पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Powergrid) (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांच्या पूर्ण मालकीची कंपनी पॉवरग्रिड एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (PESL) मध्ये पुढील ११७ पदांची भरती.

(१) (जाहिरात क्र. CC/०९/२०२४) ‘ट्रेनी सुपरवायझर (इलेक्ट्रिकल)’ ( Post ID 430) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ७० (अजा – १०, अज – ५, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३०) (३ पदे दिव्यांग (कॅटेगरी HI, LD आणि ID साठी प्रत्येकी १ पद) राखीव) (७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव तसेच ३ पदे अक्षम ( disabled) माजी सैनिक/ कारवाईत शहीद झालेले माजी सैनिक यांवर अवलंबून असलेले).

EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
union bank job
नोकरीची संधी: युनियन बँकेत अधिकारी पदाची संधी
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
TRAI New Rule, Jio, Airtel, Vi customers
TRAI New Rule : Jio, Airtel आणि Vi ग्राहकांचे ‘या’ तारखेपासून वाढणार टेन्शन! OTP बाबतच्या नियमात केला मोठा बदल
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
Success Story Of Sarvesh Mehtani
Success Story : स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे स्वप्न, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये मिळवले ३३७ गुण; वाचा सर्वेश मेहतानीचा प्रवास

पात्रता : (दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी) ३ वर्षांचा पूर्ण वेळ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम्स इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल)डिप्लोमा किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.) (डिप्लोमाशिवाय उच्च शिक्षण घेतले असलेले उमेदवार पात्र नाहीत.)

वयोमर्यादा : (दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी) २७ वर्षे (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे, दिव्यांग – ३७ वर्षे).

वेतन श्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. त्यांना रु. २४,००० – ३ टक्के १,०८,०००/- या वेतन श्रेणीमधील मूळ वेतन २४,०००/- वर नेमणूक दिली जाईल. ( IDA, HRA and Perks @ 12% of Basic Pay per month) १ वर्षाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना सब-ज्युनियर इंजिनिअर ( Sq Level) वर कायम केले जाईल.

निवड पद्धती : लेखी परीक्षा/कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) ऑब्जेक्टिव्ह टाईप १७० प्रश्न प्रत्येकी १ गुण असे १७० गुणांसाठी वेळ २ तास. (पार्ट- क – १२० प्रश्न (टेक्निकल नॉलेज टेस्ट (संबंधित डिसिप्लिनवर आधारित)) पार्ट- कक – ५० प्रश्न अॅप्टिट्यूड टेस्ट ( AT) (व्होकॅब्युलरी, व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग अॅबिलिटी, डेटा सफिशिअन्सी अँड इंटरप्रीटेशन, न्यूमरिकल अॅबिलिटी यावर आधारित प्रश्न)) लेखी परीक्षा डिसेंबर २०२४/जानेवारी २०२५ मध्ये आयोजित केली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. अंतिम निवड लेखी परीक्षा/ उइळ मधील गुणानुक्रमे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्टमधून पात्र ठरल्यानंतर नेमणूक दिली जाईल.

परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर, हैद्राबाद, भोपाळ, बेंगलुरू इ.

अर्जाचे शुल्क : रु. ३००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) अधिकृत वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये दिलेल्या https:// www. powergrid. in/ online- payment- application- fee या लिंकवर क्लिक करून फी भरता येईल.

शंकासमाधानासाठी recruitment@powergrid. in वर मेल पाठवा. ( Recruitment of Trainee Supervisor ( Electrical for PESL ( Post ID 430)-; Subject matter -)) असे ई-मेलच्या सब्जेक्ट मॅटरमध्ये लिहिणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज https:// www. powergrid. in या संकेतस्थळावर दि. ६ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. -; Career Section-; job opportunities -; openings -; Regional openings -; Recruitment of Trainee Supervisor ( Electrical)) ऑनलाइन अर्जासोबत जाहिरातीमधील पॅरा ६ मध्ये दिलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

(२) (जाहिरात क्र. CC/०८/२०२४) पदाचे नाव – ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ( Post ID 429) – एकूण ४७ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी HI – १, LD – १ साठी राखीव).

पात्रता : B. E./ B. Tech. (इलेक्ट्रिकल/ इलेक्टिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम्स इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल) किमान ६० गुणांसह उत्तीर्ण आणि GATE २०२४ मधील EE विषयाचा स्कोअर.)

वयोमर्यादा : (दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी) २८ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

वेतन श्रेणी : एक वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा मूळ वेतन रु. ३०,०००/- अधिक IDA, HRA, Perks @ १२ इतके वेतन दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना असिस्टंट इंजिनिअर (वेतन श्रेणी रु. ३०,००० – १,२०,०००) ( IDA) मधील Eo लेव्हलवर कायम केले जाईल.

निवड पद्धती – GATE २०२४ मधील १०० पैकी नॉर्मलाईज्ड केलेल्या गुणांनुसार उमेदवार Behavioral Assessment, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. ग्रुप डिस्कशनच्या वेळी कागदपत्र पडताळणी केली जाईल. ग्रुप डिस्कशनमध्ये पात्रतेचे गुणांची अट नाही. GATE २०२४ स्कोअर साठी ८५ टक्के वेटेज, ग्रुप डिस्कशनसाठी ३ टक्के आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी १२ टक्के वेटेज देऊन अंतिम निवड केली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

शंकासमाधानासाठी recruitment@powergrid. in वर ‘Trainee Engineer sqsu for PSEL (Post Code 429)’ असे सब्जेक्ट लाईनमध्ये नमूद करून मेल करावा.

ऑनलाइन अर्ज https:// www. powergrid. in या संकेतस्थळावर (सोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.) दि. ६ नोव्हेंबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader