इंडियन बँक ( Indian Bank) (भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची सन २०२४-२५ करिता भरती. एकूण पदे १५००. महाराष्ट्रातील रिक्त पदे ६८ (अजा ६, अज ६, इमाव १८, ईडब्ल्यूएस ६, खुला ३२ (२ पदे दिव्यांग कॅटेगरी VI आणि ID साठी राखीव)).
पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा ३१ मार्च २०२० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : (दि. १ जुलै २०२४ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९६ ते १ जुलै २००४ दरम्यानचा असावा.) कमाल वयोमर्यादेत सूट इमाव ३ वर्षे; अजा/अज ५ वर्षे;
दिव्यांग खुला १० वर्षे, इमाव १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे. विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला खुला ३५ वर्षे, इमाव ३८ वर्षे, अजा/ अज ४० वर्षे. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान मेट्रो आणि शहरातील उमेदवारांना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिला जाईल व ग्रामीण/ अर्ध शहरी रु. १२,०००/-.
टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानीय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (ज्या उमेदवारांनी १० वी व १२ वीला संबंधित राज्यातील स्थानीय भाषा अभ्यासली असेल त्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लँग्वेज टेस्ट द्यावयाची गरज नाही.)
निवड पद्धती : ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (१) रिझनिंग अॅप्टिट्यूड अँड कॉम्प्युटर नॉलेज, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, (४) जनरल फिनान्शियल अवेअरनेस. प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, कालावधी प्रत्येकी १५ मिनिटे, एकूण १०० प्रश्न, वेळ ६० मिनिटे. लेखी परीक्षा विभागीय (मराठी) भाषेमधून घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. इंटरव्ह्यू घ्यावयाचा की नाही हे बँक ठरवेल. राज्यनिहाय कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बनविली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवाराचे वैद्याकीय फिटनेस तपासून मगच नेमणूक दिली जाईल. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची असेसमेंट टेस्ट घेतली जाईल. (थिअरी असेसमेंट इारक सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया ( इारक ररउ) करेल आणि प्रॅक्टिकल असेसमेंट बँकेकडून केली जाईल.)
उमेदवारांना NATS पोर्टल https://nats.education.gov.in ( Student Register/ Student Login वर आपले नाव यापूर्वी रजिस्टर केले नसेल तर रजिस्टर करावे लागेल. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर Indian Bank Apprenticeship Engagement शोधून त्यावर अर्ज करा. अर्ज केल्यानंतर Application Management मधून Application Status चेक करा.
अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस रु. ५००/- (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
परीक्षा केंद्र : छ. संभाजी नगर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ टटफ/ नागपूर/ पुणे/ नाशिक/ जळगाव/ अमरावती, अहमदनगर. ऑनलाइन अर्जासोबत (१) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (४.५ सें.मी. × ३.५ सें.मी.) (२०-५० KB), (२) स्वाक्षरी (१०-२० KB), (३) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (२०-५० KB), (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र (५०-१०० KB) (रुंदी १० सें.मी. × उंची ५ सें.मी.) स्कॅन करून अपलोड करावयाच्या आहेत.
उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील ३ जिल्ह्यांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२४.
अजा/ अज/ इमाव उमेदवारांनी Govt.of India ने Prescribed केलेल्या Format मधील दाखले कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक. विस्तृत माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक http://www.indianbank.in या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे.