एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited) (AIASL) (पूर्वीची एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड) (AiATSL) – मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी पुरुष व महिला उमेदवारांची पुढील ग्राऊंड ड्युटी पदांवर भरती. (उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी वॉक-इन भरतीसाठी सकाळी ०९.३० ते १२.३० पर्यंत हजर रहावे.) एकूण रिक्त पदे : मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट – ३२५६. ( Ref. No. AIASL/०५-०३/ HR/३११ dt. २८.०६.२०२४)

(१) पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ३ पदे. एकत्रित वेतन : दरमहा रु. २७,४५०/-. पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (नर्सिंग) उमेदवार संगणक चालविण्यात निपुण असावा. हिंदी/ इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

(२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ४०६ पदे. एकत्रित वेतन : दरमहा रु. २७,४५/-. पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा (हिंदी/ इंग्रजी/ स्थानिय भाषा या विषयांसह) १० वी उत्तीर्ण आणि मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर ट्रेडमधील आयटीआय NCTVT सर्टिफिकेट (एकूण ३ वर्षं कालावधी) वेल्डर ट्रेड पात्रताधारकाकडे १ वर्षाचा अनुभव आवश्यक आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स (ट्रेड टेस्टच्या वेळी सादर करणे.)

(३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – २६३ पदे. एकत्रित वेतन : दरमहा रु. २४,९६/-. पात्रता : १० वी उत्तीर्ण. (ट्रेड टेस्टसाठी येताना HMV ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येणे आवश्यक.)

(४) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – ९१ पदे. एकत्रित वेतन : दरमहा रु. २९,७६/- पात्रता : बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग)

उमेदवाराकडे हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. निवड झाल्यास हजर झाल्या दिवसापासून १२ महिन्यांच्या आत अवजड वाहन (HMV) ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे आवश्यक. (Aviation experience किंवा जीएस् इक्विपमेंट्स/ वेहिकल/ हेवी अर्थ मुव्हर्स इक्विपमेंट मेंटेनन्समधील अनुभव असल्यास प्राधान्य.)

(५) हँडी मॅन (पुरुष) – २२१६ पदे.

पात्रता : १० वी उत्तीर्ण (इंग्रजी भाषा वाचता येणे आणि समजणे आवश्यक). एकत्रित वेतन : दरमहा रु. २२,५३०/-.

(६) युटिलिटी एजंट्स (पुरुष) – २२ पदे. एकत्रित वेतन : दरमहा रु. २२,५३०/-. पात्रता : १० वी उत्तीर्ण. (स्थानिय आणि हिंदी भाषा अवगत) वरील सर्व पदांची भरती करार पद्धतीने ३ वर्षांच्या मुदतीसाठी (Fixed Term Contract) केली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी वाढविला जावू शकतो.

वॉक-इनसाठीचे ठिकाण : जीएसडी काँप्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, उरटक एअरपोर्ट टर्मिनल – २, गेट नं. ५, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९.

आणि इतर सारी पदे जेथे ०९/१२/१५ वर्षे अनुभव आवश्यक आहे जसे की (७) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर – ९ पदे, (८) ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – ४२ पदे, (९) ड्युटी ऑफिसर कार्गो – १९ पदे, (१०) ज्यु. ऑफिसर कार्गो – ५६ पदे, (११) ड्युटी मॅनेजर रँप – ४० पदे, (१२) ज्यु. ऑफिसर कस्टमर सर्व्हिस – ४५ पदे इ. पदांची माहिती AIASL च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

वयोमर्यादा : (दि. १ जुलै २०२४ रोजी) पद क्र. १ ते ६ पदांसाठी २८ वर्षे. वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे).

निवड पद्धती : पद क्र. २ व ३ साठी (अ) ट्रेड टेस्ट (ट्रेड नॉलेज आणि HMV ड्रायव्हिंग टेस्ट), (ब) इंटरव्ह्यू.

पद क्र. १ (पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह) व पद क्र. ४ ज्यु. ऑफिसर टेक्निकल – (अ) पर्सोनल/ Virtual इंटरव्ह्यू आणि /किंवा (ब) ग्रुप डिस्कशन.

पद क्र. ५ व ६ साठी शारीरिक क्षमता चाचणी (PET) (जसे की वजन उचलणे, धावणे) आणि पर्सोनल/व्हर्च्युअल इंटरव्ह्यू.

निवड प्रक्रिया : एकाच दिवशी किंवा पुढील दिवशी घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. (डिमांड ड्राफ्ट ‘ AI Airport Services Limited’ यांचे नावे मुंबई येथे देय असावा.) (अजा/ अज/माजी सैनिक यांना फी माफ आहे.) (डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवाराने आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहावा.)

रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर चिकटवावा. (फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.)

अर्जाचा विहीत नमुना www.aiasl.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १२/१३ जुलै २०२४ पद क्र. (१) पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ३ पदे, पद क्र. ४ ज्युनियर ऑफिसर टेक्निकल – ९१ पदे, पद क्र. ७ डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – २ पदे, पद क्र. ८ ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – ६ पदे, पद क्र. ९ डेप्युटी ऑफिसर – ७ पदे इ.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १४/१५ जुलै २०२४ (२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ४०६ पदे आणि पद क्र. (३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – २६३ पदे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १६ जुलै २०२४ – पद क्र. ५ हँडी मॅन (पुरुष) – २२१६ पदे व पद क्र. ६ युटिलिटी एजंट (पुरुष) – २२ पदे. पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वॉक-इन सिलेक्शन दिनांकास सकाळी ९.३० ते १२.३० वाजे दरम्यान विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत इतर मूळ कागदपत्रे व स्वयंसाक्षांकीत प्रती घेऊन उपस्थित रहावे.