महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( MAHATRANSCO) अंतर्गत ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्यभार प्रेषण केंद्र, ऐरोली तसेच ७ परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वेतन गट-४ मधील विभागस्तरीय सेवा जेष्ठतेतील ‘विद्युत सहाय्यक (पारेषण)’ कंत्राटीच्या एकूण १९०३ पदांची ३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी भरती.

(सेवा योजन जाहिरात क्र. ०९/२०२३ दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती, याऐवजी आता नवीन जाहिरात क्र. ०८/२०२४ दि. २२ जून २०२४ रोजी जाहीर झाली आहे. जाहिरात क्र. ०८/२०२४ नुसार अर्ज भरण्याची तारीख १५ जुलै २०२४ च्या ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीच्या जाहिरातीमध्ये जाहीर झाली आहे.) सेवायोजन जाहिरात क्र. ०८/२०२४ –

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Maharashtra Folklore Actor Pankaj Tripathi to attend grand finale Mumbai news
‘महाराष्ट्राच्या लोकांकिके’चे मानकरी कोण? महाअंतिम फेरीला अभिनेते पंकज त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती

एकूण रिक्त पदे – २,६२३.

आरक्षण महिला – ३० टक्के, माजी सैनिक – १५ टक्के, प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, भूकंपग्रस्त – २ टक्के, खेळाडू – ५ टक्के, अनाथ – १ टक्के.

पात्रता – (दि. ३१ जुलै २०२४) अॅप्रेंटिसशिप अॅक्ट १९६१ अंतर्गत वीजतंत्री ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा आयटीआयमधील वीजतंत्री ट्रेडमधील NCTVT प्रमाणपत्र किंवा २ वर्षं कालावधीचा NCTVT यांचा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमधील कोर्स उत्तीर्ण. (ज्यात १ वर्ष कालावधीचा इलेक्ट्रिकल सेक्टरमधील बोर्ड बेस्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स ६ महिने कालावधीचा ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट युज्ड इन HT, LT सबस्टेशन अँड केबल जॉईंटींग’ अॅडव्हान्स्ड कोर्स ६ महिने कालावधीचे मेकॅनिक ( HT, LT इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटींग) ट्रेडमधील अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांचा समावेश असेल.

हेही वाचा : शिक्षणाची संधी: ‘जज अ‍ॅडव्होकेट जनरल ब्रँच’साठी संधी

वयोमर्यादा – दि. ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ – १८ ते ४३ वर्षे). जाहिरात क्र. ०९/२०२३ अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार नविन पात्रता दिनांकामुळे (दि. ३१ जुलै २०२४) उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरती प्रक्रियेकरिता अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही दि. १० डिसेंबर २०२३ रोजीचीच राहील.

निवड पद्धती – ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेस बोलाविण्यात येईल. त्यांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ( objective type) ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. (१) वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान – ५० प्रश्न, ११० गुण, (२) सामान्य अभियोग्यता ( General Aptitude) – ८० प्रश्न, ४० गुण. (अ) तर्कशक्ती ( Reasoning) – ४० प्रश्न, २० गुण. (ब) संख्यात्मक अभियोग्यता ( Quantitative Aptitude) – २० प्रश्न, १० गुण. (क) मराठी भाषा – २० प्रश्न, १० गुण.)

सर्व मिळून १३० प्रश्न व १५० गुण. चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. नियुक्तीपूर्वी उमेदवाराने विहीत शारीरिक व वैद्यकीय चाचणीत पात्र होणे आवश्यक राहील. याबाबतचे निकष निवडीपूर्वी प्रशासनातर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.

(१) म.रा.वि. मंडळ/ महापारेषण कंपनीत वीजतंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या १० टक्के अधिक गुण मिळवून अंतिम यादी तयार करण्यात येईल.

(२) महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण दिले असल्यास जास्तीत जास्त २५ गुण दिले जातील.

(३) महापारेषण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत/ काम केलेल्या कंत्राटी कामगारांना अनुभवाच्या प्रती वर्षाला २ गुण ५ वर्षांसाठी १० गुण अतिरिक्त दिले जातील.

हेही वाचा : UPSC ची तयारी : भारताचे संविधान (भाग ३)

वरील अनु.क्र. १ ते ३ साठी उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील १५० पैकी गुणांना १०० गुणांमध्ये रूपांतरित करून त्यात अधिकचे गुण मिळवून अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.

उमेदवारास त्याला ज्या परिमंडला अंतर्गत पदस्थापना हवी आहे, त्या परिमंडलाची उमेदवाराने ऑनलाइन अर्जात निवड करावी. परिमंडळनिहाय रिक्त पदांचा तपशील – परिमंडळ व विभागनिहाय रिक्त पदांचा गोषवारा जाहिरातीच्या प्रपत्र क्र. १ मध्ये उपलब्ध आहे.

परीक्षा केंद्र – अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने तीन परीक्षा केंद्रांची नावे ऑनलाइन अर्ज करताना नमूद करावीत. ऑनलाइन परीक्षेची अंदाजे तारीख ऑगस्ट-सप्टेंबर २०२४.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. ५००/-; मागासवर्गीय, आदुघ, सा. व शै.मा. व अनाथ – रु. २५०/-; दिव्यांग/माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ आहे. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे.

(१) अमरावती (जिल्हे – अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा) – एकूण १६२ पदे.

(२) छत्रपती संभाजी नगर (जिल्हे – छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशीव, जालना) – एकूण ४६९ पदे.

(३) नागपूर (जिल्हे – नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा) – एकूण ९४ पदे.

(४) नाशिक (जिल्हे – नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर) – एकूण ४८९ पदे.

(५) पुणे (जिल्हे – पुणे, सोलापूर) – एकूण ५६८ पदे

(६) वाशी (जिल्हे – ठाणे, पालघर, रायगड) – एकूण ३९९ पदे.

(७) कराड (जिल्हे – कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) – एकूण ४३२ पदे .

(८) राज्यभार प्रेषण केंद्र ऐरोली – एकूण १० पदे

हेही वाचा : Success Story: योगा मॅटपासून के फिटनेस प्रोडक्ट्सपर्यंत, ‘या’ उद्योजकाने दोन वर्षांत केली ३० कोटींची उलाढाल

विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदी ३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन काम समाधानकारक असल्यास त्यांचा कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येईल. ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधिन राहून ‘सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)’ या पदावर नियमित करण्याचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल.

दरमहा एकत्रित मानधन – प्रथम वर्ष – रु. १५,०००/-, द्वितीय वर्ष – रु. १६,०००/, तृतीय वर्ष – रु. १७,०००/-.

महापारेषण कंपनीच्या वेबसाईटवरील दि. १५ जुलै २०२४ च्या जाहिरातीमध्ये पॅरा ११ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत सविस्तरपणे दिलेली आहे.

तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्र. ०९/२०२३ अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नविन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (त्यांनी पूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.)

ऑनलाईन अर्ज www. mahatransco. in या संकेतस्थळावरील दि. १५ जुलै २०२४ च्या जाहिरातीमध्ये दिलेल्या https:// ibpsonline. ibps. in/ msetcljunsu/ या URL लिंकमधून दि. ९ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत).

Story img Loader