Doordarshan Recruitment 2023: तुम्हाला जर व्हिडिओग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे प्रसार भारती दूरदर्शन न्यूजने पूर्णवेळ कराराच्या आधारावर व्हिडिओग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार व्हिडिओग्राफर पदाच्या ४१ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठीचे आवश्यक पात्रता निकष, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराच्या कामाचा कालावधी २ वर्षांपर्यंत असेल. निवडलेल्या उमेदवाराचे पोस्टींग नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

aiims nagpur announced recruitment for various posts offering youth golden job opportunity
नोकरीची सुवर्णसंधी… नागपूर एम्समध्ये या पदासाठी भरा अर्ज…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Skill-based education is the door to development says Haribhau Bagde
कौशल्याधारित शिक्षणातूनच विकासाचे दार – हरिभाऊ बागडे
Nashik Saraf Association and Police discussed installing high qualitycctv cameras to prevent thefts
दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना, सराफ व्यावसायिक-पोलीस आयुक्त बैठक
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
NTPC Recruitment 2025: Monthly Pay Up To Rs 1.4 Lakh, No Written Test Needed
NTPC Recruitment 2025: लेखी परीक्षेशिवाय इंजिनिअरची भरती! पगार १.४० लाख; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
irieen Indian Railways Institute of Electrical Engineering
‘इरिन’समोर कुशल मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान, विद्युत रेल्वे इंजिन वापराची शतकपूर्ती
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया

पदाचे नाव – व्हिडिओग्राफर

हेही वाचा- २ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती; राज्य कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी

रिक्त जागा – एकूण रिक्त जागा ४१

अर्ज करण्याची मुदत –

या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया १८ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशनच्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वयोमर्यादा –

दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, १८ एप्रिल २०२३ रोजी उमेदवारांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पात्रता आणि अनुभव –

दूरदर्शन भर्ती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, आवश्यक पात्रता आणि अनुभव खाली नमूद केला आहे.

हेही वाचा- चौथी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी! फक्त ‘एवढं’ काम जमायला हवं

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण असावा. तसेच त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. तसेच MOJO मधील अनुभव असलेल्या आणि शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल. इच्छुक उमेदवाराला व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी किंवा अन्य समकक्ष क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार –

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना ४० हजार रुपये मासिक मानधन देण्यात येणार आहे.

कालावधी –

दूरदर्शन भरती २०२३ अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराची भरती पूर्ण-वेळ कराराच्या आधारावर करण्यात येणार असून त्याचा कामाचा कालावधी २ वर्षांचा असणार आहे.

कामाचे ठिकाण – नवी दिल्ली.

निवड प्रक्रिया –

व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारी केली जाईल. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल. चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत –

इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना काही अडचण आल्यास, त्रुटीच्या स्क्रीनशॉटसह hrcell413@gmail.com वर उमेदवार ईमेल करू शकतात.

Story img Loader