Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023: रयत शिक्षण संस्था सातारा यांनी २०२३ च्या भरतीसाठीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि B.Voc अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापका, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या ८४८ रिक्त पदांसाठी पूर्णपणे तात्पुरत्या तत्त्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२३ –
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक
हेही वाचा- खुशखबर! Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक, वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या निर्माण होणार
एकूण जागा – ८४८
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा.
अर्ज शुल्क – २०० रुपये.
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (पत्ता पाहण्यासाठी जाहिरातीची PDF पाहा)
मुलाखतीची तारीख – ३० आणि ३१ मे २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.rayatshikshan.edu
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://teaching.rayatrecruitment.com/ या बेवसाईटला भेट द्या.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1HxBXICsGLbQjZ688FXE9jsSgcWtJeJ6O/view?usp=sharing) या लिंकला अवश्य भेट द्या.