NFC Bharti 2023: आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांच्या काही पदाच्या काही जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. तर या भरती अंतर्गत एकूण २०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. आण्विक इंधन कॉम्प्लेक्स भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आण्विक इंधन कॉम्प्लेक्स भरती २०२३
पदाचे नाव – ITI ट्रेड अप्रेंटिस
एकूण पदसंख्या – २०६
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी आणि ITI चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा – कमाल वय १८ वर्षे असावे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
फिटर | ४२ |
टर्नर | ३२ |
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) | ६ |
इलेक्ट्रिशियन १५ | १५ |
मशीनिस्ट | १६ |
मशिनिस्ट (ग्राइंडर) | ८ |
परिचर ऑपरेटर (केमिकल प्लांट) | १५ |
केमिकल प्लांट ऑपरेटर | १४ |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | ७ |
मोटर मेकॅनिक | ३ |
लघुलेखक (इंग्रजी) | २ |
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) | १६ |
वेल्डर | १६ |
मेकॅनिक डिझेल | ४ |
सुतार | ६ |
प्लंबर | ४ |
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
अधिकृत वेबसाईट – http://www.nfc.gov.in
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1KiurlmnT62GWE9Icz5OJFU9GtesH77Gr/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.