सुहास पाटील
१) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), (संरक्षण मंत्रालयांतर्गत, भारत सरकारचा उपक्रम). BEL च्या गाझियाबाद युनिटमध्ये ट्रेनी ऑफिसर- I, ट्रेनी इंजिनीअर आणि प्रोजेक्ट इंजिनिअर पदांची तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ९५. ( I) ट्रेनी ऑफिसर- क – (१) ह्युमन रिसोर्स – ३ पदे (खुला).
पात्रता – पदवी आणि ३ वर्ष कालावधीचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन्स/ पर्सोनल मॅनेजमेंटमधील एमबीए/एमएसडब्ल्यू/ पीजी डिग्री/ पीजी डिप्लोमा.
(२) ट्रेनी ऑफिसर- I – फिनान्स – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).
पात्रता – पदवी आणि एमबीए (फिनान्स) उत्तीर्ण.
(II) ट्रेनी इंजिनीअर- क – ४७ पदे. स्ट्रीमनुसार रिक्त पदांचा तपशील –
(१) इलेक्ट्रॉनिक्स – ३० पदे (अजा – १, अज – ५, इमाव – ९, खुला – १५). पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन इ. मधील इंजिनीअिरग पदवी.
(२) कॉम्प्युटर सायन्स – १७ पद (अजा – २, अज – १, इमाव – ६, खुला – ८).
पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/इन्फॉर्मेशन सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग पदवी उत्तीर्ण.
अनुभव – ट्रेनी इंजिनीअर- क पदांसाठी अनुभव आवश्यक नाही.
(III) प्रोजेक्ट इंजिनीअर- क – ४० पदे. स्ट्रीमनुसार रिक्त पदांचा तपशील –
(१) इलेक्ट्रॉनिक्स – २९ पदे (अजा – २, अज – ८, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ८).
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/कम्युनिकेशन इंजिनीअिरग पदवी.
(२) मेकॅनिकल – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअिरग पदवी.
(३) कॉम्प्युटर सायन्स – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).
पात्रता – कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअिरग/आयटी पदवी.
पात्रता – सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट लागू नाही.)
अनुभव – प्रोजेक्ट इंजिनीअर- क पदांसाठी संबंधित इंडस्ट्रीमधील किमान २ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
वयोमर्यादा – (दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी) ट्रेनी ऑफिसर- क/ ट्रेनी इंजिनीअर- क पदांसाठी २८ वर्षे, प्रोजेक्ट इंजिनीअर- क पदांसाठी ३२ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
वेतन – ट्रेनी ऑफिसर- क/ ट्रेनी इंजिनीअर- क पदांसाठी – पहिल्या वर्षी
रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ४०,०००/-.
प्रोजेक्ट इंजिनीअर- I पदांसाठी पहिल्या वर्षी रु. ४०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ४५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ५०,०००/-, चौथ्या वर्षी रु. ५५,०००/-.
याशिवाय ज्या उमेदवारांना BEL च्या विविध साईट्सवर आणि कस्टमर लोकेशन्सवर पोस्टींग दिले जाईल, त्यांना दरवर्षी प्रत्येकी रु. १२,०००/- इतर खर्चासाठी दिले जातील. (सर्व पदांसाठी एरिया अलाऊन्स एकत्रित मानधनाच्या १० टक्के दरमहा दिला जाईल.)
निवड पद्धती – सर्व पदांसाठी लेखी परीक्षेतून पर्सोनल इंटरह्यूकरिता उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील. लेखी परीक्षेतील ८५ गुण व इंटरह्यूमधील १५ गुण देऊन अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षा अंदाजे सप्टेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडय़ात आयोजित केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे आणि वेबसाईटवरून कळविण्यात येईल.
अंतिम निवड यादी www. bel- india. in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
अर्जाचे शुल्क – ट्रेनी इंजिनीअर- क रु. १७७/- (रु. १५०/- १८ टक्के जीएसटी).
प्रोजेक्ट इंजिनीअर- क रु. ४७२/- (रु. ४००/- १८ टक्के जीएसटी). (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने SBI Collect द्वारे भरावयाचे आहे. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरल्यावर एक ‘SBI Collect reference No.’ जनरेट होईल.
तो ऑनलाइन अर्जामध्ये इतर माहिती भरण्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.
शंकासमाधानासाठी ई-मेल : belgzb1 @jobapply. in विस्तृत माहिती www. bel- india. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज कसा करावा – उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी वेगवेगळे अर्ज/ फी भरावी लागेल. ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. (पासपोर्ट आकाराचा फोटो, १० वीचे प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, अनुभवाचा दाखला इ.) ऑनलाइन अर्ज www. bel- india. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील लिंक https:// jobapply. in/ bel2023 AugGZBTETOPE मधून दि. ७ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करणे आवश्यक.
इंडियन कोस्ट गार्ड (( ICG)) (संरक्षण मंत्रालय) मध्ये असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर) च्या एकूण ४६ पदांवर पदवीधर पुरुष/ महिला उमेदवारांची भरती. (०२/२०२४ बॅच). ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशील –
(१) असिस्टंट कमांडंट (जनरल डय़ुटी) (पुरुष) – २५ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – १, खुला – १२).
पात्रता – पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
१२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयांत सरासरी ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत किंवा डिप्लोमानंतर पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना डिप्लोमा (मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयासह) सरासरी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) असिस्टंट कमांडंट (कमर्शियल पायलट एन्ट्री) ( CPL- SSA) (पुरुष/महिला) –
पात्रता – १२ वी (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांत) किमान सरासरी ५५टक्के गुण मिळवून उत्तीर्ण किंवा इंजिनिअरींग डिप्लोमा फिजिक्स, मॅथेमॅटिक्स विषयांसह सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन ( DGCA)यांनी जारी केलेले कमर्शियल पायलट लायसन्स ( CPL)धारक असावा.
(३) असिस्टंट कमांडंट-टेक्निकल (मेकॅनिकल; इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) (फक्त पुरुष) – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०).
(अ) टेक्निकल मेकॅनिकल ब्रँच.
पात्रता – ( I) मेकॅनिकल/ मरिन/ नेव्हल आर्किटेक्चर/ऑटोमोटिव्ह/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल अॅण्ड प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ डिझाईन/ एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस विषयांतील इंजिनीअिरग पदवी किमान सरासरी ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण
किंवा संबंधित डिसिप्लीनमधील
इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्सकडील समतूल्य पात्रता.
(ब) टेक्निकल (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) ब्रँच.
पात्रता – ( I) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ टेली कम्युनिकेशन/ इन्स्ट्रमेंटेशन/ इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअिरग/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयांतील इंजिनीअिरग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा संबंधित डिसिप्लीनमधील इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्सकडील समतूल्य पात्रता. आणि ( II) १२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयात सरासरी किमान ५५टक्के गुण आवश्यक किंवा इंजिनीअिरग डिप्लोमा (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह) किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(उर्वरित उद्याच्या अंकात)