आयुक्त, अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये (मुंबई/ नागपूर/ छत्रपती संभाजी नगर) विभागातील ‘विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित’ व ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)’च्या एकूण ५६ पदांवर भरती. (जाहिरात क्र. १/२०२४)

(१) वरिष्ठ तांत्रिक सहायक (Sr. Technical Assistant) (गट-क) – एकूण ३७ पदे.

Use artificial intelligence with caution RBI governor advises banks print eco news
कृत्रिम प्रज्ञेचा वापर काळजीपूर्वकच, रिझर्व्ह बँक गव्हर्नरांचा बँकांना सल्ला 
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?
Is waking up late better than rising early? A neurologist breaks it down for us Sleep tips
लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात
Medicine
अखेर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिली यादी जाहीर
centers of Excellence will be established in the state to improve the quality of health care Mumbai news
आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार
supreme court Tightening the law on child pornography
यूपीएससी सूत्र : चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन् ‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रम, वाचा सविस्तर…
upsc preparation marathi news
UPSC ची तयारी: अर्थशास्त्र विषयाची तोंडओळख

महिलांसाठी ३० पदे राखीव, माजी सैनिकांसाठी १५ पदे राखीव, दिव्यांग – १ पद राखीव.

पात्रता : विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र (Pharmacy) पदवी.

वेतन श्रेणी : एस-१३ (३५,४०० – १,१२,४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

(२) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) (गट-ब) अराजपत्रित – एकूण १९ पदे महिलांसाठी ६ पदे, दिव्यांग – १ पद राखीव (D/ HH कॅटेगरी).

पात्रता : औषध निर्माण शास्त्र पदवी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमधील पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी आणि औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव.

वेतन श्रेणी : एस-१४ (३८,४०० १,२२,८) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

वयोमर्यादा : अमागास – १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन – ५५ वर्षे.

निवड पद्धती : दोनही पदांसाठी ऑनलाइन परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाइप) स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. (सेक्शन- I – इंग्लिश लँग्वेज – १५ प्रश्न, सेक्शन- II – मराठी भाषा – १५ प्रश्न, सेक्शन- III – जनरल नॉलेज आणि लॉजिकल अॅबिलिटी – ३० प्रश्न, सेक्शन- IV – विषयाचे ज्ञान – ४० प्रश्न).

एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुणांसाठी, एकूण २०० गुण, वेळ २ तास.

परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून शिफारस/निवड सूची तयार करण्यात येईल. शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रु. १००/- इतके शुल्क आकारले जाईल.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रु. १,०००/-; राखीव प्रवर्ग रु. ९००/-. माजी सैनिकांना फी माफ आहे.

ऑनलाइन अर्ज http://www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २२ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

नाबार्डमध्ये भरती

नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( NABARD) (भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची) ( Advt. No. ०३/ Office Attendant/ २०२४-२५) NABARD च्या सबऑर्डिनेट सर्व्हिसमध्ये ऑफिस अटेंडंट ग्रुप-सीपदांची भरती.

पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (OA). वेतन – दरमहा रु. ३५,०००/-. एकूण रिक्त पदे – १०८.

विभागीय कार्यालय, महाराष्ट्रमधील रिक्त पदे – ३५ (यात मुंबई मुख्यालयातील ३३ पदांचा समावेश आहे.) (अज – ८, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०) (यात अज – ८ पदे, इमाव – २ पदे या बॅकलॉगमधील रिक्त पदांचा समावेश आहे.)

पात्रता : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) ज्या विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱया राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करणार आहे, उमेदवार त्या राज्यातून १० वी उत्तीर्ण असावा. (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवाराने पदवी संपादन केलेली नसावी.)

वयोमर्यादा : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) १८ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९९४ ते १ ऑक्टोबर २००६ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट घेवून केली जाईल.

ऑनलाइन टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह) एकूण १२० प्रश्न १२० गुणांसाठी, वेळ ९० मिनिटे.

हेही वाचा >>> BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

(१) टेस्ट ऑफ रिझनिंग, (२) इंग्लिश लँग्वेज, (३) जनरल अवेअरनेस, (४) न्यूमरिकल अॅबिलिटी. प्रत्येकी ३० प्रश्न इंग्रजी/ हिंदी भाषेतून विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.

लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट : (फक्त पात्रता स्वरूपाची) निवडलेल्या उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे, त्या राज्यातील स्थानिय भाषेतून लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. यासंबंधीची विस्तृत माहिती NABARD च्या संकेतस्थळावर ऑनलाइन टेस्टचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून दिली जाईल. महाराष्ट्र राज्यातील पदांसाठी ‘मराठी’ स्थानीय भाषा आहे. ऑनलाईन टेस्टमधील गुणवत्तेनुसार राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. रिक्त पदांच्या ५० पदांएवढी प्रतीक्षा यादी बनविली जाईल, जी अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षासाठी ग्राह्य असेल.

परीक्षापूर्व प्रशिक्षण : अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना ऑनलाइन मोडने मोफत परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाईल. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने संबंधित माहिती देणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क/ इंटिमेशन चार्जेस – अर्जाचे शुल्क रु. ४५०/- अधिक इंटिमेशन चार्जेस रु. ५०/- असे एकूण रु. ५००/- भरावे लागतील.

परीक्षा केंद्र : अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ एमएमआर रिजन, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर.

ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधित शंकासमाधानासाठी http://cgrs.ibps.in या संकेतस्थळावरील ‘ Candidates Grievance Lodging and Redressal Mechanism’ वर आपली तक्रार नोंदवावी.

अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती www.nabard.org/career या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १३ व १४ मध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज www.nabard.org/career या संकेतस्थळावर दि. २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावेत.