AIIMS Nagpur Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (AIIMS) अंतर्गत ज्युनिअर रेसिडेंट पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२३
पदाचे नाव – ज्युनिअर रेसिडेंट.
एकूण रिक्त पदे – २५
शैक्षणिक पात्रता – MBBS + इंटरशिप पूर्ण.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – २१ ते ३३ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
हेही वाचा- पदवीधरांना राष्ट्रीय तपास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! महिना ५६ हजारांहून अधिक पगार मिळणार
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS प्रवर्ग – ५०० रुपये.
- मागासवर्गीय – २५० रुपये.
नोकरीचे ठिकाण – नागपूर.
अधिकृत बेवसाईट – https://aiimsnagpur.edu.in/
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ७ सप्टेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०२३
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1cltE4HrEMcWvx12qvAdVlAZ-CWAPw5cC/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.