सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण १७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील. (I) सामान्य प्रशासन विभाग – राज्य सेवा गट-अ व गट-ब – एकूण २०५ पदे (मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४).

(१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ – २७ पदे (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – ६, आदुघ – ३, खुला – ११).

(२) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (कनिष्ठ) – ४० पदे (अजा – ९, अज – २, विजा-अ – ३, भज-ब – १, भज-क – २, इमाव – ९, विमाप्र – १, आदुघ – ४, खुला – ९).

(३) सहायक आयुक्त/ प्रकल्प (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) श्रेणी-२, गट-अ – ३ पदे (अज – १, खुला – २).

(४) उद्याोग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ – ७ पदे (अजा – १, भज-ड – १, इमाव – २, आदुघ – २, खुला – १).

(५) सहायक कामगार आयुक्त, गट-अ – २ पदे (इमाव – १, आदुघ – १).

हेही वाचा >>> SCI Mumbai Bharti 2024: नोकरीची उत्तम संधी! मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदासाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख पाहा

(६) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब – १९ पदे (अजा – ४, अज – २, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – ४, आदुघ – २, खुला – ५).

(७) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब – २१ पदे (अजा – ३, अज – १, विजा-अ – १, इमाव – ८, विमाप्र – २, आदुघ – २, खुला – ४).

(८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – १ पद (खुला).

(९) कौशल्य विकास, रोजगार व उद्याोजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

(१०) सरकारी कामगार अधिकारी, गट-ब – २ पदे (अजा – १, आदुघ – १).

(११) सहायक प्रकल्प अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी/ गृहप्रमुख/प्रबंधक, गट-ब – ४ पदे (अज – १, भज-ब – १, भज-क – १, आदुघ – १).

(१२) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब – ७६ पदे (अजा – १०, अज – ५, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – २, इमाव – १४, विमाप्र – २, आदुघ – ८, खुला – २८).

हेही वाचा >>> NHAI Recruitment 2024: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये पदवीधरांसाठी भरती; असा करा अर्ज…

पात्रता – पद क्र. २) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – वाणिज्य शाखेची पदवी किमान ५५ टक्के गुणांसह/ C.A./ ICWA/ M.Com./M.B.A. ( Finance).

पद क्र. ४) उद्योग उपसंचालक (तांत्रिक) गट-अ – B. E./ B. Tech. ( Civil) किंवा B. Sc.

१ ते १२ पैकी वरील २ पदे वगळता इतर पदांसाठी पात्रता – पदवी उत्तीर्ण.

(II) मृद व जलसंधारण विभाग – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – २६ पदे (मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर २०२४).

(१) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-अ – एकूण ६ पदे (अज – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, विमाप्र – १, खुला – १).

(२) जल संधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब – २० पदे (अजा – १, भज-ब – १, भज-ड – १, इमाव – ४, विमाप्र – १, खुला – १२).

पात्रता – B. E./ B. Tech. ( Civil/ Civil & Water Management/ Civil & Environmental/ Structural).

(III) महसूल व वन विभाग – महाराष्ट्र वनसेवा सेवा गट-ब – ४३ पदे (मुख्य परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर २०२४).

(१) सहायक वनसंरक्षक गट-अ – एकूण ३२ पदे (अजा – २, अज – ४, विजा-अ – २, इमाव – ११, आदुघ – ३, खुला – १०).

पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ पशु संवर्धन व पशुवैद्याकशास्त्र/ कृषी अभियांत्रिकी यापैकी एका विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

शारीरिक क्षमता – पुरुष – २५ कि.मी., महिला – १४ कि.मी. अंतर चार तासात पूर्ण करणे.

(२) वनक्षेत्रपाल गट-ब – एकूण ११ पदे (अजा – ४, अज – १, भज-क – १, इमाव – ३, आदुघ – १, खुला – १).

पात्रता – (१) वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी, रसायन, स्थापत्य/ ऑटोमोबाईल/संगणक/ पॉवर/ प्रोडक्शन/ विद्याुत/ इलेक्ट्रॉनिक्स/ यंत्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/संगणक विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्याकीय विज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी.

(२) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी. (१२ (विज्ञान) शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक.)

(३) बी.ई./ बी.टेक. (ऑटोमोबाईल/ पॉवर/ प्रोडक्शन/ मेटॅलर्जी अॅण्ड मटेरियल/टेक्स्टाईल/आयटी/ इन्स्ट्रूमेंटेशन/ बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी)/ बी.फार्मसी./बी.टेक. (फूड सायन्स) उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेवून उत्तीर्ण झालेला असावा. तसेच १० वी/१२ वी (विज्ञान) शाखेतून उत्तीर्ण असावा.)

शारीरिक क्षमता – पुरुष – २५ कि.मी., महिला – १६ कि.मी. अंतर चार तासात पूर्ण करणे.

सहायक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल पदांसाठी शारीरिक मोजमापे – पुरुष – उंची – १६३ सें.मी. (अनुसूचित जमाती – १५२.५ सें.मी.), छाती – ७९-८४ सें.मी.; महिला – उंची – १५० सें.मी. (अज – १४५ सें.मी.), दृष्टी – चष्म्यासह – ६/६.

एकूण पदांपैकी महिलांसाठी ३० टक्के, खेळाडू ५ टक्के, दिव्यांग ४ टक्के, अनाथ १ टक्के पदे राखीव.

वयोमर्यादा – निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब दि. २५ जानेवारी २०२४ रोजी व इतर सर्व पदांसाठी १ एप्रिल २०२४ रोजी खुला – ४० वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ खेळाडू/ माजी सैनिक – ४५ वर्षे, दिव्यांग – ४७ वर्षे.

पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. (त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी नेमून दिलेल्या शेवटच्या दिवसापर्यंत पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.)

निवड प्रक्रिया – संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सर्व संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ४०० गुणांसाठी (पेपर-१ – अनिवार्य आणि पेपर-२ फक्त पात्रता स्वरूपाचा. प्रत्येक पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप २०० गुणांसाठी वेळ २ तास)

राज्य सेवा मुख्य परीक्षा – ८०० गुणांसाठी मुलाखतीचे गुण – १००.

इतर संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी, मुलाखतीचे गुण – ५०.

परीक्षा शुल्क – अमागास – रु. ५४४/-; मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत).

भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक २८ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २९ जानेवारी २०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.संयुक्त पूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर २५ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.