सुहास पाटील
केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत १२वी पात्रता असलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत नोकरीची संधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइण्ड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल एक्झामिनेशन (CHSL) २०२३ मधून पुढील पदांची भरती करणार आहे.
लोवर डिव्हीजन क्लर्क (एल्डीसी)/ ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (जेएसए); डेटा एन्ट्री ऑपरेटर (डीईओ); डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए (डीईओ). १,६०० रिक्त पदांचा तपशील योग्य वेळी जाहीर केला जाईल. जो उमेदवारांना https://ssc.nic.in;candidatescorner;tentativevacancies वर पाहता येईल. पात्रता (दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी) –
(१) सी अॅण्ड एजी, ग्राहक व्यवहार मंत्रालय अन्न आणि सार्वजनिक वितरण, सांस्कृतिक मंत्रालयमधील DEO/DEO Grade- A – अ पदांसाठी – १२ वी (विज्ञान) गणित विषयासह उत्तीर्ण.
(२) वरील मंत्रालयातील पदे वगळता इतर सर्व पदांसाठी – १२ वी उत्तीर्ण. २०२३ मध्ये १२ वीच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना १ ऑगस्ट २०२३ पर्यंत १२ वी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते २७ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९६ ते १ ऑगस्ट २००५ दरम्यानचा असावा. (इमाव – ३० वर्षेपर्यंत; अजा/ अज – ३२ वर्षेपर्यंत; अपंग (खुला गट) – ३७ वर्षेपर्यंत, अपंग इमाव – ४० वर्षेपर्यंत, अपंग अजा/ अज – ४२ वर्षेपर्यंत; विधवा/ परित्यक्ता महिला – खुला गट – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ४० वर्षेपर्यंत).
वेतन : दरमहा (i) एलडीसी पे-लेव्हल – २ रु. १९९०० – ६३२००, अंदाजे वेतन दरमहा रु. ३५,०००/-; डीईओ – ग्रेड ‘ए’ पे-लेव्हल – ४ रु. २५,५०० – ८१,०००/-, अंदाजे वेतन दरमहा रु. ४९,०००/-; डीईओ – पे-लेव्हल – ५ रु. २९,२०० – ९२,३००, अंदाजे वेतन दरमहा रु. ५४,४००/-. डीईओ – पे-लेव्हल – ४ रु. २५,५००-८१,००० अंदाजे वेतन दरमहा रु. ४९,०००/-.
अर्जाचे शुल्क : रु. १००/- (अजा/ अज/ अपंग/ माजी सैनिक/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)
ऑनलाइन मोडने फी दि. १० जून २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.
ऑफलाइन मोडने फी एसबीआय चलानद्वारे दि. १२ जून २०२३ (बँकेच्या कामकाजाच्या वेळे) पर्यंत भरता येईल. (जर उमेदवाराने दि. ११ जून २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत चलान जनरेट केलेले असेल.)
परीक्षा केंद्र : (वेस्टर्न रिजनमधील) अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, पणजी इ.
निवड पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन (टायर-I), (टायर- II) आणि कागदपत्र पडताळणी.
टायर- I – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टाईप (ऑगस्ट २०२३ दरम्यान). पार्ट-१ – इंग्लिश लँग्वेज (बेसिक नॉलेज) २५ प्रश्न/ ५० गुण. पार्ट-२ – जनरल इंटेलिजन्स – २५ प्रश्न / ५० गुण. पार्ट-३ – क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड (बेसिक अॅरिथमेटिक स्किल) २५ प्रश्न/ ५० गुण. पार्ट-४ – जनरल अवेअरनेस २५ प्रश्न/ ५० गुण. एकुण २०० गुण, वेळ ६० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.५० गुण वजा केले जातील.
स्कीम ऑफ टायर- II एक्झामिनेशन – सेक्शन- II मॉडय़ुल- II वगळता ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रश्न असतील.
सेशन– I (वेळ २ तास १५ मिनिटे) – सेक्शन- क – मॉडय़ुल- I मॅथेमॅटिकल अॅबिलिटी – मॉडय़ुल- II रिझिनग अॅण्ड जनरल इंटेलिजन्स, प्रत्येकी ३० प्रश्न, एकूण ६० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण १८० गुण. (वेळ १ तास)
सेक्शन- II – मॉडय़ुल- I इंग्लिश लँग्वेज अॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – ४० प्रश्न; मॉडय़ुल- II जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, एकूण ६० प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण १८० गुण (वेळ १ तास).
सेक्शन- III – मॉडय़ुल- I – कॉम्प्युटर नॉलेज मॉडय़ुल १५ प्रश्न, प्रत्येकी ३ गुण, एकूण ४५ गुण, वेळ १५ मिनिटे.
टायर- II – परीक्षा दोन सेशन्समधे (सेशन- I व सेशन- II) एकाच दिवशी घेतली जाईल.
सेक्शन- I, सेक्शन- II आणि सेक्शन- III मधील मॉडय़ुल- I मधील चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा केला जाईल.
सेक्शन- III मधील मॉडय़ुल- I कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट ही अनिवार्य असून ती फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
टायर- II – सेक्शन- II, सेक्शन- III, मॉडय़ुल- II स्किल टेस्ट/ टायिपग टेस्ट – इंग्लिश छापिल उतारा टाईप करणे. टाईप करावयाचा उतारा कॉम्प्युटर स्क्रीनवरसुद्धा दाखविला जाईल. (स्किल टेस्ट/ टायिपग टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची) कालावधी – १५ मिनिटे
(i) पार्ट-ए – Para ८.१ मध्ये दर्शविलेल्या C & AG, ग्राहक व्यवहार मंत्रालय अन्न आणि सार्वजनिक वितरण, सांस्कृतिक मंत्रालयमधील DEO/ DEO DEO Gr.- A पदांसाठी इंग्लिश उताऱ्याची डेटा एन्ट्री १५,००० KDPH वेगाने अंदाजे ३७००-४००० Key Depressions १५ मिनिटांत टाईप करावयाचे आहे.
(ii) पार्ट-बी – Para ८.१ मध्ये दर्शविलेल्या खात्यांव्यतिरिक्त खात्यांमधील DEO/ DEO Gr. A पदांसाठी डेटा एन्ट्री स्पीड ८,००० की डिप्रेशन्स प्रती तास वेगाने, २०००-२२०० की डिप्रेशन्स करावयाच्या आहेत.
(iii) एल्डीसी/ जेएसए पदांसाठी – फॉर्म भरताना उमेदवारांना टायिपगचे माध्यम हिंदी/ इंग्रजी यातून निवडावे लागेल. टायिपग टेस्ट कालावधी १० मिनिटे. इंग्रजी टायिपग ३५ श.प्र.मि. वेगाने संगणकावर १०,५०० की डिप्रेशन्स प्रति तास, हिंदी टायिपग ३० श.प्र.मि. (संगणकावर ९,००० की डिप्रेशन्स प्रति तास).
टायर- I परीक्षेतील पार्ट-२, पार्ट-३ व पार्ट-४ चे प्रश्न आणि टायर- II मधील (सेक्शन- II मॉडय़ुल- II वगळता) इतर प्रश्न हिंदी/ इंग्रजी आणि मराठी/कोंकणी/ कन्नड/ तेलुगू/ गुजराती इ Annexure- XVI मध्ये दिलेल्या १५ भाषांपैकी उमेदवाराने पसंती दिलेल्या एका भाषेत विचारले जातील.
टायर- I मधील कामगिरीवर आधारित उमेदवार टायर- II साठी निवडले जातील.
अंतिम निवड टायर- II (सेक्शन- I व सेक्शन- II) मधील गुणवत्तेनुसार व उमेदवाराने दिलेल्या पदांचा पसंतीक्रम पाहून केली जाईल.
जे उमेदवार अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग/ माजी सैनिकांसाठी राखीव जागांसाठी अर्ज करणार आहेत किंवा वयोमर्यादेत सूट घेऊ इच्छितात, त्यांनी विहीत केलेल्या नमुन्यातील (अजा/अज – Annexure- IX, इमाव Annexure- X , ईडब्ल्यूएस – Annexure- XV इ.) सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले संबंधित सर्टिफिकेट कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. असे सर्टिफिकेट सादर न करू शकल्यास त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल (Summarily rejected) ठरवला जाईल.
पदांचा पसंतीक्रम : अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी उमेदवारांना पदानुसार/ विविध खात्यांनुसार/ पसंतीक्रम ऑनलाइन ऑप्शन फॉर्म दिलेल्या मुदतीत भरून द्यावा लागेल.
एखाद्या पदासाठी उमेदवाराने पसंती दिली नसल्यास त्याचा त्या पदासाठी विचार केला जाणार नाही.
(वेस्टर्न रिजनसाठी) सर्व परीक्षांसाठीचे अॅडमिशन सर्टिफिकेट संकेतस्थळ http://www.sscwr.net यावर परीक्षेच्या ३ ते ७ दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
परीक्षेसाठी जाताना उमेदवाराने २ पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आधारकार्ड/ ड्रायिव्हग लायसन्स/ वोटर कार्ड/ पॅनकार्ड/ शाळा-कॉलेजने जारी केलेले ओळखपत्र यापैकी एक Original Photo ID बरोबर आणणे आवश्यक.
ऑनलाइन अर्जासोबत उमेदवारांना JPEG Format (10 KB to 20 KB) स्कॅण्ड सिग्नेचर (४ सें.मी. लांबी बाय २ सें.मी. उंची कागदपत्रावरील) आणि JPEG Format (20 KB to 50 KB) फॉरमॅट-मधील पासपोर्ट साईज रंगीत (३.५ सें.मी. बाय ४.५ सें.मी.) फोटोग्राफ स्कॅन करून अपलोड करावयाचा आहे. फोटोग्राफ दि. ९ मे २०२३ रोजी ३ महिन्यांपेक्षा जुना नसावा. फोटोग्राफ काढताना टोपी/ चष्मा घालू नये.
परीक्षे संबंधित माहिती आणि ऑनलाइन अर्ज https://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे ८ जून २०२३ (२३.०० वाजे)पर्यंत.
अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती कमिशनच्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- III व Annexure- IV मध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांना ‘Window for Application Form Correction’ २ दिवसांसाठी (१४ जून ते १५ जून २०२३ (२३.०० वाजेपर्यंत) अर्जामध्ये बदल/ दुरुस्ती/ अर्ज पुन्हा नव्याने करण्यासाठी उपलब्ध असेल. पहिल्या वेळेला अर्जामध्ये करेक्शन करण्यासाठी रु. २००/- करेक्शन चार्जेस भरावे लागतील. दुसऱ्या वेळेला करेक्शन करण्यासाठी/अर्ज पुन्हा सबमिट करण्यासाठी रु. ५००/- भरावे लागतील.
suhassitaram@yahoo.com