पुण्यात नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दूरसंचार विभाग पुणे येथे अभियंता, कनिष्ठ वायरलेस अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२३ आहे.
पदाचे नाव – अभियंता, कनिष्ठ वायरलेस अधिकारी
पद संख्या – १६
वयोमर्यादा – ६४ वर्षापेक्षा कमी
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक ४१७, संचार भवन, २०, अशोका रोड, नवी दिल्ली- ११०००१
ई-मेल – sumish.82@gov.in.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
हेही वाचा- इंजिनिअर्सना रेल्वेत नोकरीची संधी! मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ‘या’ पदासाठी भरती सुरु
शैक्षणिक पात्रता –
अभियंता –
- इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशनसह दूरसंचार अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विशेष विषय म्हणून रेडिओ कम्युनिकेशन किंवा भौतिकशास्त्र आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशनसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी.
- किंवा,
- M.Sc पदवी किंवा वायरलेस कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्ससह समतुल्य.
कनिष्ठ वायरलेस अधिकारी –
I) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून दूरसंचार किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ कम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.
किंवा
(II) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून सागरी मोबाइल किंवा एक्रो-मोबाइल कम्युनिकेशन्समधील प्रमाणपत्र.
असा करा अर्ज –
भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाबरोबर आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२३ ही आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1tSXXCQBCOC8Em8gKmWSngk8UhH_oWoiT/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.