CNP Nashik Recruitment 2023 : चलन नोट मुद्रणालय नाशिक (CNP Nashik) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२३ आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिक भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चलन नोट मुद्रणालय नाशिक (CNP Nashik) भरती २०२३ –

पदाचे नाव – सुपरवायझर, आर्टिस्ट, ज्युनिअर टेक्निशियन.

एकूण रिक्त पदे – ११७

सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग) : प्रिंटिंग विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी किंवा प्रिंटिंग विषयात पदवी.

सुपरवायझर (अधिकृत भाषा) : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.

आर्टिस्ट : ५५ टक्के गुणांसह फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल विषयात पदवी.

सेक्रेटरिअल असिस्टंट : ५५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी इंग्लिश किंवा हिंदी ४० श.प्र.मि.

जुनिअर टेक्निशियन : संबंधित विषयात ITI + NCVT/ SCVT सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा.

हेही वाचा- पदवीधरांना भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी! ‘या’ पदाच्या ४९६ जागांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – नाशिक.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १९ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://cnpnashik.spmcil.com/en/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1w71M369vZ-q-0kB0RccDipmG7kmvTTyC/view) आ लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity for graduate and diploma candidates currency note press nashik recruitment for various posts jap