इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मार्केटिंग डिव्हीजन, मुंबई. वेस्टर्न रिजनमधील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दीव आणि दमण व दादरा नगर हवेली इ. IOCL च्या लोकेशन्समध्ये ॲप्रेंटिसेसच्या एकूण ३१३ पदांची भरती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(३) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – पात्रता – B.A./ B.B. A./ B.Com./ B.Sc. पदवी उत्तीर्ण. महाराष्ट्र – १३० (अजा – १३, अज – १२, इमाव – ३५, ईडब्ल्यूएस- १३, खुला – ५२), गुजरात – ३५, गोवा – ६, दादरा नगर हवेली – १, दमणदीव – ४, छत्तीसगड – ७, मध्य प्रदेश – १५.

(४) ट्रेड ॲप्रेंटिस डेटा एन्ट्री ऑपरेटर – पात्रता – १२ वी उत्तीर्ण. (उमेदवार पदवीधर नसावा.)

(५) ट्रेड ॲप्रेंटिस डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) पात्रता – १२ वी उत्तीर्ण (उमेदवार पदवीधर नसावा.) आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर कोर्स.

डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठीची एकूण रिक्त पदे – महाराष्ट्र – ९ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस- १, खुला – ४), गुजरात – ४, गोवा – , दमण दीव – , छत्तीसगड – १, मध्य प्रदेश – २.

(२) ट्रेड ॲप्रेंटिस – फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक व मशिनिस्ट – पात्रता – १० उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट कोर्स.

महाराष्ट्र – ५ (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ), गुजरात – १, गोवा – , दादरा नगर हवेली – , दमण दीव – , छत्तीसगड – ३, मध्य प्रदेश – ५.

(१) टेक्निशियन ॲप्रेंटिस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेशन, सिव्हील, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स – पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

महाराष्ट्र – ३ (अजा – ३, अज – ३, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १२), गुजरात – २, गोवा – , दादरा नगर हवेली – , दमण दीव – २, छत्तीसगड – ७, मध्य प्रदेश – २.

ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, ट्रेड ॲप्रेंटिस (DEO) व टेक्निशियन अॅप्रेंटिसेस पदांसाठी पात्रता परीक्षेत उमेदवारांना किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण.) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन ॲप्रेंटिस उमेदवारांनी पात्रता परीक्षा १ एप्रिल २०२१ नंतर उत्तीर्ण केलेली असावी. ट्रेड अॅप्रेंटिस उमेदवारांनी पात्रता परीक्षा १ एप्रिल २०२० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

उच्च अर्हतेचे शिक्षण घेणारे/ प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वयोमर्यादा : दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; अपंग – १०/१३/१५ वर्षे)

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी : ट्रेड ॲप्रेंटिसेस (सर्व ॲप्रेंटिसेससाठी) १२ महिने.

उमेदवारांनी संबंधित NATS/ NAPS पोर्टलवर यूजर आयडी/ई-मेल आयडी टाकून लॉगइन करून ७ फेब्रुवारी २०२५ (सायंकाळी ५ वाजे) पर्यंत अर्ज करावा.

या भरतीविषयी माहिती https://www.iocl.com/apprenticeships या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल.

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक भरती

ऑफिस ऑफ दि रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर अॅट बॉम्बे – बॉम्बे हायकोर्ट ( BHC) मुंबई ( Principal Seat) ऑफिसमध्ये ‘क्लर्क’ पदांची (लिपिक) करार पद्धतीने २ वर्षांच्या मुदतीकरिता भरती. एकूण रिक्त पदे – १२९. यातील ५ पदे दिव्यांगांसाठी राखीव आहेत. ती नंतर भरली जातील. याशिवाय ३१ पदांची प्रतिक्षा यादी बनविली जाईल.

पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी उत्तीर्ण.

(ii) कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स (GCC TBC) किंवा आयटीआय इंग्लिश टायपिंग ४० श.प्र.मि. वेगाचे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट.

(iii) Word Processors in Window and Linux, MS- Office, MS- Word, Wordstar-७ Open Office Org. यावरील प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट.

(iv) उमेदवारांना Video Conferencing ऑपरेटिंगचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा – (दि. १४ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय – १८-४३ वर्षे) (हायकोर्टाचे आणि सरकारी कर्मचारी यांना वयाची अट नाही.)

BHC च्या ऑफिशियल वेबसाईटवर शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतरच त्यांनी अर्जाचे शुल्क रु. ४००/- ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे.

ऑनलाइन अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून (jpg/ jpeg format मध्ये) अपलोड करावयाचे आहे.

निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

(१) स्क्रीनिंग टेस्ट – ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ ९० प्रश्न, ९० गुण, वेळ १ तास. (मराठी – १० गुण, इंग्लिश – २०, सामान्य ज्ञान – १०, सामान्य बुद्धिमत्ता – २०, अंकगणित – २०, कॉम्प्युटर – १०) पात्रतेसाठी किमान ४५ गुण आवश्यक.

(२) पात्र उमेदवारांची टायपिंग टेस्ट (१० गुण) वेळ १० मिनिटे (४०० शब्द १० मिनिटांत टाईप करावयाचे आहेत.)

(३) टायपिंग टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना ४० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. पात्रतेसाठी किमान १६ गुण आवश्यक. त्यावेळी साक्षांकीत केलेल्या प्रमाणपत्रांच्या पंती जाहिरातीच्या (पॅरा ६ मध्ये दिल्याप्रमाणे) सादर करणे आवश्यक.

अंतिम निवड स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल.

अर्जाचे रजिस्ट्रेशन शुल्क : रु. १००/- (ऑनलाइन मोडने).

ऑनलाइन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर दि. ५ फेब्रुवारी २०२५ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत. suhaspatil237@gmail.com