हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL), एव्हिऑनिक्स डिव्हिजन, हैदराबाद HAL, हैदराबाद डिव्हीजनमध्ये दोन वेगवेगळ्या जाहिरातींमधून पुढील ॲप्रेंटिसेस पदांची सन २०२४-२५ करिता वॉक-इन पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ३२४.

(I) Advt. No. hAL/ HD/ TRG/२०२४-२५/ NATS/०१ dtd.  th May २०२४

sndt canceled published recruitment advertisement due to doubtful in reservation provisions
पद भरतीची जाहिरात रद्द, उमेदवारांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chaturanga Pratishthan, golden anniversary,
चतुरंग प्रतिष्ठानचा २८ – २९ सप्टेंबरला सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा, विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना गौरवण्यात येणार
Two years rigorous imprisonment for astrologers who claim to have a child
भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!
Like Pooja Khedkar 359 candidates grabbed the job
पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…
ramabai Ambedkar nagar rehabilitation project
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्प : घरभाडे धनादेशाचे वाटप रखडले, धनादेश वाटपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा
Awaiting justice for two years Shraddha Walker Charitable Trust set up
दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना
Girlfriends daughter raped absconding accused arrested after 4 years
वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार, फरार आरोपीला ४ वर्षांनी अटक

(ए) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसेस – ६४ पदे.

(१) एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग – २ पदे

(२) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – ५ पदे

(३) सिव्हील इंजिनीअरिंग – २ पदे

(४) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – १० पदे

(५) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ३० पदे

(६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १५ पदे

पद क्र. १ ते ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

(बी) टेक्निशियन (डिप्लोमा) ॲप्रेंटिसेस – ३५ पदे.

(१) कमर्शियल अँड कॉम्प्युटर प्रॅक्टिस – २ पदे

(२) सिव्हील इंजिनीअरिंग – १ पद

(३) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – ४ पदे

(४) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – ५ पदे

(५) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – १५ पदे

(६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ६ पदे

(७) फार्मसी – १ पद

(८) मेडिकल लॅब टेक्निशियन – १ पद

पद क्र. १ ते ८ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका.

हेही वाचा >>> करिअर मंत्र

(सी) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसेस – २५ पदे.

(१) बी.कॉम. – १० पदे

(२) बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) – १० पदे

(३) बी.एससी. (केमिस्ट्री) – १ पद

(४) बी.एससी. (कॉम्प्युटर्स) – ४ पदे

पद क्र. १ ते ४ साठी पात्रता – संबंधित विषयातील पदवी.

वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी प्राप्त केलेली डिग्री/ डिप्लोमा नेमणुकीच्या ५ वर्षांपूर्वी प्राप्त केलेली नसावी.

( II) Advt. No. hAL/ HD/ TRG/२०२४-२५/ NAPS/०१ dtd. w th May २०२४

(डी) आयटीआय पूर्ण केलेले – २०० पदे.

(१) फिटर – ३५ पदे

(२) प्लंबर – २ पदे

(३) टर्नर – ६ पदे

(४) मशिनिस्ट – ८ पदे

(५) डिझेल मेकॅनिक – १ पद

(६) ड्राफ्ट्समन सिव्हील – १ पद

(७) इलेक्ट्रिशियन – २५ पदे

(८) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – १ पद

(९) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ५५ पदे

(१०) पेंटर – ५ पदे

(११) मोटर वेहिकल मेकॅनिक – १ पद

(१२) सीओपीए (COPA) – ५५ पदे

(१३) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – ३ पदे

(१४) रेफ्रिजरेशन अँड एसी – २ पदे

(अजा – १० टक्के, अज – ९ टक्के, इमाव – २७ टक्के, अपंग – ४ टक्के, माजी सैनिक – ४.५ टक्के, ईडब्ल्यूएस – १० टक्के पदे राखीव)

१ ते १४ पदांसाठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील NCVT मान्यताप्राप्त आयटीआय उत्तीर्ण.

सर्व पदांसाठी स्टायपेंड – निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – संबंधित पदवी/ डिप्लोमा/ आयटीआयमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा अथवा इंटरह्यू घेतला जाणार नाही. गुणवत्ता यादी hal- india. co. in या संकेतस्थळावर वॉक-इननंतर दोन आठवड्यांनी जाहीर केली जाईल. तसेच त्यांना ई-मेलसुद्धा पाठविला जाईल. वॉक-इनच्या वेळी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.

सर्व पदांसाठी वॉक-इनचे ठिकाण –

Auditorium, Behind Department of Training & Development, Hindustan Aeronautics Ltd., Avionics Division, Balanagar, Hyderabad – ५०० ०४२.

वॉक-इन दिनांक व वेळ –

( I) (ए) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स ॲप्रेंटिसेस – दि. २३ मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

( I) (बी) टेक्निशियन डिप्लोमा ॲप्रेंटिसेस – दि. २४ मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

( I) (सी) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट ॲप्रेंटिसेस – दि. २४ मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

सर्व पदांसाठी वॉक-इनच्या वेळी पुढील कागदपत्र सादर करणे आवश्यक.

(१) आधारकार्ड,

(२) १० वीचे गुणपत्रक,

(३) डिग्री/ डिप्लोमा/ आयटीआयचे मूळ सर्टिफिकेट, गुणपत्रक (सर्व सेमिस्टर्सचे किंवा एकत्रित मार्कशिट),

(४) आरक्षण/ कम्युनिटी/ कास्ट सर्टिफिकेट (अजा/ अज/ इमाव, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, दिव्यांग),

(५) वरील सर्व सर्टिफिकेट्सच्या फोटो कॉपीचा एक संच ( Set),

(६) दोन पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ,

(७) आयटीआय उमेदवारांनी ॲप्रेंटिसशिप रजिस्ट्रेनची कॉपी.

(II) आयटीआय उमेदवारांसाठी –

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक पदांसाठी – दि. २० मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

फिटर, प्लंबर, पेंटर पदांसाठी – दि. २० मे २०२४, वेळ दुपारी १.०० वाजता.

COPA, मोटर वेहिकल मेकॅनिक पदांसाठी – दि. २१ मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल पदांसाठी – दि. २१ मे २०२४, वेळ दुपारी १.०० वाजता.

मशिनिस्ट, रेफ्रिजरेटर अँड ए.सी., टर्नर – दि. २२ मे २०२४, वेळ सकाळी ९.०० वाजता.

ड्राफ्ट्समन, सिव्हील, वेल्डर पदांसाठी – दि. २२ मे २०२४, वेळ दुपारी १.०० वाजता.

आयटीआय उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर रजिस्टर करणे आवश्यक. वॉक-इनच्या वेळी रजिस्ट्रेशनची कॉपी सादर करणे आवश्यक. रजिस्ट्रेशनच्या वेळी पुढील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य –

(१) १० वीचे गुणपत्रक,

(२) आयटीआय गुणपत्रक (सर्व सेमिस्टर्सचे),

(३) आधारकार्ड नंबर,

(४) फोटोग्राफ,

(५) सिग्नेचर आणि

(६) KYC verification.

शंकासमाधानासाठी संपर्क करा – फोन नं. ०४०-२३७७८२८३, ई-मेल आयडी – trg.hyd@hal-india.co.in