सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (NRSC), हैदराबाद. NRSC मध्ये पुढील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ४१.

(१) (पोस्ट कोड-१९) लायब्ररी असिस्टंट ‘ए’ – ३ पदे (ईडब्ल्यूएस – १, खुला – २) (१ पद दिव्यांग कॅटेगरी छश् साठी राखीव).

पात्रता – फर्स्ट क्लाससह पदवी उत्तीर्ण आणि लायब्ररी सायन्स/ लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉरमेशन सायन्स किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

(२) (पोस्ट कोड-१८) नर्स ‘बी’ – २ पदे (खुला).

पात्रता – मान्यताप्राप्त राज्य/ केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग अ‍ॅण्ड मिडवायफरी ( GNM) डिप्लोमा.

(३) (पोस्ट कोड-१७) मेडिकल ऑफिसर ‘सी’ – १ पद.

पात्रता – एम.बी.बी.एस. आणि २ वर्षांचा अनुभव.

(४) (पोस्ट कोड-६) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (अ‍ॅग्रिकल्चर) – २ पदे.

पात्रता – एम.ई./एम.टेक. (रिमोट सेंसिंग अ‍ॅण्ड जीआयएस/ जीओइन्फॉरमॅटिक्स किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी) (बी.एस्सी. अॅग्रिकल्चर पदवीसह उत्तीर्ण).

(५) (पोस्ट कोड-७) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (फॉरेस्ट्री अॅण्ड इकॉलॉजी) – ४ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (बॉटनी/ फॉरेस्ट्री/ इकॉलॉजी) आणि संबंधित विषयातील एम.एस्सी.

(६) (पोस्ट कोड-८) सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘एससी’ (जीओइन्फॉरमॅटिक्स) – २ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स/मॅथ्स) आणि एम.एस्सी. (जीओइन्फॉरमॅटिक्स किंवा समतूल्य).

(७) (पोस्ट कोड-९) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘एससी’ (जीओइन्फॉरमॅटिक्स) – ५ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी D & E साठी राखीव).

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ जीओइन्फॉरमॅटिक्स) आणि एम.ई./एम. टेक. (रिमोट सेंसिंग अ‍ॅण्ड जीआयएस/ जीओइन्फॉरमॅटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड मशिन लर्निंग किंवा समतूल्य).

(८) (पोस्ट कोड-१०) सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘एससी’ (जीऑलॉजी) – ४ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (जीऑलॉजी/ अ‍ॅप्लाईड जीऑलॉजी आणि संबंधित विषयातील एम.एस्सी.)

(९) (पोस्ट कोड-११) सायंटिस्ट/ इंजिनीअर (जीओफिजिक्स) – ४ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स/ मॅथ्स/ जीऑलॉजी) आणि एम.एस्सी. (जीओफिजिक्स किंवा समतूल्य).

(१०) (पोस्ट कोड-१२) सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘एससी’ (सॉईल सायन्स) – ४ पदे.

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) आणि एम.एस्सी. (सॉईल सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर केमिस्ट्री किंवा समतूल्य).

(११) (पोस्ट कोड-१३) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (अर्बन स्टडीज) – ३ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी सी साठी राखीव).

पात्रता – बी.ई./ बी.टेक. (प्लानिंग) किंवा बी.आर्क. आणि एम.ई./ एम.टेक. (अर्बन प्लानिंग/ रिजनल प्लानिंग किंवा समतूल्य).

(१२) (पोस्ट कोड-१४) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (वॉटर रिसोर्सेस) – ३ पदे (१ पद दिव्यांग कॅटेगरी ए साठी राखीव).

(१३) (पोस्ट कोड-१५) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (वॉटर रिसोर्सेस) – १ पद.

पद क्र. १२ व १३ साठी पात्रता – बी.ई./ बी.टेक. (सिव्हील/ अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग आणि संबंधित इंजिनीअरिंग विषयातील पदव्युत्तर पदवी वॉटर रिसोर्सेस/ हायड्रोलॉजी/ सॉईल अ‍ॅण्ड वॉटर कंझर्व्हेशनमधील स्पेशलायझेशनसह).

(१४) (पोस्ट कोड-१६) सायंटिस्ट/ इंजिनीअर ‘एससी’ (वॉटर रिसोर्सेस) – ३ पदे.

पात्रता – बी.ई./बी.टेक. (सिव्हील अ‍ॅग्रिकल्चर इंजिनिअरींग) आणि एम.ई./एम.टेक. (रिमोट सेंसिंग अॅण्ड जीआयएस/ जीओइन्फॉरमॅटिक्स किंवा समतूल्य.)

पोस्ट कोड ६, ९, १३, १४, १५ व १६ साठी – एम.ई./एम.टेक. किमान सरासरी ६० टक्के गुणांसह ( CGPA ६.५/१०) उत्तीर्ण आणि बी.ई./बी.टेक. किमान ६५ टक्के गुणांसह ( CGPA ६.८४/१०) उत्तीर्ण.

पोस्ट कोड ७, ८, १०, ११ व १२ साठी – एम.एस्सी./ एम.एस्सी. (टेक) किमान सरासरी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण ( CGPA ६.८४/१०) आणि बी.एस्सी. किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (CGPA ६.५/१०).

वयोमर्यादा – (दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी) पोस्ट कोड १७ ते १९ साठी १८ ते ३५ वर्षे.

पोस्ट कोड ६, ९, १३, १४, १५, १६ साठी १८ ते ३० वर्षे.

पोस्ट कोड ७, ८, १०, ११, १२ साठी १८ ते २८ वर्षे.

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

वेतन – पोस्ट कोड ६ ते १६ साठी पे-लेव्हल – १० (रु. ५६,१०० – १,७७,५००) अंदाजे वेतन दरमहा रु. १,१५,०००/-.

पोस्ट कोड – १७ साठी पे-लेव्हल – १० (रु. ५६,१०० – १,७७,५००) नॉन-प्रॅक्टिसिंग अलाऊन्स ( NPA) मूळ वेतनाच्या २० टक्के अंदाजे वेतन दरमहा रु. १,२६,०००/-.

पोस्ट कोड – १८ व १९ साठी पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९०० – १,४२,४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-.

अर्जाचे शुल्क – रु. २५०/- सुरुवातीला प्रत्येक अर्जासाठी प्रोसेसिंग फी रु. ७५०/- प्रत्येकी भरावी लागेल. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना रु. ७५०/- परत केले जातील.)

इतर सर्व उमेदवारांना रु. ५००/- परत केले जातील.

निवड पद्धती – मेडिकल ऑफिसर पद कोड – १७ साठी इंटरह्यू घेवून निवड केली जाईल.

नर्स-बी (पोस्ट कोड – १८) व लायब्ररी असिस्टंट (पोस्ट कोड – १९) साठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट; सायंटिस्ट/ इंजिनीअर एससी (पोस्ट कोड – ६-१६) साठी लेखी परीक्षा आणि इंटरह्यू.

लेखी परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेंगळूरु, हैदराबाद इ.

ऑनलाइन अर्ज NRSC वेबसाईट www. nrsc. gov. in वर दि. १२ फेब्रुवारी २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांनी पर्सोनलाईज्ड् रजिस्ट्रेशन कन्फरमेशन फॉर्म (ज्यात उमेदवाराचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर, अॅडव्हर्टाईजमेंट नंबर आणि पोस्ट कोड दिलेले असेल डाऊनलोड करून घ्यावा.)