युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ‘कंबाईंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२५’ दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेणार आहे. (Exam- Notice No. ०१/२०२५ GEOL) UPSC या परीक्षेतून कंबाईंड जीओ सायंटिस्ट मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील. त्यातून पुढील पदांची भरती करणार आहे.

(I) ‘जीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI)’, मिनिस्ट्री ऑफ माईन्समधील कॅटेगरी- I पदे.

(१) जीऑलॉजिस्ट – ग्रुप-ए – १६ पदे.

(२) जीओफिजिसिस्ट – ग्रुप-ए – ६ पदे.

(३) केमिस्ट ग्रुप-ए – २ पदे.

आणि (II) ‘सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड’ (CGWB) मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेसमधील कॅटेगरी- II ची ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘बी’ पदे –

(४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) ग्रुप-ए – १३ पदे.

(५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) ग्रुप-ए – १ पद,

(६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) ग्रुप-ए – १ पद.

(७) असिस्टंट हैड्रोजीलॉजिस्ट ग्रुप-बी – ३१ पदे,

(८) असिस्टंट केमिस्ट ग्रुप-बी – ४ पदे,

(९) असिस्टंट जीओफिजिसिस्ट ग्रुप-बी – ११ पदे.

पात्रता : पद क्र. (१) जीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) मधील जीओलॉजिस्ट पदांसाठी जीऑलॉजिकल सायन्स/ जीऑलॉजी / अॅप्लाईड जीऑलॉजी/जीओएक्स्प्लोरेशन/मिनरल एक्सलरेशन/ मरिन जीऑलॉजी/ कोस्टल एरिया स्टडीज/ जीओकेमिस्ट्री/ ओशियानोग्राफी/ पेट्रोलियम जीओ सायन्सेस इ. विषयातील मास्टर्स डिग्री.

पद क्र. (२) GSI मधील जीओफिजिसिस्ट आणि C. G. W. B. मधील पद क्र. (६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) आणि पद क्र. (९) असिस्टंट/जीओफिजिसिस्ट ग्रुप-बी या पदांसाठी एम्.एस्सी. (फिजिक्स/अॅप्लाईड फिजिक्स/जीओफिजिक्स/अॅप्लाईड जीओफिजिक्स /मरिन जीओफिजिक्स इ.)

पद क्र. (३) केमिस्ट आणि पद क्र. (५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) या पदांसाठी एम्.एस्सी. (केमिस्ट्री/अॅप्लाईड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री)

पद क्र. (४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) ग्रुप-ए आणि पद क्र. (७) असिस्टंट हैड्रोजीऑलॉजिस्ट ग्रुप-बी – जीऑलॉजी /अॅप्लाईड जीऑलॉजी/ मरिन जीऑलॉजी/ हायड्रोजीऑलॉजी या विषयांतील पदव्युत्तर पदवी.

पद क्र. (८) असिस्टंट केमिस्ट ग्रुप-बी – एम.एस्सी. (केमिस्ट्री/अॅप्लाईड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री/ फिजिकल केमिस्ट्री/ इनऑरगॅनिक केमिस्ट्री/ ऑरगॅनिक केमिस्ट्री/ हैड्रो केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री).

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (परीक्षेच्या स्टेज-३ साठी निवडलेल्या उमेदवारांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा स्टेज-३ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म भरते वेळी सादर करणे आवश्यक आहे.)

वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) सर्व पदांसाठी २१ ते ३२ वर्षेपर्यंत. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी २००४ दरम्यानचा असावा.) इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत, (दिव्यांग उमेदवार – खुलागट – ४२ वर्षेपर्यंत, इमाव – ४५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४७ वर्षेपर्यंत); (GSI आणि CGWB चे कर्मचाऱ्यांसाठी संबंधित खात्यातील पदांसाठी – ३९ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती : स्टेज-१ कंबाईंड जीओसायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२५ (ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर्स ४०० गुणांसाठी) जी दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल. यातून स्टेज-२ साठी रिक्त पदांच्या ६ ते ७ पट उमेदवार निवडले जातील. (पेपर-१ जनरल स्टडीज – १०० गुणांसाठी, वेळ २ तास; पेपर-२ संबंधित विषयावर आधारित ३०० गुणांसाठी, वेळ २ तास) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. कॅलक्युलेटर वापरास परवानगी नाही.

परीक्षा केंद्र : मुंबईसह देशभरातील १९ केंद्रे.

स्टेज-२ कंबाईंड जीओसायंटिस्ट (मेन) एक्झामिनेशन, २०२४ (पारंपरिक पद्धतीचे पेपर्स – ६०० गुणांसाठी) (संबंधित विषयावर आधारित २०० गुणांसाठी ३ पेपर्स प्रत्येकी ३ तासांसाठी) परीक्षेच्या वेळी (नॉन-प्रोग्रॅमेबल टाईप पॉकेट) कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी असेल.

परीक्षा केंद्र : मुंबईसह देशभरातील ९ केंद्रे.

स्टेज-३ पर्सोनॅलिटी टेस्ट/इंटरव्ह्यू – २०० गुणांसाठी. (यातील पात्रतेसाठी गुणांची कोणतीही अट नाही.)

अंतिम निवड स्टेज-१ प्रीलिमिनरी एक्झामिनेशन, स्टेज-२ मेन एक्झामिनेशन आणि स्टेज-३ पर्सोनॅलिटी टेस्ट/इंटरह्यूमधील एकत्रित कामगिरीवर आधारित केली जाईल. समान पात्रतेचे निकष असलेल्या दोन्ही पदांसाठी उमेदवार एकच अर्ज करू शकतात.

अर्जाचे शुल्क : रु. २००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

(कंबाईंड जीओ-सायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन २०२४ साठी) ऑनलाईन अर्ज https:// www. upsconline. nic. in या संकेतस्थळावर दि. २४ सप्टेंबर २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी फोन नं. ०११२३३८११२५/ २३३८५२७१/ २३०९८५४३.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो दि. २५ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान उपलब्ध असेल.