Maharashtra State Excise Department Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत लघु लेखक (निम्म श्रेणी), लघुटंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क), चपराशी पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ –

पदाचे नाव – लघु लेखक (निम्म श्रेणी), लघुटंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान-नि-वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क), चपराशी.

एकूण रिक्त पदे – ७१७

शैक्षणिक पात्रता –

घु लेखक (निम्म श्रेणी) : १० वी पास + १०० श.प्र.मि. लघुलेखन + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. परीक्षा पास.

लघुटंकलेखक : १० वी पास + ८० श.प्र.मि. लघुलेखन + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. परीक्षा पास.

जवान (राज्य उत्पादन शुल्क) : १० वी पास.

जवान-नि-वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क) : ७ वी पास + वाहनचालक परवाना.

चपराशी : १० वी पास.

हेही वाचा – पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! NIV पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.

ओबीसी – ३ वर्षांची सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

अधिकृत वेबसाईट – https://stateexcise.maharashtra.gov.in

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १७ नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1Z3FP0EhtuSSdUre4RwcD5rHdrQlzJAMZ/view