सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२४-२५ मधील एकूण रिक्त ३९६३ पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस ( CRP Clerks- XIII) ऑगस्ट/सप्टेंबर/ऑक्टोबर २०२३ मध्ये आयोजित करणार आहे.
महाराष्ट्रातील रिक्त पदे – एकूण ५२७. (१८ पदे दिव्यांग कॅटेगरी HI – ४, OC – ४, VI – ४, ID – ६ साठी राखीव, ५२ जागा माजी सैनिकांसाठी राखीव)
(१) बँक ऑफ इंडिया – ११८ पदे (अजा – ११, अज – १०, इमाव – ३१, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ५५).
(२) पंजाब नॅशनल बँक – ११५ पदे (अजा – ११, अज – १०, इमाव – ३१, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ५२).
(३) पंजाब अॅण्ड सिंध बँक – ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – ०, खुला – ३).
(४) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – २८९ पदे (अजा – २८, अज – २६, इमाव – ७८, ईडब्ल्यूएस – २९, खुला – १२८).
गोव्यातील रिक्त पदे – एकूण ३६ पदे. (१) बँक ऑफ इंडिया – ८ पदे. (२) सेंट्रल बँक ऑफ इंडिया – १८ पदे. (३) युनियन बँक ऑफ इंडिया – ९ पदे. (४) पंजाब नॅशनल बँक – १० पदे. (५) पंजाब अॅण्ड सिंध बँक – ० पदे
महाराष्ट्रातील सहयोगी बँकांमधून BOB, Bank of Maharashtra, Indian Ban , कॅनरा बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि IOB यांनी रिक्त पदांचा तपशील IBPS ला कळविलेला नाही.

पदाचे नाव – क्लर्क. पात्रता –
दि. २१.०७.२०२३ रोजी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२३ रोजी २० ते २८ वर्षे (इमाव – ३१ वर्षे; अजा/अज – ३३ वर्षे; दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे; विधवा/ परित्यक्ता/ ज्युडिशियली सेपरेटेड महिला खुला गट -३५/ इमाव झ्र्३८ / अजा/ अज – ४० वर्षे).
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – सहयोगी बँका अजा/ अज/ दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ माजी सैनिक उमेदवारांना निशुल्क प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी. करोनाच्या स्थितीमध्ये सुधार न झाल्यास प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग घेतले जाणार नाही.
अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांसाठी रु. १७५/- आणि इतर उमेदवारांसाठी रु. ८५०/-.
ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट /सप्टेंबर २०२३ मध्ये.
ऑनलाइन मुख्य परीक्षा – ऑक्टोबर २०२३ मध्ये.

निवड पद्धती – सीआर्पी ऑनलाईन परीक्षा – (अ) पूर्व परीक्षा – (१) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, ३० गुण. (२) न्यूमरिकल अॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. (३) रिझिनग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. प्रत्येक टेस्टसाठी वेळ प्रत्येकी २० मिनिटे. एकूण ६० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, एकूण १०० गुण.
पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई,/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर. (ब) मुख्य परीक्षा – १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे. ( i) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटे; ( ii) जनरल इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे; ( iii) रिझिनग अॅबिलिटी अॅण्ड कॉम्प्युटर अॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे; ( iv) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड – ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे/ मुख्य परिक्षेसाठी महाराष्ट्र परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, ठाणे /नवी मुंबई / MMR, नगर, नागपूर, पुणे.

CRPXIII परीक्षेचे माध्यम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी असेल.
मुख्य परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई, नागपूर, पुणे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. ऑनलाइन अर्ज www. ibps. In या संकेतस्थळावर https:// ibpsonline. ibps. in/ crpclrt junst या लिंकमधून दि. २१ जुलै २०२३ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत १) रंगीत फोटोग्राफ (४.५ ७ ३.५ सेंमी) (२) सिग्नेचर (स्वाक्षरी), (३) डाव्या अंगठयाची निशाणी, (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, (५) इतर आवश्यक प्रमाणपत्र यांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक.
शंकासमाधानासाठी – https:// cgrs. ibps. in/ ला लॉग इन करा.
The text for hand written declaration is as follows :- I,_ ( Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड
( IOCL)मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर्सची इंजिनिअर्स/ऑफिसर्स आणि ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस इंजिनिअर्स ( GAEs)पदावर GATE-2023 स्कोअरवर आधारित भरती
पुढील विद्याशाखांमधील ग्रॅज्युएट इंजिनिअर्सची इंजिनिअर्स/ ऑफिसर्स पदावर भरती. Advt. No. DP/5/5 Open ( GATE-2023) (ए) केमिकल इंजीनिअरींग, (बी) सिव्हील इंजीनिअरींग, (सी) कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजीनिअरींग, (डी) इलेक्ट्रिकल इंजीनिअरींग, () इन्स्ट्रमेंटेशन इंजीनिअरींग, (ERY) मेकॅनिकल इंजीनिअरींग.

याशिवाय वरील विद्याशाखांमधील ग्रॅज्युएट इंजिनिअर्सची ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस इंजीनिअर (GAEs) पदांची अॅप्रेंटिसशिप अॅक्ट, १९६१ अंतर्गत भरती. Advt. No. DP/5/5 Open ( GATE-2023)
पात्रता – (अ) संबंधित विषयातील इंजीनिअरींग पदवी (बी.ई./बी.टेक) किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी ५५ टक्के गुण) (इंजीनिअरींगच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम वर्षांचा निकाल ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागणे आवश्यक.) आणि (बी) संबंधित विषयातील ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजीनिअरींग GATE- 2023 परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. ३० जून २०२३ रोजी २६ वर्षेपर्यंत (इमाव – २९ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३१ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ३६ वर्षेपर्यंत).
निवड पद्धती – GATE- -2023 मधील गुणवत्तेवर आधारित कॅटेगरीनुसार उमेदवार पर्सोनल इंटरह्यू ( PI) आणि ग्रुप डिस्कशन ( GD) ग्रुप टास्क ( GT) साठी निवडले जातील. अंतिम निवड ( I) GATE- 2023 चे १०० पैकी गुण. ( II )GD/ GT मधील गुण. ( III) PI मधील गुण यातील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल चाचणी घेतली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना IOCL च्या एका डिव्हीजनमध्ये (रिफायनरीज, मार्केटिंग, पाईप लाईन्स अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट किंवा कॉर्पोरेट फन्क्शन्स किंवा सबसिडीअरी कंपनी/जॉईंट व्हेंचर कंपनी) पोस्टींग दिले जाईल.

ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस इंजीनिअर्स (GAEs) ना दरमहा रु. ६०,०००/- स्टायपेंड म्हणून दिली जाईल. अॅप्रेंटिसशिपचा कालावधी १ वर्षांचा असेल.
अॅप्रेंटिसशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना (IOCL) मध्ये इंजिनिअर्स/ ऑफिसर्स पदावर सामावून घेतले जाईल. इंजिनिअर्स/ ऑफिसर्स म्हणून निवडलेल्या उमेदवारांना दरमहा मूळ वेतन रु. ५०,०००/- अधिक इतर भत्ते. परफॉरमन्स रिलेटेड पे (PRP) वेतन इत्यादी मिळुन अंदाजे एकूण रु. १६.८० लाख प्रती वर्ष दिले जाईल. उमेदवारांना कोणतेही अर्जाचे शुल्क आकारले जात नाही. शंका समाधानासाठी ई-मेल आयडी आहे recruit2023 @indianoil. in
ऑनलाइन अर्ज www. iocl. com या संकेतस्थळावर https:// iocl. com/ latest- job- opening या लिंकवर दि. १४ जुलै २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity institute of banking personnel selection recruiting common recruitment process amy
Show comments