बृहन्मुंबई महानगरपालिका ( MCGM), कर निर्धारण व संकलन (जाहिरात क्र. कवसं/१९१७/एमसी/२०२४-२५ दि. १६ सप्टेंबर २०२४). बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थानेवरील गट-क मधील ‘निरीक्षक’ पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – १७८.
पदाचे नाव : निरीक्षक (वर्ग-क) (Inspector) – १७८ पदे (अजा – ११, अज – ३, विजा-अ – ३, भज-ब – ४, भज-क – २, इमाव – ३२, आदुघ – १८, सा.शै.मा.व. – १८, खुला – ८७).
महिलांसाठी – ३०, माजी सैनिक – १५, प्रकल्पग्रस्त – ५, भूकंपग्रस्त – २, खेळाडू – ५, अंशकालीन पदवीधर – १० पदे राखीव. अनाथ उमेदवारांसाठी २ पदे आरक्षित आहेत.
दिव्यांग उमेदवारांसाठी ४ जागा राखीव. (एकूण ७ पदे (कॅटेगरी इ/ LV – २, D/ HH – २, OA/ OL/ DW/ AAV – २ पदे, MI/ SLD/ ASD/ ID/ MD – १ पदे राखीव)).
पात्रता : (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी) (i) १० वीची परीक्षा उत्तीर्ण. (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी किंवा तत्सम पदवी. (iii) उमेदवार इ. १० वीची माध्यमिक शालांत परीक्षा १०० गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. (iv) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. वेगाची शासनाचे प्रमाणपत्र. दिव्यांग/ अनाथ उमेदवारांना टंकलेखनाची (मराठी/इंग्रजी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या कालावधीत व २ संधींत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्यात येईल.
१५ वर्षे सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक जे १० वी उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्रधारक असतील ते या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण. अमागास – ३८ वर्षेपर्यंत; मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आदुघ – ४३ वर्षेपर्यंत; दिव्यांग/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त/ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य – ४५ वर्षेपर्यंत; अंशकालीन – ५५ वर्षेपर्यंत; माजी सैनिक – सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी ३ वर्षे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱयांसाठी वयोमर्यादेची अट नाही. तथापि त्यांनी खाते प्रमुखाचे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे अनिवार्य राहील.
निवड पद्धती : बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ. १२ वी) समान राहील. (१) मराठी भाषा व व्याकरण – १० प्रश्न, (२) इंग्रजी भाषा व व्याकरण – १० प्रश्न, (३) सामान्य ज्ञान- १५ प्रश्न, (४) अंकगणित – १५ प्रश्न, (५) मुं.म.न.पा. अधिनियम १८८८ ५० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक.
इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. अंतिम निवड ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. निवड यादी https:// portal. mcgm. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
शंकासमाधानासाठी कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्र. ९५१३१६७४४३ (सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (दुपारी १.३० ते २.३० जेवणाची वेळ वगळता) (सोमवार ते शनिवार)) संपर्क साधा.
ऑनलाइन परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; मागासवर्गीय – रु. ९००/- ऑनलाइन पद्धतीने भरता येतील.
ऑनलाइन अर्ज https:// portal. mcgm. gov. in/ for prospects/ Careers- AII/ Recruitment/ Assessment & Collection या संकेतस्थळावर दि. १९ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.