Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत ‘कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. पुणे विद्यापीठ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो.

एकूण पदसंख्या – ३

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ संशोधन फेलो : M.E./M.Tech. प्रथम श्रेणीसह ऊर्जा / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / साहित्य अभियांत्रिकी. किंवा M.Sc. भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह. NET/GATE परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सीएसआयआरच्या नियमांनुसार इतर अटी व शर्ती.

वरिष्ठ संशोधन फेलो : एम.टेक. / M. E. किंवा किमान ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील समकक्ष पदवी. किंवा M. Sc. भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह आणि SCI (Science Citation Indexed) जर्नलमध्ये एक प्रकाशन आणि M.Sc नंतर कमीत कमी दोन वर्ष पूर्ण केलेले असावे. अर्जाच्या तारखेनुसार संशोधन अनुभव. सीएसआयआरच्या नियमांनुसार इतर अटी व शर्ती.

  • शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

नोकरीचे ठिकाण – पुणे</strong>

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७

ई-मेल पत्ता –

  • hodenergy@unipune.ac.in and
  • energyunipune@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

पगार –

कनिष्ठ संशोधन फेलो – ३१ हजार + HRA (as per CSIR norms)
वरिष्ठ संशोधन फेलो – ३५ हजार + HRA (as per CSIR norms)

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.

भरती संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1Z6loiog5ZORxXXQy056X7A2OGi-Pirmz/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity in pune university recruitment for these posts has started find out who can apply jap