Bank of Baroda Recruitment 2023 : सरकारी कार्यालयात किंवा बॅंकेत नोकरी करणं आताच्या तरुण पिढीला आवडतं. जर तुम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. इथे एक्वीजिशन अधिकाऱ्यांच्या पदांसाठी योग्य उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. या रिक्रूटमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून एकूण ५०० जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या पदांच्या निकषात बसत असतील आमि या क्षेत्रात काम करण्याची आवड असेल, ते रिक्त जागांसाठी अर्ज करु शकतात.
ही आहे शेवटची तारीख
बॅंक ऑफ बडोदाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १४ मार्च २०२३ शेवटची तारीख आहे. या भरती प्रकियाच्या माध्यमातून ऑल इंडिया मध्ये अॅक्वीजिशन ऑफिसरची निवड करण्यात येईल. कोणत्या क्षेत्रात किती पद आहेत? याबाबत माहिती घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर दिलेलं नोटिफिकेशन चेक करु शकता.
पात्रता निकष काय आहेत?
बॅंक ऑफ बडोदाच्या एक्वीजिशन ऑफिसर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने कोणत्याही स्ट्रीममध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचं आहे. तसंचे उमेदवाराकडे पब्लिक बॅंक, खासगी बॅंक, फॉरेन बॅंक, ब्रोकिंग फार्म, सिक्योरिटी फर्म, अॅसेट मॅनेजमेंट कंपनी यापैकी कुठेही काम केल्याचा अनुभव असला पाहिजे. या पदासाठी वयोमर्यादा २१ ते २८ वर्ष आहे. सविस्तर माहिती नोटिफिकेशमध्ये तपासू शकता.
निवड आणि पगार
बॅंक ऑफ इंडियाच्या या पदांवर उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि सायकोमॅट्रिक झाल्यानंतर करण्यात येईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना चांगलं वेतनही मिळेल. मेट्रो सिटीत पोस्टिंग झाल्यावर वर्षाला ५ लाख रुपये आणि नॅनो मेट्रो सिटीत पोस्टिंग झाल्यावर वर्षाला ४ लाख रुपये कमवू शकता.
अर्ज करण्यासाठी शुल्क किती?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना ६०० रुपये शुल्क द्यावं लागेल. तर एससी, एसटी, महिला उमेदवार आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.