सुहास पाटील
१) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई (जाहिरात क्र. प्र.क्र. ६३/२०२२) गट-क पदांची सरळसेवा भरती-२०२३. एकूण रिक्त पदे – ३४५. (१) पुरवठा निरीक्षक, गट-क – एकूण ३२४ पदे. वेतन श्रेणी – एस -१० (२९,२०० – ९२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५५,०००/-.
( i) कोकण विभाग – ४७ पदे (अजा – ६, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – २, इमाव – ९, विमाप्र – २, आदुघ – ५, खुला – १७) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV, D/ HH साठी प्रत्येकी १ पद राखीव).
( ii) पुणे विभाग – ८२ पदे (अजा – १०, अज – ६, विजा-अ – ३, भज-ब – ३, भज-क – ३, भज-ड – १, इमाव – १५, विमाप्र – १, आदुघ – ११, खुला – २९) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV, D/ HH, OH साठी प्रत्येकी १ पद राखीव) (अनाथांसाठी १ पद राखीव).
( iii) नाशिक विभाग – ४९ पदे (अजा – ६, अज – ३, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – १०, विमाप्र – १, आदुघ – ५, खुला – १८) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी इ/ छश् व ऊ/ साठी प्रत्येकी १ पद राखीव).
( iv) छत्रपती संभाजीनगर विभाग – ८८ पदे (अजा – ११, अज – ६, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – २, इमाव – १७, विमाप्र – २, आदुघ – ९, खुला – ३३) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV, D/ HH, OH U SLD साठी प्रत्येकी १ पद राखीव) (१ पद अनाथांसाठी राखीव).
( v) अमरावती विभाग – ३५ पदे (अजा – ५, अज – ३, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – ७, विमाप्र – १, आदुघ – ५, खुला – ८) (१ पद दिव्यांग कॅटेगरी B/ LV साठी राखीव).
( vi) नागपूर विभाग – २३ पदे (अजा – २, अज – ४, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – १, विमाप्र – ८, खुला – ०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी B/ LV साठी राखीव).
(२) उच्च स्तर लिपिक, गट-क – २१ पदे. वेतन श्रेणी – एस -८ (२५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४५,०००/-.
वित्तीय सल्लागार व उपसचिव यांचे कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
पद क्र. (१) व (२) साठी पात्रता – (दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) (पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)
वयोमर्यादा – (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) किमान वयोमर्यादा १८ पूर्ण. कमाल वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, मागासवर्गीय /अनाथ/ आदुघ/प्रावीण्यप्राप्त खेळाडू – ४३ वर्षे, दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त – ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन – ५५ वर्षे. क्रिमी लेयरमध्ये मोडणाऱ्या विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना वयाची ही सवलत लागू राहणार नाही.
निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा एकूण गुण २००, कालावधी २ तास, परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी. ((१) मराठी, (२) इंग्रजी, (३) सामान्य ज्ञान, (४) बौद्धिक चाचणी व अंकगणित प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण. पात्रतेसाठी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक.)
मराठी व इंग्रजी प्रश्नपत्रिकेचा दर्जा १२ वी स्तरावरील; सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेसमान.
एकूण रिक्त पदांच्या ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव आहेत. प्रस्तुत परीक्षेकरिता अभ्यासक्रमाचा तपशील जाहिरातीमधील परिशिष्ट-३ मध्ये नमूद करण्यात आला आहे. अर्ज नोंदणीबाबतच्या सूचना जाहिरातीमधील परिशिष्ट-६ मध्ये देण्यात आल्या आहेत.
अर्ज सादर करताना उमेदवारांना ६ विभागांतील एकूण २२ केंद्रांपैकी परीक्षा केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करावयाची कागदपत्रे यांची सूचना जाहिरातीमधील परिशिष्ट-६ मध्ये उपलब्ध आहे.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; मागासवर्गीय/ आदुघ/ दिव्यांग/अनाथ – रु. ९००/-; माजी सैनिकांना फी माफ आहे.
परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाइन ई-पावतीची प्रत ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रे तपासणीचेवेळी सादर करणे आवश्यक.
उमेदवार पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या दोन्ही पदांसाठी वेगवेगळा अर्ज करू शकेल. उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार व गुणवत्तेनुसार निवडले जातील. प्रवेशपत्र परीक्षा दिनांकाच्या ७ दिवस अगोदर ऑनलाइन काढून घेता येईल.
पुरवठा निरीक्षक संवर्गातील निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
सदर जाहिरात विभागाच्या https:// mahafood. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शंकासमाधानासाठी http:// cgrs. ibps. in या लिंकवर किंवा १८००१०३४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ fcscpdjun23/ या संकेतस्थळावर दि. ३१ डिसेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.