केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)  ‘इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन २०२५’ साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना सिव्हील सव्‍‌र्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२५ द्यावी लागेल. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस (मुख्य) परीक्षेसाठी निवडले जाईल. एकूण रिक्त पदे १५०. यातील ९ पदे दिव्यांग (कॅटेगरी  VH – २,  HH – ३,  LD – ४) साठी राखीव. पात्रता – पुढीलपैकी एका विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण (अ‍ॅनिमल हजबंडरी अँड वेटर्नरी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, जिऑलॉजी, झूऑलॉजी, मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स) किंवा अ‍ॅग्रिकल्चर, फॉरेस्ट्री किंवा इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (पदवीचा निकाल इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस (मुख्य) परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी लागणे आवश्यक, ही परीक्षा जुलै, २०२५ मध्ये जाहीर होईल.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयोमर्यादा : ( १ ऑगस्ट २०२५ रोजी) २१ ते ३२ वर्षे. (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत)

शारीरिक मापदंड : पुरुष – उंची – १६३ सें.मी., छाती – ७९ ते ८४ सें.मी. महिला – उंची – १५० सें.मी. छाती – ७४-७९ सें.मी.

निवड पद्धती : (१) सिव्हील सव्‍‌र्हिसेस (पूर्व) परीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. (२) इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस (मुख्य) परीक्षा (लेखी परीक्षा व इंटरव्ह्यू)

सिव्हील सव्‍‌र्हिसेस (पूर्व) परीक्षा  २५ मे २०२५ रोजी घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह

टाईप – दोन पेपर. प्रत्येकी २०० गुणांसाठी. (१) जनरल स्टडीज पेपर-१ – २०० गुणांसाठी वेळ २ तास.

(२) जनरल स्टडीज पेपर-२ – २०० गुणांसाठी वेळ २ तास. (पात्र ठरण्यासाठी किमान ३३ टक्के गुण आवश्यक.)

प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ३३ टक्के गुण वजा केले जातील. दोन्ही पेपरांतील प्रश्न हिंदूी/इंग्रजी भाषेत असतील. पूर्व परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. जनरल स्टडीज पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस (मुख्य) परीक्षेसाठी निवडले जातील. साधारणत रिक्त पदांच्या १२ ते १३ पट उमेदवार निवडले जातील.

पूर्व परीक्षेसाठी केंद्र : मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, छ. संभाजी नगर, नाशिक, पुणे, पणजी इ. देशभरातील एकूण ८० केंद्र.

मुख्य परीक्षा – नोव्हेंबर, २0२४ मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेसाठी केंद्र – नागपूर, भोपाळ, हैद्राबाद इ. देशभरातील एकूण १० केंद्र.

(अ) लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल. पेपर-१ – जनरल इंग्लिश ३०० गुण, पेपर-२ – जनरल नॉलेज ३०० गुण. ऑप्शनल सब्जेक्ट्सच्या लिस्टमधून उमेदवारांना दोन विषय निवडावे लागतील.  प्रत्येक विषयासाठी दोन पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी असतील. मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स इंग्रजी भाषेत असतील. प्रत्येक पेपरला ३ तासांचा वेळ दिला जाईल.

(ब) पर्सोनॅलिटी टेस्ट – एकूण ३०० गुणांसाठी असेल. पर्सोनॅलिटी टेस्टसाठी रिक्त पदांच्या दुप्पट उमेदवार निवडले जातील.

अर्जाचे शुल्क : रु. १००/-.  पात्र असल्यास उमेदवार सिव्हील सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसे नमूद करू शकतात. पूर्व परीक्षा पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना सिव्हील सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस एक्झामिनेशनसाठीच्या

वेगवेगळय़ा होणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी अर्ज भरावे लागतील.

ऑनलाइन अर्ज  www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ११ फेब्रुवारी २०२५ (६ वाजे)पर्यंत करता येतील. 

शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२३३८११२५/ २३३८५२७१/ २३०९८५४३. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर काही बदल

करावयाचे असल्यास  दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करता येतील. 

suhaspatil237@gmail.com