ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा, महाराष्ट्र, (Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम). (Advt. No. GA/ Hire/ AOCP/१५२/०३/२०२४) ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग करून NCVT परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा उमेदवारांची ‘डेंजर बिल्डिंग वर्कर ( DBW)’ पदांवर ठरावीक मुदतीसाठी करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ९४ (अजा – ९, अज – ९, इमाव – २५, ईडब्ल्यूएस् – १०, खुला – ४१) (माजी सैनिकांसाठी १० पदे राखीव) (दिव्यांग उमेदवार या पदांसाठी पात्र नाहीत.)

पात्रता : अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करून NCVT किंवा NAC परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आताची म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ( MIL) मध्ये मिलिटरी अम्युनिशन आणि एक्सप्लोझिव्ह हाताळणे आणि मॅन्युफॅक्चरिंग कामाचा अनुभव आहे किंवा NCVT ने जारी केलेले AOCP ट्रेडमधील NAC/ NTC सर्टिफिकेट.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती

वेतन : मूळ वेतन रु. १९,९००/- डी.ए. रु. १०,५४७/-. DBW उमेदवारांना हॉस्टेल अकोमोडेशन न दिल्यास HRA दिला जाईल. (उमेदवारांची कामगिरी पाहून दरवर्षी ३ टक्के वेतन वाढ दिली जाईल.)

वयोमर्यादा : दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते ३५ वर्षे. (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे, माजी सैनिक सेना दलातील सेवा ३ वर्षे)

हेही वाचा >>> KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

अर्जाचे शुल्क : 

कामाचे स्वरूप : मिलिटरी एक्स्प्लोझिव्हज आणि अॅम्युनिशनचे उत्पादन आणि हाताळणी.

निवड पद्धती : NCVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमधील गुणवत्तेनुसार. NCVT मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापासून एक महिन्याच्या आत ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे १०० गुणांसाठी ट्रेड टेस्ट घेतली जाईल.

अंतिम निवड NCVT मधील गुण आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल. NCVT परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज व ट्रेड टेस्टमधील गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल. यानंतर शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.

इमावच्या उमेदवारांनी इमावच्या दाखल्यासोबत Appendix- I मधील घोषणापत्र भरावयाचे आहे.

रजा : उमेदवारांना दर महिन्याला २.५ दिवस रजा क्रेडिट केली जाते आणि अशी एकूण ३० दिवस रजा मिळू शकते आणि ती एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विकू शकतात.

उमेदवारांची नेमणूक सुरुवातीला एक वर्षासाठी केली जाईल. कराराचा कालावधी आणखी तीन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. नेमणुकीनंतर उमेदवारांची दर सहा महिन्यांनी कामगिरी तपासली जाईल.

https:// munitionsindia. in/ career/ या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जाची प्रिंटआऊट घेऊन BLOCK LETTERS ने पूर्ण भरलेला अर्ज ज्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून (समोरील बाजूस स्वयंसाक्षांकित करून) आणि स्वयंसाक्षांकित केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

The Chief General Manager, Ordnance Factory, Bhandara, Dist. Bhandara, Maharashtra – ४४१ ९०६.

अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Application for the post of DBW Personnel of AOCP trade on Tenure basis’ असे ब्लॉक लेटरमध्ये स्पष्ट लिहावे.