Maharashtra Maritime Board Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई अंतर्गत ‘गट-अ बंदर अधिकारी’ पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी बोर्डाने भरती जाहीर केली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई भरती २०२३
पदाचे नाव – गट-अ बंदर अधिकारी
एकूण पदसंख्या – एक
शैक्षणिक पात्रता –
- मास्टर (परदेशी जाणारे) योग्यतेचे प्रमाणपत्र, भारत सरकारने किंवा D.G शिपिंगद्वारे मान्यताप्राप्त.
- डेक ऑफिसर म्हणून पाच वर्षांचा अनुभव ज्यापैकी एक वर्ष परदेशी जाणाऱ्या व्यापारी शिपवर मास्टर म्हणून असणे आवश्यक.
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – ४८ वर्षे
अर्जाची पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
ई-मेल पत्ता – essttceommb@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – mahammb.maharashtra.gov.in.
पगार –
गट-अ बंदर अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला महिना १ लाख ३३ हजार ४०० रुपये इतका मिळणार आहे.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1_5noDXSrdD2IKICbWeXilasfOu_X8SEu/view?pli=1) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.