सुहास पाटील
एचपीसीएल, राजस्थान रिफायनरी लिमिटेड ( HRRL) (HPCL आणि राजस्थान गव्हर्नमेंट यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) ( Advt. No. HRRL/ RECT/०१/२०२४)) पुढील पदांची भरती.
(१) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल ( Salary Grade Eq) – अंदाजे वेतन रु. ७,७८,०००/- प्रतिवर्ष – ६० पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २५).
पात्रता – (दि. ११ मार्च २०२४ रोजी) केमिकल इंजिनीअरिंग; पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग; केमिकल इंजिनीअरिंग (फर्टिलायझर/ प्लॅस्टिक अँड पॉलीमर/ शुगर टेक्नॉलॉजी/ ऑईल टेक्नॉलॉजी/ पॉलीमर टेक्नॉलॉजी) मधील डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग – ५० टक्के) किंवा बी.एससी. (केमिस्ट्री प्रमुख विषयासह) (ऑनर्स)/पॉलीमर केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग – ५० टक्के)
(२) सिनियर इंजिनिअर – प्रोसेस (रिफायनरी/ पेट्रोकेमिकल/ रिलायबिलिटी/ इन्स्पेक्शन मेंटेनन्स रोटरी/इलेक्ट्रिकल) ( र/ ॅ ए३ रु. ६०,००० – १,८०,०००) – अंदाजे वेतन दरमहा रु. १५.९२ लाख प्रतिवर्ष (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/दिव्यांग – ५० टक्के गुण) आणि किमान ६ वर्षांचा अनुभव.
(३) सिनियर मॅनेजर – प्रोसेस (रिफायनरी/ पेट्रोकेमिकल/ ऑफसाईट अँड प्लानिंग/ सेफ्टी अँड Encon) सिनियर मॅनेजर/ युटिलिटीज/ टेक्निकल प्लानिंग (रिफायनरी)/ युटिलिटिज/ टेक्निकल प्लानिंग (रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स)/ क्वालिटी कंट्रोल (पेट्रोकेमिकल्स/ इन्स्पेक्शन/ रिलायबिलिटी/ मेंटेनन्स स्टॅटिक/मेंटेनन्स रोटरी/ इलेक्ट्रिकल/ फायर अँड सेफ्टी) ( S/ G Ev रु. ८०,००० – २,२०,०००) अंदाजे वेतन रु. २१.७१ लाख प्रतिवर्ष – ३५ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १६).
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग – ५० टक्के गुण) आणि किमान १२ वर्षांचा अनुभव.
(४) सिनियर मॅनेजर – क्वालिटी कंट्रोल रिफायनरी ( S/ G Ev रु. ८०,००० – २,२०,०००) – १ पद.
पात्रता – एम.एससी. (केमिस्ट्री) आणि संबंधित कामाचा किमान १२ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – (दि. ११ मार्च २०२४ रोजी) पद क्र. १ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल – २५ वर्षेपर्यंत. सिनियर इंजिनिअर पदांसाठी – ३४ वर्षेपर्यंत; सिनियर मॅनेजर पदांसाठी – ४२ वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)
कामाचे ठिकाण – HRRL चे देशभरातील डिव्हीजन्स/ डिपार्टमेंट्स.
निवड पद्धती – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), स्किल टेस्ट आणि पर्सोनल इंटरह्यू.
CBT ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
C( I) जनरल अॅप्टिट्यूड – इंटेलिजन्स पोटेंशियल टेस्ट, टेस्टींग लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेज टेस्ट.
C( II) टेक्निकल/प्रोफेशनल नॉलेज – विषयाशी संबंधित प्रश्न.
प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन आणि फिजिकल फिटनेस इफिशियन्सी टेस्ट
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- रु. १८०/- जीएसटी. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
ऑनलाईन अर्ज www. hrrl. in या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.