सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन आर्मी, इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (IMA) डेहराडून येथे जुलै, २०२४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन आर्मीमध्ये परमनंट कमिशन मिळवून देणाऱ्या ‘१३९ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स’ (TGC) साठी इंजिनीअिरग पदवीधर अविवाहित पुरुष उमेदवारांना प्रवेश.

 इंजिनीअिरग स्ट्रीमनुसार एकूण ३० रिक्त पदांचा तपशील –

(१) सिव्हील इंजिनीअिरग/ बिल्डींग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – ७ पदे.

(२) कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – ७ पदे.

(३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ इन्स्ट्रमेंटेशन – ३ पदे.

(४) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/ फायबर ऑप्टिक्स/ टेली कम्युनिकेशन इ. – ४ पदे.

(५) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ एअरोनॉटिकल/ एव्हिऑनिक्स/ प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/ इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चिरग/इंडस्ट्रीयल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट/वर्कशॉप टेक्नॉलॉजी – ७ पदे.

(६)  Misc.  Engg.  Stream आर्किटेक्चर/ केमिकल इंजिनीअिरग/ फूड टेक्नॉलॉजी/ अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअिरग/ बायोटेक इ. – २ पदे.

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअिरग पदवी किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण. इंजिनीअिरग स्ट्रीमनुसार मान्यताप्राप्त समतूल्य पात्रता पदवी यांची यादी  www. joinindianarmy. nic. in  या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये  para t  vacancies मध्ये दिलेली आहे. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम निकाल १ जुलै २०२४ पर्यंत सादर करणे आवश्यक.) (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग आणि आय्टी स्ट्रीममधील पदांसाठी एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) उमेदवारसुद्धा पात्र आहेत.)

वयोमर्यादा : १ जुलै २०२४ रोजी २० ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९७ ते १ जुलै २००४ दरम्यानचा असावा.)

उंची : किमान १५७.५ सें.मी. वजन – उंची व वय यांच्या प्रमाणात.

ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना प्रोबेशनवर लेफ्टनंट रँकवर शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन दिले जाईल. ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून येथे दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना विवाह करण्यास मनाई आहे. ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स पूर्ण वेतन व इतर भत्ते मिळण्यास पात्र आहेत. परंतु ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच पूर्ण वेतन व इतर भत्ते दिले जातील.

वेतन : डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१० वर मूळ पगार रु. ५६,१००/- अधिक एमएसपी रु. १५,५००/- व इतर भत्ते. जेटलमेंट कॅडेट्सचा १ कोटीचा ऑर्मी ग्रुप इन्शुरन्स उतरवला जाईल.

स्टायपेंड : ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एसएसबी इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. इंजिनीअिरगसाठी ६ व्या सेमिस्टपर्यंत, आर्किटेक्चरसाठी ८ व्या सेमिस्टपर्यंत आणि M.Sc साठी दुसऱ्या सेमिस्टपर्यंत सरासरी ६० टक्के गुण मिळालेले असावेत. प्रत्येक इंजिनीअिरग स्ट्रीमसाठी कट ऑफ परसेंटेज ठरविले जातील. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथाला यापैकी एक सिलेक्शन सेंटरचे वाटप केले जाईल. त्यांना तसे ई-मेलवरून व एसएमएसद्वारा सूचित केले जाईल. सिलेक्शन सेंटरचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून  ररइ साठीची तारीख प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमाने निवडता येईल. (अंतिम वर्षांच्या उमेदवारांचे इंजिनीअिरग पदवीच्या – सरासरी ६ व्या सेमिस्टपर्यंतचे गुण, एम.एस्सी.साठी सरासरी दुसऱ्या सेमिस्टपर्यंतचे गुण) मेडिकल एक्झामिनेशन  TGC-१३९ वा कोर्सकरिता शिफारिश झालेल्या उमेदवारांना संबंधित इंजिनीअिरग स्ट्रीममध्ये रिक्त पदे उपलब्ध न झाल्यास त्यांना शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन (टेक) कोर्स (ऑक्टोबर, २०२४) करिता पर्याय उपलब्ध राहील. अंतिम निवड SSB मधील गुणवत्तेनुसार केली जाईल.  SSB इंटरव्ह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल.

प्रमोशन : निवडलेल्या इंजिनीअिरग ग्रॅज्युएट्सना १ वर्ष सेवापूर्व सेवा ज्येष्ठता (Ante Date Seniority) लेफ्टनंट पदावर दिली जाईल. लेफ्टनंट पदावरील कमिशिनगनंतर २ वर्षांनी कॅप्टन रँकवर ६ वर्ष पूर्ण झाल्यावर मेजर, १३ वर्ष पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल २६ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल (TS)) रँकवर पदोन्नती दिली जाईल. यापुढील कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इ. रँकवरील प्रमोशन सिलेक्शन पद्धतीने दिली जातात.

ऑनलाइन अर्ज  www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. २६ ऑक्टोबर २०२३ (१५.०० वाजे) पर्यंत करावेत. (Officer Entry Apply/ Login-;  Registration-;  Apply online ( Officers Selection Eligibility)-;  Apply against TGC))  

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC (मिनिस्ट्री ऑफ लेबर अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट, भारत सरकार). क्षेत्रीय कार्यालय, पंचदीप भवन, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – १३.  ESIC च्या महाराष्ट्र रिजनमध्ये पुढील एकूण ७१ पॅरामेडिकल पदांची भरती.

(१) इसीजी टेक्निशियन – ३ पदे (अज – १, इमाव – १, खुला – १).

(२) ज्युनियर रेडिओग्राफर – १४ पदे (अजा – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

(३) ज्युनियर मेडिकल लॅबोरेटी टेक्नॉलॉजिस्ट – २१ पदे (अजा – २, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).

(४) रेडिओग्राफर – ३ पदे (खुला).

पात्रता : (दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ४ साठी (i) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील २ वर्ष कालावधीचा डिप्लोमा उत्तीर्ण.

पद क्र. ४ रेडिओग्राफरसाठी संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

पद क्र. ३ ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी इष्ट पात्रता (desirable) मेडिकल लॅबोरेटरी सायन्समधील पदवी उत्तीर्ण.

(५) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

पात्रता : ( i) १२ वी उत्तीर्ण, ( ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन सर्टिफिकेट, ( iii) टायपिंग स्पीड – इंग्रजी १०,५००  KDPH (३५ श.प्र.मि.) किंवा हिंदी ९,०००  ङऊढऌ (३० श.प्र.मि.)

(६) ओटी असिस्टंट – १३ पदे (इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९).

पात्रता : १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(७) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) – १२ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).

पात्रता : (i) १२ वी उत्तीर्ण आणि फार्मसीमधील डिप्लोमा/ फार्मसीमधील पदवी आणि फार्मसी अ‍ॅक्ट १९४८ अंतर्गत रजिस्ट्रेशन.

वयोमर्यादा : (दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी १८ ते २५ वर्षे; पद क्र. ६ व ७ साठी ३२ वर्षेपर्यंत. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

वेतन श्रेणी : पद क्र. १ ईसीजी टेक्निशियन – पे-लेव्हल – ४ (रु. २५,५०० – ८१,१००).

पद क्र. (२) ज्युनियर रेडिओग्राफर व पद क्र. (६) ओटी असिस्टंट – पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००).

पद क्र. (३) ज्युनियर मेडिकल लॅब टेक्निशियन, पद क्र. (४) रेडिओग्राफर व पद क्र. (७) फार्मासिस्ट – पे-लेव्हल – ५ (रु. २९,२०० – ९२,३००); पद क्र. (५) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – पे-लेव्हल – २ (रु. १९,९०० – ६३,२००).

निवड पद्धती : फेज-१ – लेखी परीक्षा (१) टेक्निकल/ प्रोफेशनल नॉलेज – ५० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे. (२) जनरल अवेअरनेस – १० प्रश्न. (३) जनरल इंटेलिजन्स – २० प्रश्न. (४) अ‍ॅरिथमॅटिक अ‍ॅबिलिटी – २० प्रश्न. २ ते ४ साठी प्रत्येकी १ गुण, वेळ ६० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

फेज-२ – टायिपग/ डेटा एन्ट्री टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट पदासाठी अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक/ खाते अंतर्गत कर्मचारी – रु. २५०/-, इतर कॅटेगरीजसाठी रु. ५००/- (ऑनलाइन मोड).

ऑनलाइन अर्ज  www. esic. gov. in  या संकेतस्थळावर दि. ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ, सिग्नेचर, डावा अंगठा निशाणी, स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक.