – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अजच्या परित्यक्ता/ विधवा महिला – ४० वर्षेपर्यंत) (केंद्र सरकारमधील नागरी कर्मचारी (किमान सेवा ३ वर्षांची) – ४० वर्षेपर्यंत, अजा/अजचे केंद्र सरकारमधील कर्मचारी – ४५ वर्षेपर्यंत.)

हेही वाचा >>> नोकरीची संधी : स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती

इमाव उमेदवारांकडे दि. ३१ जुलै २०२४ रोजी नॉन-क्रिमी लियर दाखला धारण करणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क : १००/- (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने फी दि. १ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली व दमण व दिव या राज्यांचा/ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, पणजी इ. (उमेदवारांनी अर्ज करताना तीन केंद्रांसाठी पसंती क्रम द्यावयाचा आहे.)

निवड पद्धती : MTS पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन ( CBE) सत्र-१ व सत्र-२; हवालदार पदांसाठी CBE आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मापदंड चाचणी (PST) – कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन (CBE) ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. उइए परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित केली जाईल.

सत्र – १ – (I) न्यूमरिकल अँड मॅथेमॅटिकल अॅबिलिटी – २० प्रश्न, ६० गुण. (II) रिझनिंग अॅबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग – २० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे पूर्ण झाल्यावर सेशन-१ आपोआप बंद होईल. त्यानंतर सेशन-२ सुरू होईल. सत्र – २ – (I) जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, ७५ गुण. (II) इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – २५ प्रश्न, ७५ गुण, वेळ ४५ मिनिटे. सेशन-१ (सत्र-१) मध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सेशन-२ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. CBE नंतर योग्य वेळी आन्सर कीज् जाहीर केल्या जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी, आणि मराठी, कोंकणी, कन्नड, गुजराती, तामिळ, तेलगू, ऊर्दू इ. १३ स्थानीय भाषेत छापली जाईल. उमेदवारांनी भाषेचा पर्याय ऑनलाइन अर्जात नोंद करणे आवश्यक.

कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन : CBE सत्र – १ व सत्र – २ मध्ये पात्रतेसाठी किमान गुण – खुला गट – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – २५ टक्के व इतर कॅटेगरीजसाठी २० टक्के गुण आवश्यक. जे उमेदवार सत्र-१ मध्ये पात्र ठरतील त्यांचेच सत्र २ चे पेपर तपासले जातील.

MTS पदांसाठी राज्यनिहाय CBE सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.

CBIC व CBN मधील हवालदार पदांसाठी CBE मध्ये उत्तीर्ण झाल्यावर शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल, PET/ PST मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार उउअ निहाय/ कॅटेगरीनुसार निवड केली जाईल.

शारीरिक क्षमता चाचणी : ( i) ( PET) – पुरुषांसाठी – १६०० मीटर अंतर १५ मिनिटांत चालणे. महिलांसाठी – १ कि.मी. अंतर २० मिनिटांत चालणे.

शारीरिक मापदंड चाचणी : ( ii) (PST) – पुरुष – उंची – १५७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती ( ST) साठी उंची १५२.५ सें.मी.) छाती – ७६ ते ८१ सें.मी. महिला – उंची – १५२ सें.मी. ( ST साठी उंची १४९.५ सें.मी.), वजन – ४८ कि.ग्रॅ. (अजसाठी ४६ कि.ग्रॅ.) अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III आणि Annexure- IV मध्ये दिलेल्या आहेत.) त्या सूचना वाचून नीट समजून घेवून मगच ऑनलाइन अर्ज करावा.

Story img Loader