सुहास पाटील

इंडियन कोस्ट गार्ड ( ICG) (संरक्षण मंत्रालय) मध्ये असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर) च्या एकूण ७० पदांवर पदवीधर पुरुष/महिला उमेदवारांची भरती. (२०२५ बॅच). ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशील –

IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
woman from Buldhana missing after Prayagraj stampede has been found in Varanasi
कुंभमेळ्यात बेपत्ता महिला सापडली, वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत; पालकमंत्र्यांनीही…
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
registration process for mh nursing cet 2025 exam started
MH BSc Nursing CET 2025: बीएस्सी नर्सिंगसह परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी

(१) असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) (पुरुष) – ५० पदे.

पात्रता – पदवी किमान सरासरी ६० गुणांसह उत्तीर्ण. १२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयांत सरासरी ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत किंवा डिप्लोमानंतर पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना डिप्लोमा (मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयासह) सरासरी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(२) असिस्टंट कमांडंट-टेक्निकल (इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल) (फक्त पुरुष) – २० पदे

(अ) टेक्निकल मेकॅनिकल ब्रँच. पात्रता – ( i) मेकॅनिकल/ मरिन/ नेव्हल आर्किटेक्चर/ ऑटोमोटिव्ह/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल ॲण्ड प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ डिझाईन/ एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस विषयांतील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा संबंधित डिसिप्लीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सकडील समतूल्य पात्रता.

हेही वाचा >>> ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?

(ब) टेक्निकल (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) ब्रँच. पात्रता – ( i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेली कम्युनिकेशन/इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयांतील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा संबंधित डिसिप्लीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सकडील समतूल्य पात्रता. आणि ( ii) १२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयात सरासरी किमान ५५टक्के गुण आवश्यक किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह) किमान सरासरी ५५टक्के गुणांसह उत्तीर्ण. सर्व पदांसाठी अजा/ अज उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान सरासरी ५५टक्के गुण आवश्यक.

पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार (ज्यांनी शेवटच्या सेमिस्टरपर्यंत किमान सरासरी ६०टक्के गुण मिळविलेले आहेत.) ते अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना डिग्री सर्टिफिकेट दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावे लागेल.

शारीरिक मापदंड – उंची (जीडी/टेक्निकल पदांसाठी) – १५७ सें.मी., वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात – १०टक्के. छाती – योग्य प्रमाणात असावी आणि किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. दृष्टी – असिस्टंट कमांडंट (जीडी) साठी – चष्म्याशिवाय – ६/६, ६/९, चष्म्यासह – ६/६, ६/६. असिस्टंट कमांडंट (टेक्निकल) साठी – चष्म्याशिवाय – ६/३६, ६/३६, चष्म्यासह – ६/६, ६/६.

हेही वाचा >>> SAIL Recruitment 2024: ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू; अशी होणार उमेदवारांची निवड

वयोमर्यादा – जनरल ड्युटी आणि टेक्निकल ब्रँचसाठी २१ ते २५ वर्षे (१ जुलै २०२४ रोजी). उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै १९९९ ते ३० जून २००३ दरम्यानचा असावा. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे; क्र. १ ECGD ICG किंवा आर्मी/ नेव्ही/ एअरफोर्समधील कर्मचारी – ५ वर्षे; पद क्र. २ AC Tech ICG कार्यरत कर्मचारी ५ वर्षे)

निवड पद्धती – स्टेज-१ – (CGCAT) कॉम्प्युटर बेस्ड् स्क्रीनिंग टेस्ट देशभरातील विविध केंद्रांवर एप्रिल २०२४ मध्ये घेतली जाईल. MCQ पॅटर्न १०० प्रश्न, ४०० गुणांसाठी, वेळ २ तास. (प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.) सर्व ब्रँचेसमधील पदांसाठी – (१) इंग्लिश, (२) रिझनिंग ॲण्ड न्यूमरिकल ॲबिलिटी, (३) जनरल सायन्स ॲण्ड मॅथेमॅटिक्स ॲप्टिट्यूड, (४) जनरल नॉलेज प्रत्येकी २५ प्रश्न.

स्टेज-२ प्रीलिमिनरी सिलेक्शन बोर्ड (PSB) (मुंबई/गोवा, नॉयडा, चेन्नई आणि कोलकता केंद्र) – CGCAT परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची प्रीलिमिनरी सिलेक्शन एक्झामिनेशन मे, २०२४ मध्ये घेतली जाईल. (कॉम्प्युटराईज्ड्, कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट (CCBT) (ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टसाठी फक्त इंग्रजी माध्यम असेल.) आणि पिक्चर परसेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट (PP & DT) (उमेदवारांना हिंदीमधून बोलण्याची मुभा असेल.) यांचा समावेश असेल. ही फक्त पात्रता स्वरूपाची असेल. फोटो आणि बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी PSB केंद्रावर केली जाईल.

स्टेज-३ फायनल सिलेक्शन बोर्ड ( FSB) फायनल सिलेक्शन – जून ते ऑगस्ट, २०२४ दरम्यान CGSB नॉयडा केंद्रावर (कालावधी ५ दिवस) होईल, ज्यात सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टास्क आणि पर्सोनॅलिटी टेस्ट यांचा समावेश असेल.) ॲप्टिट्यूड टेस्ट फक्त इंग्रजी माध्यमातून घेतल्या जातील.

स्टेज-४ – मेडिकल एक्झामिनेशन – स्पेशल मेडिकल बोर्ड ( SMB) (जून ते नोव्हेंबर २०२४) यातून अनफिट ठरलेल्या उमेदवारांना ४२ दिवसांच्या आत DGआटर कडे डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस/ CGHQ मार्फत अपिल करता येईल.

स्टेज-५ – स्टेज-१ व स्टेज-३ मधील एकत्रित गुणवत्तेनुसार ऑल इंडिया गुणवत्ता यादी बनविली जाईल. (डिसेंबर २०२४ च्या शेवटास) अजा/अजच्या उमेदवारांना स्टेज-१ ( CGCAT) करिता जाण्या-येण्याचे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचे तिकिटाचे/ बसच्या तिकिटाचे पैसे परत केले जातील. त्यांना ICG वेबसाईटवरून Travel Form डाऊनलोड करून ICG कडे सुपूर्द करावा लागेल.

स्टेज-२ (PSB)/स्टेज-३ ( FSB) करिता जाण्या-येण्याचे रेल्वेच्या AC III/ Chair Car/बसच्या तिकीटाचे पैसे परत केले जातील. FSB करिता पहिल्यांदाच बसणाऱ्या उमेदवारांनाच असे प्रवासाचे पैसे परत केले जातील. (ही अट अजा/अजसाठी लागू नाही.)

वेतन – असिस्टंट कमांडंट पदाकरिता वेतन ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल – १० (मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक इतर भत्ते). अंदाजे वेतन दरमहा रु. १.०७ लाख, नाममात्र भाडे (लायसन्स फी) घेवून उमेदवारांना शासकीय निवास दिला जाईल.

ट्रेनिंग – इंडियन नेव्हल ॲकॅडमी इझिमाला, केरळ येथे निवडलेल्या उमेदवारांना जानेवारी, २०२५ पासून सुरू होणाऱ्या ४४ आठवड्यांच्या नेव्हल ओरिएंटेशन कोर्स ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. त्यांचा १.२५ कोटी रुपयांचा विमा उतरविला जाईल. अंतिम निवड यादी डिसेंबर, २०२४ च्या शेवटास इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पात्रता/ निवड पद्धती इत्यादी विषयी शंकासमाधानासाठी ई-मेल/फोन नं. स्टेज-१, स्टेज-२ (सुरू होईपर्यंत), ४ व ५ साठी dte-rectofficer@indiancoastguard.nic.in, फोन नं. ०१२०-२२०१३४०. स्टेज २ व ३ साठी
fsb- noida@indiancoastguard.nic.in, फोन नं. ०१२०-२२०१३१६. ऑनलाईन रजिस्ट्रेशन/फी भरणे/ई-ॲडमिट कार्डविषयी शंकासमाधानासाठी
icg- officers@cdac.in, फोन नं. ०२०-२५५०३१०८/१०९.

परीक्षा केंद्र – उमेदवाराने एकूण ५ परीक्षा केंद्रां (शहर) साठी पसंतीक्रम देणे आवश्यक. आपल्या रहिवासापासून ३० कि.मी. अंतराच्या आतील असलेल्या केंद्रास पहिला पसंतीक्रम द्यावा; तसे ३० कि.मी. अंतराच्या आतील केंद्र नसल्यास नजिकच्या परीक्षा केंद्रास प्रथम पसंती द्यावी. जर उमेदवारांनी या सूचनेप्रमाणे परीक्षा केंद्राची प्रथम पसंती दिली नसेल तर कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारी रद्द केली जाईल.

ॲडमिट कार्ड – उमेदवारांना स्टेज-१ साठीचे परीक्षा केंद्र ‘ Candidates Log- in’ वर परीक्षेपूर्वी किमान १० दिवस अगोदर ICG च्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेपूर्वी २-३ दिवस अगोदर ई-ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याविषयीची सूचना रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर पाठविली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. ३००/-. (अजा/अज उमेदवारांना फी माफ आहे.)ऑनलाइन अर्ज www.joinindiancoastguard.cdac.in या संकेतस्थळावर ६ मार्च २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ऑनलाईन अर्जासोबत (१) लाईट बॅकग्राऊंडमधील रंगीत फोटो जून २०२३ पूर्वी काढलेला नसावा. (चष्मा न घालता काढलेला) (फोटो काढताना काळ्या पाटीवर उमेदवाराने आपले नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक पांढऱ्या खडूने कॅपिटल लेटरमधे लिहून पाटी छातीसमोर धरावी.) (२) रजिस्ट्रेशन करताना कॅप्चर केलेली लाईव्ह ईमेज. (३) सिग्नेचर. (४) डाव्या, उजव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे. (५) जन्मतारखेचा पुरावा म्हणून १० वीचे गुणपत्रक. (६) आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधारकार्ड किंवा वोटर आय्डी किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. (७) उमेदवार ICG किंवा माजी सैनिक असल्यास सर्व्हिस सर्टिफिकेट. (८) उंचीमध्ये सवलत मागणाऱ्या उमेदवारांनी डोमिसाईल सर्टिफिकेट (रेसिडेंट सर्टिफिकेट चालत नाही.) स्कॅन करून (jpeg format) अपलोड करणे आवश्यक.

Story img Loader