महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ
● महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे करारपद्धतीने पुढील १७ पदांची भरती.
(१) ज्यु. गार्डनर (माळी) १ पद (खुला). एकत्रित वेतन – दरमहा रु. २३,०००/-.
पात्रता – ८ वी उत्तीर्ण. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. संबंधित कामातील कौशल्य आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
(२) ज्यु. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – ५ पदे. एकत्रित वेतन – रु. ३०,०००/- अधिक इतर भत्ते.
पात्रता – ( i) पदवी उत्तीर्ण. ( ii) इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. उमेदवार टेक सॅव्ही असावा, एम्एस्-सीआय्टी उत्तीर्ण असावा.
(३) लायब्ररी रिस्टोअरर – २ पदे. एकत्रित वेतन – रु. ३०,०००/- अधिक इतर भत्ते.
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि विद्यापीठ किंवा सरकारी-निमसरकारी कार्यालयातील कामाचा २ वर्षांचा अनुभव आणि इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा व संगणकावरील प्रभुत्व असावे.
(४) प्लेसमेंट ऑफिसर – १ पद (खुला). वेतन श्रेणी – एकत्रित वेतन रु. ८५,०००/- दरमहा
पात्रता – ( i) एमबीए/ LL. M.मधील पदवी. ( ii) अॅडमिनिस्ट्रेशन/फिनान्शियल संबंधित कामे संगणकावर हाताळण्याचा अनुभव. ( iii) शैक्षणिक/इंडस्ट्रीमधील प्लेसमेंट किंवा तत्सम कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
(५) असिस्टंट रजिस्ट्रार – २ पदे.
पात्रता – पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.
(६) फिजिकल एज्युकेशन कम स्पोर्ट्स ऑफिसर – १ पद (खुला). एकत्रित वेतन – दरमहा रु. ८५,६५/-.
पात्रता – फिजिकल एज्युकेशन/फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स/स्पोर्ट्स सायन्समधील मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील पीएचडी.
(७) युनिव्हर्सिटी इंजिनिअर कम इस्टेट ऑफिसर – १ पद (खुला).
पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान १० वर्षांचा कन्स्ट्रक्शन आणि/किंवा मेंटेनन्स कामातील शासकीय कार्यपद्धतीप्रमाणे गुणवत्ता नियंत्रण.
(८) डेप्युटी रजिस्ट्रार – २ पदे (अजा – १, खुला – १). एकत्रित वेतन – दरमहा रु. १,२०,०००/-.
(९) डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन – १ पद (खुला). एकत्रित वेतन – दरमहा रु. १,२०,०००/- (प्रतिनियुक्ती – लेव्हल-१२ रु. ७८८०० २,०९,०००).
पद क्र. ८ व ९ साठी पात्रता – मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुणांसह किंवा UGC-x Point Scale Grade ‘B’ समतूल्य पदवी आणि ९ वर्षांचा अनुभव.
(१०) डेप्युटी लायब्ररियन – १ पद (खुला). एकत्रित वेतन – दरमहा रु. २,००,०००/- (प्रतिनियुक्ती – लेव्हल-१३ए रु. १,३१,४०० २,१६,०००).
पात्रता – लायब्ररी सायन्स/इन्फॉरमेशन सायन्स/डॉक्युमेंटेशन सायन्समधील मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कामाचा ८ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी १८ ते ३८ वर्षे.
अर्जाचे शुल्क – ज्यु. गार्डनर आणि लायब्ररी रिस्टोअरर पदासाठी खुला गट रु. १,०००/- अर्जाचे शुल्क https:// www. onlinesbi. sbi/ sbicollect/ या लिंकवरून भरावयाचे आहे.
अर्जाचा विहीत नमुना http:// www. nlunagpur. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह, अर्जाच्या शुल्कासह पुढील पत्त्यावर १५ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील असे रजिस्टर्ड पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावेत.
मुंबई विद्यापीठ
● मुंबई विद्यापीठात ग्रॅज्युएट/डिप्लोमा अॅप्रेंटिसेसची भरती. एकूण रिक्त पदे – ९४(१) इलेक्ट्रिशियन – ५ (२) कारपेंटर – ४
(३) प्लंबर – ३(४) मेसॉन – १०
पद क्र. १ ते ४ साठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट ( NCVT).
(५) फिनान्स अँड अकाऊंट्स असिस्टंट – १५. पात्रता – बी.कॉम. (टॅली, टायपिंग आणि एमएस-सीआयटी सर्टिफिकेटधारकांना प्राधान्य).
(६) लोअर ग्रेड स्टेनोग्राफर – ४.पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) (मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफी प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य).
(७) लॉ असिस्टंट – ४. पात्रता – कायदा विषयातील पदवी.
(८) लॅब असिस्टंट – १०. पात्रता – विज्ञान विषयातील पदवी.
(९) लायब्ररी असिस्टंट – २. पात्रता – लायब्ररी सायन्स पदवी.
(१०) मल्टिटास्क ऑपरेटर – २५. पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील).
(११) ड्रायव्हर – ४ पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि मोटर ड्रायव्हिंग लायसन्स.
पद क्र. ७ ते १० साठी टायपिंग आणि एमएस-सीआयटी सर्टिफिकेटधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
(१२) ज्यु. इंजिनीअर (सिव्हील) ६
(१३) ज्यु. इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) २ पद क्र. १२ व १३ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका.
स्टायपेंड – १ वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेसना दरमहा रु. ९,०००/- आणि डिप्लोमा अॅप्रेंटिसेसना दरमहा रु. ८,०००/- स्टायपेंड दिले जाईल. (कार्यक्षम उमेदवारांचे स्टायपेंड वाढविले जाऊ शकते.)
अॅप्रेंटिसेस म्हणून रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर उमेदवारांनी संबंधित पदासाठी ठअळर २.० पोर्टलवर दि. १७ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करावा.
शंकासमाधानासाठी ई-मेल – natssupport_ student@aicte- india. org ÎIYUF hrdc. recruitment@mu. ac. in
अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती मुंबई विद्यापीठाच्या www. mu. ac. in या संकेतस्थळावरील Careers सेक्शनमधील जाहिरातीसोबत दिलेल्या Annexure- I मध्ये उपलब्ध आहे. suhaspatil237 @gmail. com