सुहास पाटील
इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च (IGCAR) (डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी अंतर्गत एक अग्रणी रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर) IGCAR, कल्पक्कममध्ये १०० ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांवर भरती. (Advt. No. IGCAR/02/2023)
कॅटेगरीनुसार पात्रता : संबंधित पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळालेले असावेत, अजा/अज / इमावसाठी ५० टक्के गुण.
(क) कॅटेगरी-ए : मास्टर्स इन सायन्स – (१) फिजिक्स – जनरल, अॅप्लाईड कंडेन्स्ड् मॅटर, न्यूक्लियर, थिअरॉटिकल) (M.Sc ला मॅथेमॅटिकल फिजिक्स/ न्यूमरिकल मेथड्स यापैकी एक विषय असावा तसेच B.Sc एक अॅन्सिलरी विषय केमिस्ट्री असावा.). (२) M.Sc (मटेरियल सायन्स) शिवाय (B.Sc ला (PCM) किंवा मटेरियल सायन्स विषय अभ्यासलेले असावेत.) (३) M.Sc (केमिस्ट्री) – जनरल, अॅप्लाईड, ऑरगॅनिक, इनऑरगॅनिक, फिजिकल, अॅनालायटिकल) (B.Sc ला ऑन्सिलरी विषय फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स असावेत.) (४) M.Sc (रेडिएशन फिजिक्स) – (M.Sc ला मॅथेमॅटिकल फिजिक्स एक विषय असावा. तसेच B.Sc (फिजिक्स/ केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स अॅन्सिलरी विषय असावेत.) (५) M.Sc (अॅटमॉस्पेरिक सायन्स/ मेटिओरॉलॉजी) – तसेच B.Sc ला फिजिक्स, मॅथ्स अॅन्सिलरी विषय असावेत.) (६) M.Sc (लाईफ सायन्स) – मायक्रोबायोलॉजी, मरिन बायोलॉजी, लाईफ सायन्सेस, बायो केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी (B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री अॅन्सिलरी विषय असावेत.)
याशिवाय कॅटेगरी-ए मधील उमेदवारांनी UGC- CSIR NET/JEST व्हॅलिड स्कोअर असल्यास किंवा मास्टर्स डिग्रीनंतर व्हॅलिड GATE स्कोअर असल्यास त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
(II) कॅटेगरी-बी : M.E./M.Tech. (न्यूक्लियर इंजिनिअरींग/ न्यूक्लियर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी) किंवा M.Tech. (अॅटमॉस्पेरिक सायन्स/ क्लायमेट सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉज).
(III) कॅटेगरी-सी : B.E./ B.Tech. (केमिकल/कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ मेटॅलर्जिकल/मेकॅनिकल इंजिनिअरींग).
(IV) कॅटेगरी-डी : कॅटेगरी-सी मध्ये नमूद केलेल्या इंजिनिअरींग डिसिप्लिनमधील M.E./ M.Tech. (M.E./ M.Tech. मधील प्रवेश GATE स्कोअर आधारित झालेले असावेत.) (M.E./ M.Tech मधील प्रवेश GATE स्कोअरशिवाय झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.) खफा साठी काही विषयातील पात्रता अग्राह्य ठरविली आहे, त्याची यादी जाहिरातीमध्ये पाहूनच आपली पात्रता उमेदवारांनी तपासून पहावी.
वयोमर्यादा : दि. १६ जून २०२३ रोजी २८ वर्षेपर्यंत (इमाव – ३१ वर्षे, अजा/ अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८ वर्षे).
निवड पद्धती : प्राप्त अर्जाची छाननी उमेदवारांची पदवी, शैक्षणिक कारकिर्द, GATE/ JEST स्कोअर तपासून केली जाईल. IGCAR उमेदवारांचा GATE/JEST स्कोअर कट ऑफ ठरवून त्यांचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होईल. पात्रतेच्या वेगवेगळय़ा कॅटेगरीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरह्यू किंवा डायरेक्ट इंटरह्यू घेवून केली जाईल. लेखी परीक्षा जुलै, २०२३ च्या दुसऱ्या आठवडय़ात चेन्नई, कोलकता आणि भुवनेश्वर या केंद्रांवर आयोजित केली जाईल. इंटरव्ह्यू कल्पक्कम येथे जुलै २०२३ च्या शेवटच्या आठवडय़ात घेतला जाईल.
अजा/ अज/ इमाव उमेदवारांनी केंद्र सरकारने विहीत केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. JRF साठी निवडलेल्या उमेदवारांची यादी http://www.igcar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना ई-मेलद्वारेसुद्धा सूचित केले जाईल. अंतिम निवड कागदपत्र पडताळणी आणि कल्पक्कम येथील DAE हॉस्पिटलचा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहूनच केली जाईल.
फेलोशिप आणि कालावधी (Tenure) : (१) डायरेक्ट Ph.D. साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांना ५ वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान पहिल्या २ वर्षांसाठी दरमहा रु. ३१,०००/-, दोन वर्षांनंतर दरमहा रु. ३५,०००/- फेलोशिप दिली जाईल. त्यांना दरवर्षी रु. ४०,०००/- पुस्तकांसाठी भत्ता दिला जाईल.
(२) इंटिग्रेटेड पीएच.डी. (एकच पदवी) – कालावधी ६ वर्षे.
(३) इंटिग्रेटेड पीएच.डी. (दुहेरी पदवी) – कालावधी ७ वर्षे.
पहिल्या वर्षी दरमहा रु. २१,०००/- फेलोशिप आणि एका वेळेला रु. २५,०००/- पुस्तकांसाठी भत्ता दिला जाईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी रु. ३१,०००/- व त्यानंतर पुढील वर्षांसाठी दरमहा रु. ३५,०००/- फेलोशिप दिली जाईल. दुसऱ्या वर्षांपासून दरवर्षी रु. ४०,०००/- पुस्तक भत्ता दिला जाईल. निवडलेल्या उमेदवारांना हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. ऑनलाइन अर्ज http:// www. igcar- gov. in/ या संकेतस्थळावर करून त्यांची प्रिंटआऊट काढून घ्यावी. प्रिंटआऊटवर नेमून दिलेल्या जागी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा व नेमून दिलेल्या जागी उमेदवाराने स्वाक्षरी करावी. अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती जोडून पुढील पत्त्यावर स्पीडपोस्टाने दि. २१ जून २०२३ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
The Assistant Personnel Officer (R), Recruitment Section, Indira Gandhi Centre for Atomic Research, Chengalpattu District, Kalpakkam – 603 102, Timilnadu. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Advt. No. IGCAR/02/2023l आणि ‘Discipline —’ असे ठळक अक्षरांत नमूद करावे.
suhassitaram@yahoo.com