RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ –

पदाचे नाव आणि रिक्त पदे –

पदवीधर अप्रेंटिस – १५७
टेक्निशियन अप्रेंटिस – ११५
ट्रेड अप्रेंटिस – १३६

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी.
  • टेक्निशियन अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • ट्रेड अप्रेंटिस : ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात १०वी/ १२वी/ पदवी.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

हेही वाचा- बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात- २४ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.rcfltd.com/

अर्ज करण्याची लिंक – https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1n6E4tY8uMC1gX3h8fKPEVApkYXOnQaM7/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity in mumbai recruitment for 408 posts under rashtriya chemicals and fertilizers limited has started jap