पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) Advt. No. CC/०८/२०२३ dt. २६.०९.२०२३. इंजिनिअर ट्रेनी पदांची GATE-२०२४ स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – ४३५. डिसिप्लिननिहाय रिक्त पदांचा तपशिल – अधिक चिन्हानंतर दाखविलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.
(१) इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल): ( i) पॉवरग्रिडमध्ये एकूण २९३ पदे. ( ii) सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया ( CTUIL) मधील एकूण ३८ पदे .
पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम्स इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल)) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील) : पॉवर ग्रिड – ४७ पदे .
पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(३) इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) : ( i) पॉवरग्रिड – २* पदे (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ASL/ SLD/ MI साठी राखीव.)
( ii) CTUIL – १२ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ASD/ SLD/ MI साठी राखीव).
पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(४) इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) : पॉवर ग्रिड – ३१ पदे (अजा – ४ १, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LD/ HI साठी प्रत्येकी १ पद राखीव).
( ii) CTUIL – ६ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ३).
पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
सर्व पदांसाठी उमेदवार GATE-२०२४ संबंधित सब्जेक्ट कोड पेपर उत्तीर्ण असावा. पदवी गुणपत्रिकेत CGPA/ OGPA/ DGPA मध्ये दर्शविलेले गुणांचे विद्यापीठाच्या नियमानुसार समतूल्य टक्केवारीमध्ये रूपांतर करणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा : (दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी) २८ वर्षे.
वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.
निवड पद्धती : GATE-२०२४ परीक्षेतील संबंधित विषयातील नॉर्मलाईज्ड केलेले (१०० पैकी) गुण, ग्रुप डिस्कशन आणि पर्सोनल इंटरह्यू यांचा समावेश असेल. GATE-२०२४ परीक्षेतील संबंधित विषयातील नॉर्मलाईज्ड स्कोअर (१०० पैकी) नुसार उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यांना पॉवरग्रिडच्या वेबसाईटवर इंटरह्यूसाठीचे कॉल लेटर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांना ते candidates login मधून डाऊनलोड करता येईल. पर्सोनल इंटरव्ह्यूमध्ये पात्रतेसाठी किमान गुण खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ४० टक्के, इतर राखीव पदांसाठी ३० टक्के. ग्रुप डिस्कशनसाठी किमान पात्रतेचे गुण नसतील.
GATE-२०२४ (१०० पैकी) गुणांसाठी ८५ टक्के वेटेज, ग्रुप डिस्कशनसाठी ३ टक्के आणि पर्सोनल इंटरव्ह्यूसाठी १२ टक्के वेटेज देऊन अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल. ऑनलाईन अर्जात दिलेल्या पसंतीक्रमानुसार उमेदवारांना पॉवरग्रिड किंवा CTUIL साठी मेडिकल एक्झामिनेशननंतर नेमणूक दिली जाईल.
वेतन : एक वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान ट्रेनीजना रु. ४०,०००/- मूळ वेतनावर १२ टक्के भत्ता, IDA, HRA दिला जाईल.
ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना इंजिनिअर E२ स्केल रु. ५०,००० – ३ टक्के – १,६०,००० IDA वर कायम केले जाईल.
रु. ५०,०००/- मूळ वेतनावर IDA, HRA (किंवा अकोमोडेशन), परफॉर्मन्स रिलेटेड अलाऊन्स आणि इतर देय भत्ते दिले जातील.
अर्जाचे शुल्क : रु. ५००/- पॉवरग्रिडच्या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून भरावेत. ( https:// www. powergrid. in/ online- payment- application fees)
ऑनलाइन अर्ज www. powergrid. in या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून दि. ४ जुलै २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी recruitment@powergrid. in वर सब्जेक्टमध्ये Engineer Trainee – २०२४ with brief description of query & gt;’ असे नमूद करून मेल करावा.