Pune Metro Rail Bharti 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ –

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

एकूण पदसंख्या – १३४

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

नोकरीचे ठिकाण – नागपूर, पुणे आणि नवी मुंबई.

वयोमर्यादा – १७ ते २४ वर्षे

अर्ज शुल्क – १००

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home

पगार –

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या (https://drive.google.com/file/d/1RxfnXH7NA8BmoAlOq0MtpgsE5TYCpQLh/view) लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity for 10th pass candidates in metro recruitment for 134 posts of apprentices under maha metro has started jap